औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फेचा आजचा हेरिटेज वॉक औरंगाबादच्या लेण्यांवर.
शहरापासून जेमतेम दहा किलोमीटरवर. मकब-याच्या मागील टुमदार डोंगरामधे कोरलेल्या दहा लेण्या.सगळ्या लेण्या बुध्दीस्टच पण तरीही हिंदू मायथॉलॉजी जवळ जाणा-या.एक-दोन शिल्प तर मास्टर पिस म्हणून नावाजलेली.जरासा नरमच खडक त्यामुळे इरोजन आणि पडापडी बरीच झालेली.
आजचा वॉक फक्त पहिल्या पाच गुहा लेण्यांचाच.
पाऊस पळालेला,तरीही डोंगर व परिसर हिरवळलेला.सकाळची वेळ,उत्साही जनता.तरुण बहुसंख्येने आलेले.
शेवट पर्यंत छान रस्ता.भक्कम पाय-या,बरीच चढण,पण उंचावरनं दिसणारं देखणं औरंगाबाद नक्कीच प्रेमात पाडतं.मस्त वळणदार सरपटी रोड.ग्लिरिसीडीया का असेना पण भरपूर गर्द झाडी.मोठाल्या बोल्डर्सच्या सुंदर रचना.भर पावसाळ्यात दडदडून पाणी वाहवून नेणार्या घळी.
पाखरांची रेलचेल.खाली निवांत पसरलेला निपट निरंजन,मकबरा आणि युनिव्हर्सिटीचा परिसर.
वर निळाई,त्यात तरंगणारे शुभ्र जलज...
कुरेशी दांपत्य आणि आर्कियॉलॉजीच्या वाजपेयीसरांचे उत्साही विवेचन...आजची गुरुपौर्णिमाची सकाळ अशी प्रसन्न झालेली.
Aurangabad caves.
Excellent and scenic location,important rockcut monument,very adjusent to the city,
but still this is the most underrated place of Aurangabad.
तिन्ही ऋतूमध्ये या इथे छानंच वाटतं.
मी-आम्ही पावसाळ्यात,उन्हाळ्यात इथे नेहमी येत असतो.जवळपासचे बरेच लोकं नियमित फिरायलाही येतात .तरुण जोड्या तर हमखासंच.
पण अजूनही या लेण्या न पाहिलेले बहुसंख्य स्थानिक महाभागही आहेत.
घर की मुर्गी दाल बराबर सारखं.
No comments:
Post a Comment