आमचं हिरण्य नैसर्गिक वैविध्याने नटलेलं आहे.मध्यम ऊंचीचे डोंगर,तलावालगतची धरणभिंत,उंच-सखल खडकाळ परिसर,मोठाले वृक्ष,झाडं,झुडपं,वेली,
लॉन्स,धबधबा,पाण्याचे कालवे..आपोआपच या जागेचं वैशिष्ट्यपूर्ण विभाजन झालेलं आहे.नुसता एक राऊंड जरी मारायचा म्हटला तरी भरपूर चालावं लागतं.चढ-उतार करावे लागतात पण खूप रिफ्रेशिंग मोकळेपणा मिळतो वावरताना.
खूपदा लोकं अगदी वेळ हातात ठेवून येतात.दिवसभर पिकनिक सारखं मनसोक्त धमाल करतात.
एक मोठं कुटुंब आलं तरी १४-१५ जणं असतात.
आईवडील, त्यांची मुलं-सूना,त्यांची प्रत्येकी मुलं..सर्व वयातील. एकत्र आले की खूप खेळतात.
क्रिकेट, व्हॉलीबॉल, लगोरच्या,म्युझिक चेयर,अंताक्षरी इत्यादी. पण हे एवढ्यातच हं.
पंधरा वर्षांपूर्वी यायचे तेव्हा कुरकुर करायचे.
मोबाईलला रेंज नाही,टिव्ही नाही,क्रिकेट नाही, मुलांसाठी व्हिडिओ गेम्स नाहीत,अत्याधुनिक बैठे स्पोर्ट्स नाहीत म्हणून. हे ठेवा,ते ठेवा असे सल्लेही द्यायचे.आम्ही वैतागायचो. सांगायचो की अहो एवढा छान निसर्ग आहे,परिसर आहे..जा..जरा फिरा डोंगरांवर,तलावावर.झाडं बघा,फुलं, फुलपाखरं, पक्षी, घरटी, बघा..मोकळी हवा शरीरभरुन घ्या...
अक्षरशः इंस्टिगेट करावं लागायचं.
पण मग हळूहळू सर्वत्रच मनोवृत्तीत बदल होत गेला.
कुटुंबच्या कुटुंब ट्रेकिंगसाठी म्हणून येऊ लागली.
सकाळी-दुपारी-रात्री आवर्जून परिसरात फिरु लागली.
ढगांची आणि चांदण्यांची रुपं न्याहाळू लागली.
ऐडव्हेंचर गेम्ससाठी उत्सुक होऊ लागली.मग आम्ही हुरडा फेस्टिव्हलमधे माफक स्वरूपात रैपलिंग, व्हैली क्रॉसिंग ठेवू लागलो.मुलांनी आणि महिलांनी तर हे खेळ डोक्यावर घेतले.
लोकांची बदललेली आवड लक्षात घेता आम्ही पण हिरण्यवर साधारण धाडसी खेळ कायमचे ठेवायला सुरवात केली.आणि ते लोकप्रियही झाले.
स्वतःतलं धाडस, एकाग्रता आणि शारिरीक क्षमता आजमावणारे खेळ सगळेच जणं आवडीने खेळू लागले.बालपणाच्या आठवणी काढून पतंगबाजी करणे,धप्पाकुटी,मामाच पत्र हरवलं खेळणं तर सगळ्यांनाच आवडायला लागलं.
अख्ख्या कुटुंबाला विण हसतखेळत पक्की करण्यात,प्रत्येकाला अक्षरशः वय, पत, हुद्दा विसरायला लावून आपल्या कुटुंबीयांसोबत एक खेळकर ऋणानुबंध निर्माण करायला लावण्यात हिरण्यचा फार मोठा सहभाग आहे.
दो-यांच्या विविध खेळांनी सर्वांना एकत्र आणणारा हा कोपरा...झाडीत लपलेला.
"बाबा..बाबा...मला धरा..मला भिती वाटते."
"आई...बाबा पण पतंग उडवताहेत बघ..खु...ह्यै..ह्यै.."
"अहो..अहो...मला जरा झोका द्यानं"
"क्युं चाचा..बुढी घोडी लाल लगाम ? बुढापे मे सिक्सर मार रहे हो ?"
"अरे चुप बे..बुढा होगा तेरा बाप.बचपन मे तो पुरी गली में मेरे जैसा ऑलरॉऊंडर कोई नही था क्रिकेट में"
अक्षरशः रेकॉर्ड करुन परत-परत ऐकावं अशी ह्रद्य संभाषणं असतात इथली.
I bet no one will ever forget the joyous time spent here at Hiranya !
या व्हिडियोत...
दोरीवरच्या लुडबुड खेळात पडता-पडता सावरणारे बाबा, त्यांच्या फजितीला खळखळून हसणारी आई,
आणि ही गंमत विस्मयाने बघणारी मोठी चिमुरडी आणि काहीही न कळून बावरलेली धाकली.
अत्यंत निर्मळ आणि निखळ कौटुंबिक क्षण...
मनाच्या कुपीत अत्तरासारखे कायम दरवळत रहातील असेच.
#हिरण्यस्पंदने #fellingblessed #positiveenergy #hiranyaresorts #natureresorts
No comments:
Post a Comment