Thursday, 8 June 2017

वडसावित्री.

वड सावित्रीच्या निमित्ताने सोशल मिडियावर भरपूर पोस्टस् टाकताहेत लोकं.बहुतेक पुरुषांच्याच,त्यातही विवाहित पुरुषांच्या.महिला वर्ग बहुदा दिन महात्म्याच्या तयारीत गर्क दिसताहेत.
आजचं हे लिखाण कधीचं मनात घुमतयं,पण असाच मागे पडत गेला हा विषय.तर आजच्या वड सावित्रीच्या निमित्ताने लिहुनचं टाकायचा असं ठरवून बसलेच लिहायला.

या जन्मी मिळालेलाच पती पुढच्याही सात(हा धरुन सात का सहा ?) जन्मी मिळावा म्हणून विवाहित महिला आज उपास करतात,वडाच्या झाडाची पूजा करतात,झाडाला दोरे बांधतात.अतीव पती प्रेम आणि पतीनिष्ठेचा ढोबळ संदेश/कारण आहे हा दिवस साजरा करण्यामागे.
उत्सवप्रिय भारतिय या दिवसाचही साजरेपण अगदी धुमधडाक्यात पारंपारिक पध्दतीने करतच असतात.
आणि त्यात आता सोशल मिडियाच्या भडकावू तेलाची भर.

पण समाजातले आजचे वैवाहिक आयुष्याबद्दलचे प्रवाह,मत,विचार आणि दृश्य काय आहे याचा कुणी फारसा विचार करताना दिसत नाही.बायका समारंभी सणात मग्न आणि पुरुष विनोदाची तोरणं लावण्यातंच धन्य.

एका ठराविक स्तरावरच्या वैवाहिक जीवनात आपण(स्त्री-पुरुष)आता खरंच एकमेकांवर किती अवलंबून आहोत ? प्रत्येकच जण आता इतका स्वावलंबी झालेला आहे कि काही फक्त मोजक्याच कोअर इश्युजसाठी आपण एकमेकांना निर्विवादपणे स्वीकारु शकतो.म्हणजे जे एकत्र आहेत ते लगेच तोडाफोडीचा पर्याय निवडतील असं नाही.
But we prefer certain sufferings than one sided blind adjustments.एखाद्या जोडीदाराच्या जाण्याने अक्षरशः सर्वार्थाने कोलमडून पडणा-या स्त्रिया आताशा किती आहेत ?
आणि खरोखरच पुढच्या येणा-या,मिळणा-या जन्मात जोडीदाराची गरज भासणार आहे का ?आणि भासलीच तर खरंच तोच जोडीदार पुन्हा मान्य असेल का ?असे एक ना अनेक प्रश्न सध्या फार वेगाने समाजात,
व्यक्तिशः उपस्थित होताहेत असं मला वाटतयं.
फार पुर्वी तसा काळ होता कि पुरुषां शिवाय बायकांना गती नव्हती,आयुष्य नव्हतं,समाज मान्यता नव्हती,
आदर नव्हता,सुरक्षितता नव्हती...वगैरे.
आजही या गोष्टीत फार फरक पडला आहे असं नाही पण आजच्या 'बहुतांश' स्त्रिया जीवनात साथीदार असूनही येनकेन कारणांनी जगण्याशी एकट्याच कणखरपणे लढतांना दिसतात.भलेही त्यांना समाज मान्य करत नसेल.उलट त्रासच देत असेल. पण आजची स्त्री ही खरोखर अर्धनारी नटेश्वराचं रुप आणि कर्तृत्व घेऊन निर्भिडपणे आयुष्याला सामोरं जात आहे.संसारात असूनही एका आंतरिक एकटेपणाची धुरा सांभाळत लढत आहे.अगदी सगळ्या स्तरांमधून,स्त्री-पुरुषांकडून हाच एकटेपणाचा हुंकार ऐकू येतो आहे.
सहजीवनातली वरवरची,सुखाची,समृध्दीची खळखळ जरी जाणवत असली तरी तळाशी एका निकोप,सुदृढ सहजीवनाची तहान तशीच आहे. जगण्याच्या या अंतर्गत संघर्षात स्त्रियांनी नक्कीच बाजी मारली आहे.
Many of them have become the men they wanted to marry.
मध्यम-उच्च मध्यम वर्गातल्या सुशिक्षित,विचारी,
कर्तबगार स्त्रिया तर इतक्या हिकमतीने संसारासाठी एकट्या लढतात,जगतात की they have become super women.None of them want an ever demanding life partner.
Trust me,weekend husband-partner concept is at our door step.

हल्लीच्या मुला-मुलींशी बोलताना फार प्रकर्षाने जाणवतं की त्यांच्या जगण्यात दुस-यांसाठी फार कमी जागा आहे.प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासाच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की no one wants to curtail their lives for anyone !
अर्थात महिलांचा मातृत्वी जीव मुलांमधे बराच गुंतलेला रहातो पण पुरुष तर फार लवकर नामानिराळा राहू इच्छीतो.
वैवाहिक आयुष्याची नशा काही वर्षात उतरल्यानंतर रोजच्या कटकटी,कॉम्प्रमाइजेस,एडजस्टमेंट्सपेक्षा दूर राहून जीव लावणारा,वेळप्रसंगी काळजी घेणारा,
आयुष्याला परिपुर्णता देणारा साथीदार,जीवलग,मित्र सगळ्यांनाच हवा आहे.

कुठेही डोकावून बघा बिनसलेले संसार,फिस्कटलेली लग्न,न जुळणारे संबंध,कोमेजलेलं प्रेम..सगळ्याच्या तळाशी असमानता,एकतर्फी अवास्तवअपेक्षा,आणि वैयक्तिक स्पेस ही कारणं सापडतील.

Since men and society have not changed with the time,women have learned to survive on their own.In a way they have mastered it as well.And believe me they are cool and happy about it.
ज्या महिलेचा साथीदार-नवरा नौकरीसाठी घरापासून दूर रहातो तिला विचारा.
She is absolutely comfortable with the system.आणि तिचा हेवा करणा-या बाकी कीतीजणी असतात ते पण बघा.शितावरुन भाताची परिक्षा.
No one wants a only demanding partner 24×7.All they want is honest,commited and responsible men.

So वडाला पारंपारिकपणे दोरे गुंडाळण्या ऐवजी काही नाजूक गुंते सोडवण्यासाठी,पारंपारिक वैचारिक,
सामाजिक धागे-दोरे गुंडाळून ठेवायची वेळ आली आहे असं नाही का वाटतं ?

No comments:

Post a Comment