मस्त पावसाळी हवा तरी संध्याकाळ कुंदलेली.मुलं गोव्यात RFC कार रेससाठी गेलेली. सिनेमाला जायच आलं डोक्यात आणि ठरलं पण.😃
आम्ही दोघांनी इतक्या सहजपणे सिनेमा बघायला निघणं म्हणजेच एक चमत्कार आहे.🤗
अडनीडी संध्याकाळची वेळ पण खरंच ठरलं आणि सुतासारखे सरळ बाहेर पडलो.
अर्थात चित्रपट मीच निवडला.Lipstick Under My Burkha. ब-याच उलट-सुलट चर्चा ऐकल्या-वाचल्या होत्या.🤔
नेटवरुन कुठे आणि कधीचा हा सिनेमा आहे ते चक्क अस्मादीकांनी शोधलं.बोलायच्या नादात थियेटर मागे निघून गेलं.परत फिरुन आलो.आधीच उशीर झालेला.त्यात हल्ली मी कार्यस्थळं,तारखा,वार यांची फार गल्लत करते आणि आधी नाही तर उशीरा तरी किंवा आधीच्या दिवशी सुध्दा पोहोंचते.तोही धाक मनात होताच.पण ग्रहतारे जोरात होते.चक्क राष्ट्रगीतही मिळवू शकलो.थियेटर रिकामं.जेमतेम पन्नास लोकं.त्यात महिला सात-आठ.
नंबर न बघताच पाय लांब करुन बसता येईल म्हणून पुढच्या रांगेत बसलो.🙂
मध्यंतर संपताना एक स्टाफ तिकीट दाखवा म्हणायला लागला.कळेचना का ते.नंबरांचा घोळ म्हणावा तर अख्ख थियेटर ओस पडलेलं.तुझा खिसा-माझी पर्स करत तिकीटं सापडवली.ती त्याने टॉर्चच्या उजेडात चेक केली आणि म्हणाला चलो ऑफिसमें..हमारे साब को मिलो.
...अरे बाबा का पण ?
तुम्हारा नंबर लकी ड्रॉ मे निकला है ?
लकी ड्रॉ ? हमने तो किसमे भाग नही लिया.और अभी सिनेमाभी शुरु हो रहा है.
बस दो मिनट के लिये चलिये.आपको डिस्कॉउंट कुपन मिला है.
गोंधळून चकीत होत दोघंही बुकिंग ऑफिसमधे गेलो तर आईये... Congratulations ! आप टिबीझेड के विनर हो..और ये रहा आपका डिस्कॉउंट कुपन.
मैडम आपकी जानकारी दिजीये और आपका आयडेंटिटी प्रुफ भी.चलो एक फोटो खिंच लेते है.
...अरे हमे कैसे सिलेक्ट किया आपने.हम तो अपनी जगह छोड के दुसरी जगह बैठे थे ?
हां मैडम...But we monitor.
Ok...तो वो शाहरुख-अनुष्का की जो एड चल रही थी वो यही है क्या ?
जी हां.
थियेटरमधे आल्या आल्या शाहरुख-अनुष्काची एक जाहिरात दाखवत होते.आधी वाटलं ट्रेलर आहे मग लक्षात आलं जाहिरात आहे.पण काय कंटेंट आहे हे कळे पर्यंत फिल्म संपली आणि तसही शाहरुख फार मनावर घेण्यासारखा नाहीचये हे माझं मत असल्यामुळे मी ही फार मनावर घेतलं नाही.पण त्याच 'मनकवड्या' शाहरुखने 5000/- रुपयांच 'tbz'चं डिस्कॉउंट कुपन मला मिळवून दिलं.नव-याला संकटात टाकलं.
मजा आली. आज माझे ग्रहतारे फारंच तेजाळलेले दिसताहेत.😀
परततांना रस्त्यावरचं टोलेजंग 'tbz' हे मुल्यवान दागिने आणि विशेषतः डायमंड्ससाठी प्रसिद्ध असलेले दुकान पाहिले.असल्या नामांकीत दुकानांच्या पाय-याही चढायच मी कटाक्षाने टाळते.माझे सोनार म्हणजे गल्ली-बोळातले छोटे दुकानदार.जिथे शक्यतो कामगार वर्ग जातो ती.
आता 5 हजार वाचवायला 50,000 हजारांचा चुना कोण लावून घेणार ? पण हा पश्चात विचार.या क्षणी तरी हम जिते तो हमीच सिकंदर !
आणि खरं सांगायच तर डायमंड्सचं विश्व अगदी फसवं विश्व आहे.जमल्यास सगळ्यांनी 'Diamonds are not for ever' हे पुस्तक जरुर वाचावं.
एका चुकीच्या पसरवलेल्या,स्थिरावलेल्या समजावर समाज भाळतोय.कोट्यावधीची उलाढाल करतोय.
इथेही दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिये.आणि झुकानेवाला पश्चिमेचा असेल तर विचारायलाच नको.
तर थोडक्यात मला हि-यांची जाण आणि लोभही नाही पण हां सेमी(अजून एकदा सेमी )प्रेशस स्टोनची मात्र
आवड मनापासून आहे.जमीनी खालच्या या विविध रंगी,रुपी खनीजांचा खजिना फारचं विस्मयकारी आणि विलोभनीय आहे.त्यात आपल्या औरंगाबादच्या जमीनीत मिळणारा Agate, amethyst ,असेल तर आपण जाम फिदा.👑
तर असो. या कुपनच्या निमित्ताने टिबीझेडच्या पाय-या नक्कीच चढाव्या लागणार आहेत असं दिसतयं.💎💍
No comments:
Post a Comment