पहाटेचा ५.३०चा अलार्म वाजला आणि झोप चाळवली गेली.उठायचा अगदी कंटाळा आला.मृग नक्षत्रावरचा कालचा दमदार झालेला पाऊस.हवेतला गारवा,अंथरुणातली ऊब.जाऊदे नकोच आज फिरायला-पळायला जायला.
आपल्याला कुठे ऑलिंपिक जायचं नाही का मिसेस इंडियाचा फॉर्मही भरायचा नाही.
I must pamper my self with such small luxuries and I should stop taking life so seriously.
कुस बदलली.
दुसरा अलार्म दहा मिनिटांनी होणारच आहे.
चुळबुळ सुरु.मनाची द्विधा.उठावं का नाही?
सायलेंट तुंबळ युध्द.
साखर स्वप्न नाही पण मग एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे नेटाने आपला दिनक्रम जगणारे रथी-महारथी डोळ्यांसमोर तरळून गेले.खेळासाठी मातृभुमीतून लहान वयातच स्थलांतर करणारी स्टेफी असो वा शार्प पहाटे सहाला शुटिंगसाठी बाहेर पडणारा मध्यवयातलाअमिताभ असो वा क्रिकेटसाठी बालपणाला तिलांजली देणारा सचिन असो वा पहाटेच्या निरव ब्रह्मवेळेला रियाज करणारा एखादा वृध्द उस्ताद असो.
किंवा आपल्या संसाराला हातभार लावायला
न थकता,न कुरकूरता, नेमाने कष्ट करणा-या अनेक ताया-बाया,काका-मामा असोत.
जे ठरवलयं ते केलंच पाहिजे.कंटाळा करुन काही होणार नाही.उगाच थोडंस लोळेन आणि मग दिवसभर स्वतःवरच चिडत बसेन.
No way.I must get up.I am not special.
पाऊस-गारवा,संसार-कंटाळा सगळ्यांनाच आहे.
But still they are out kicking and jumping.
बाहेर सगळं चराचर उत्साही असेल.
चालणारे,पळणारे,खेळणारे..डोलणारे झाडं-पानं-फुलं-चिवचिवणारी पाखरं...
चराचरातल्या प्रत्येकाच्या अतुट निश्चयाची चिमूट चिमूट धग माझ्या ओंजळीत घेतली आणि निश्चयाने उठलेच आणि निघाले.
No comments:
Post a Comment