नवरा-बायकोने कितीही एकोप्याने खोपटं उभारलेलं असू देत.एखाद दुस-या फटीतून येणारा कवडसा मात्र खास 'आपलाच' असतो आणि असावासा देखील वाटतो.मनाच्या-बुध्दीच्या चोरकप्प्यात मी,माझं,आमचं अशी एक संदूक असतेच.🤗
आणि आपली मूलं वेळोवेळीच्या त्यांच्या वागणूकीने कशी फक्त आपलीच-आपल्यावरंच आहेत हे कळालं की अगदी छान-मस्त-धन्य-धन्य वाटत रहातं.😇
मग ते मुलीला आपल्यासारखं पुड चटणीवर तेल घेणं आवडो का मुलाला आपल्यासारखंच साधं-वरण-भात आवडो.😘
मुलगा आपल्यासारखाच शिंकला तरी रोमांचित व्हायला होतं.आणि मुलगी आपल्यासारखीच सुई-दोरा वापरायला लागली मन भरुन येतं.😄
अर्थात मुलांनी आपल्या उचलेल्या चांगल्याच गोष्टी आपल्या नजरेत कौतुकाने भरतात.😚
वाईट गोष्टींचा हिशेब ठेवायला नवरारुपी कोतवाल असतोच की.🙁
No comments:
Post a Comment