कालच एक पोस्ट मी माझ्या वॉलवर पोस्ट केली आहे.
फ्रांसमधल्या कैन्स इथल्या रेड कार्पेट फिल्म फेस्ट विषयीची पोस्ट आहे.
Basically I am not a film buff,तरी पण या चित्रपट महोत्सवाच्या पोस्टस वर मी लक्ष ठेवून असते.
तसेही हल्ली आपल्या ऐश्वर्या,सोनम,दिपिका,मल्लिका अशा ग्लैमरस तारका फार उत्साहाने इथे कैन्सला नेत्रदिपक हजेरी लावतात.त्यामुळे आपल्याकडेही हल्ली हा महोत्सव सोशल मिडियावर सतत चर्चेत असतो.
मी मात्र या जागतिक तारकांच्या ड्रेसेस,गाऊन्ससाठी या फेस्टवर नजर ठेवून असते.भले मग त्या तारका ऐकून सुध्दा माहित नसल्या तरी चालतात.पण त्यांचे ते खरोखरचे डिझायनर गाऊन्स बघणं आणि थोड्याशा जाणकारी नजरेने मापणं..yess..I enjoy it immensely.
सगळ्याच तारका म्हणजे भुतलावरच्या चांदण्या किंवा प-याच वाटाव्यात असे त्यांचे थाटबाटी कपडे असतात.
काय ते रंग,पोत,चुण्या,घड्या,सुरकुत्या,जाळ्या,नाड्या,बोज,
बैकलेस,स्ट्रैपलेस,घोळदार,लांडे-लुंडेपण,भरतकाम,चमक-धमक,नेमक शरीर झाकणारं अफलातून फिटिंग्ज्(कधीतरी त्याचही माल फंक्शनींग),शिळी फैशन,डिझाईन्सची चोरी,पुर्व-पश्चिमेचे सनातन झगडे,
फार मजा येते हे सगळं बारकाईने बघताना,वाचताना,टिपताना.फैशनच्या दुनियेतला हा कुंभमेळा असावा.त्याचही तत्कालीकचं महत्व.
पण त्यासाठी घेतलेले श्रम,कल्पनेच्या भरा-या स्तिमित करणारं.
डिझायनर्स डिझाईन कन्सिव्ह करुन ही कापडं कशी बेतत,कापत,शिवत असतील आणि घालणारी ऐन दिवशी हा गाऊन कसा चढवत असेल बरं अंगावर ? एकटी का कुणाची मदत घेऊन ?अशा कपड्यात चालणं,मदती शिवाय घोळ उचलणं,खास पोजेस देणं,गाडीतून उतरणं,सुटकेसेसमधे हे अवाढव्य गाऊन्स कोंबण-भरणं...एक ना दोन असे अनेक बेसिक प्रश्न मला पडतात.
मुळातच वेस्टर्न कल्चरमधे खुप सिंपल पण स्पेसिफिक कटचे कपडे प्राधान्याने घालायचा ट्रेंड आहे.रंगाचही वैविध्य माफकच असतं.तरी पण दर वर्षी अनेकींसाठी इतके निरनिराळे आणि हटके डिझाइन्स देणं म्हणजे डिझायनर्सची खरंच कमाल वाटते.किती आधीपासून तयारीला लागत असतील सगळेजणं.
खर्चाची तर गोष्टच नको.सगळी जरा वरवरचीच-खोटी दुनिया आहे ही,पण या क्रियेटिव्हिटीसाठी मला या फेस्टिवलचं कौतुक आहे.माझ्या पुरतं.
कधी तरी हे कपडे हात लावून,जवळून,उलट-सुलट करुन बघायची,कापतानाच्या,शिवतांनाच्या टप्प्यात बघायची मला फार इच्छा आणि अतोनात उत्सुकता आहे.
काही वर्षांपुर्वी आमच्या हिरण्यच्या परिसरात कुणाल कोहलीच्या 'तेरी मेरी कहानी'चं शुटिंग होतं.प्रियंका चोप्रा आणि शाहिद कपूर असलेला हिंदी चित्रपट.
या दोघांना बघायला खुप गर्दी व्हायची.पोलिस तैनात करावे लागले.शुटिंग क्रुची सर्व प्रोपर्टी हिरण्यलाच ठेवली होती.दोन्ही कलावंतांच्या व्हैनिटी व्हैन्स पण आमच्या इथेच लागायच्या.तमाम पब्लिक या दोघांच्या दर्शनासाठी वेडी झालेली.एक दिवस सगळं युनिट शूटला गेलं कि मी हळूच परवानगी घेऊन या दोघांचा वॉर्डरोब बघून आले.प्रियंकाचा पंजाबी कुडीचा रोल होता.झाडून सगळे पंजाबी-पतियाला ड्रेसेस.
फुलकारीचे चटकदार भरतकाम,साधी वॉयलची रंगीत कापडं.अत्यंत फिटिंगचे कपडे.इतका छोटा आणि काटकोळा बांधा आहे प्रियंकाचा.ते कपडे तिला येतातंच कसे असा मला प्रश्न पडला.टकाटक कपड्यात,राहणीमानात,झगझगाटात आपल्याला काही कळत नाही.डोळे मात्र नक्कीच दिपतात आपले.
लंचला गाडीत येऊन बसले कि एक बॉय दोन-चार कपडे घेऊन गाडीत जाणार.डायरेक्टरच्या संमतीनेच ड्रेस ठरणार आणि पुढच्या शॉटला तोच घालावा लागणार.
या इतक्या छोट्या(?) गोष्टींसाठी-मुळे चित्रपट दुनियेत रामायणं घडतात..एक्सप्लोयटेशन केलं जातं..वगैरे.
असो.
या वर्षी ऐश्वर्या,दिपिकाने बाजी मारली.But Dipika does have an edge over Aishwarya for sure.
आता जागतिक चित्रपट महोत्सवात चित्रपट आणि त्याच्या विविध अंगांची चर्चा करायची का या चांदण्यांच्या ब-या-वाईट कपड्याची मापं काढायची हा कळीचा मुद्दा आहेच.पण माझ्यासाठी मात्र ही नेत्रदिपक,चमचमती गैलरी म्हणजे एक पर्वणीच आहे.
No comments:
Post a Comment