अभिजात महाराष्ट्रसाठी आलेल्या बेंगलुरुच्या महिला कलावंत कार्यक्रमासाठी आल्या ते फार वेळेवर.येई पर्यंत दडपणंच होतं.पण मग परतीचं विमानही दुस-या दिवशीचं उशीराचं.
साहजिकच मग वेरुळ दर्शनाचा घाट घातला.नेमका मंगळवार वेरुळ बंद.मग फक्त घ्रुष्णेश्वर दर्शन ठरवलं आणि बाराच्या बेतात निघालो.कलावंत दक्षिण भारतीय असल्यामुळे ज्योर्तिलिंग दर्शनासाठी फारच उत्सुक.
शिर्डीमुळे या मंदिराला जरा बरे दिवस आले आहेत.अगदी डोळ्यासमोर मंदिराचा नक्षा बदलत आहे.भरपूर दुकानं..मागोवा घेणारे विक्रेते..टिळ्याचे छापे मारणारे..
जाळीबंद देवस्थान.मोबाईलही सरंडर करायला लावतात आजकाल.बायकांना तरी पर्सेस असतात मोबाईल लपवायला.पण पुरुषांची मात्र खरोखर सगळ्यांसमोर लाजीरवाणी झडती घेतली जाते. फिक्कन हसू आलं.
पावतीवाल्यांचा 'फक्त एक ते शंभर रुपयाचे दान,only donation..no compulsion असा घोष चालू.
आमचे भक्त खरे चौकस.कुठलही फार खास वैशिष्ट्य नसलेलं हे मंदिर.पण या बायकांनी दशावतार,दत्त,कृष्ण,बळी...काय अन काय देव-देवता त्या ढोबळ गोपूरातून शोधून काढले.
जाळ्यांमधून फिरतांना काही मंत्र-श्लोकांच सुरेल जप मात्र सुरु होता.पिंडीजवळ तर अजूनच तन्मयतेने मंत्रघोष चालू झाला.त्यांनीच विकत घेतलेली फुलं आणि बेल पान पिंडीवर वाहून मी आपली कोप-यात उभी राहून बाकी कारभार निरखत होते.मराठी,गुजराती,दक्षिणी भक्तांची माफक गर्दी.बाराला आरती होते म्हणे.पत्रावळींवर प्रसादही वाटला जातो म्हणे हल्ली.हल्ली इथले तमाम भटजी काळ्या पैन्टस आणि वर उघडे असेच असतात असं वाटतयं.पैन्टचा बेल्ट भगवा वापरायची शक्कल अजून कोणी कशी लढवली नाही बरं ?
आतले सगळे पुरुष भक्त शर्टस् काढून...पाठीच्या पन्हाळी दाखवत...तर बायका झुकून शिवलिंग को सिनेसे लगाते हुवे...काहीही.करमणूक आहे झालं !
एवढ्यात एक मातीचा माठ पिंडीवरच्या अभिषेक पात्राच्या ठिकाणी लटकवण्यात आला.
आजपर्यंत स्टील,पितळ,तांबं,चांदीचे अभिषेक पात्र पाहिले होते पण चक्क मातीचा माठ पहिल्यांदाच पाहिला.विचारलं तर भटजीबुवा म्हणे फक्त हे चार महिने माठ वापरतो.पिंडीला गारवा मिळावा म्हणून.लॉजीक पुढे थक्क झाले.
इकडे एकाग्रतेने दक्षिणी मंत्रोच्चार चालूच.बाहेर सभामंडपात आले तर एक भटजीबुवा भक्कम कोरीव चौरंगावर बसून भक्तांना तिर्थ देत होते. उजव्या हाताच्या बोटात किमान आदपाव वजनाच्या चांदी-सोन्याच्या अंगठ्या. बहूदा त्यांची जायची वेळ झाली होती.दक्षिणाही फार जमलेली दिसत नव्हती.काम आटोपतं घेत नारिंगी वुलन बॉल(गंड्यासाठीचा.. गडांतर दूर करणारा) त्यांनी पिशवीत टाकला.भगभगीत नारिंगी उन्हाळी रुमाल डोक्याला बांधला आणि ते निघाले.एकूणच सध्या भगवा फळफळलाय.
बरेच मुद्दे होते.लक्षात तरी किती ठेवणार.काढली डायरी आणि बसले लिहायला.
गर्दी वाढली...शर्ट काढाहो...अहो बनियन पण...
सभामंडपातील अनेक कोनाडी देवांपुढेही मंडळी नतमस्तक होताहेत.प्रत्येकाची देवासमोर नतमस्तक व्हायची त-हा वेगळी.
क्रॉस हातांनी आपलेच कान धरायचे तीन-पाच वरवरच्या उठाबश्या काढायच्या.स्वतःलाच गालात मारुन घेत तोबा-तोबा करायचं..हाताच्या मुठी कानशीलाजवळ ठोकायच्या...साष्टांग दंडवत घालायचे...who says we are egoistic ?
तशीच विविध त-हा तिर्थ घेण्याची आणि प्राशन करण्याची पण. एकेक पध्दत बघण्यात मस्त वेळ जातोय.
शेवटी एका पुजा-याला वाटलं मी फारच इंप्रेसहून काहीतरी टिपून घेत आहे.मैडम चलो मै आपको सब मुर्तीयोंके बारे मे बता देता हूं..ये कार्तिकेय है...मुझे नही उनको समझाओ म्हणून आमच्या कानडी कलावंताकडे त्यांना पाठवलं.त्याही कौतुकाने सभामंडपात शिल्प ओळखून घेत चांटिंग करत फिरल्या.तिथेच कोप-यात छोटे-मोठे(हजारी हिशेबात) अभिषेक,लघु-महा पुजा चालू आहेत.कुठलं तरी वांड लेकरु-तरुण,लग्नाळलेली प्रौढा,कावलेला गृहस्थ,अपत्यहीन दांपत्य,संकटग्रस्त कुटुंब सश्रध्दपणे पुजेला बसलेत.
आणि इकडे आमच्या कानडी भक्त नंदीच्या शिंगातून शिवपिंड बघताहेत...बघून हसूच आलं.हा खेळ आम्ही लहानपणी करायचो.
पाऊस-व-यात झिजून पार ढोबळ झालेले नंदी आणि पिंडी दोन-चार ठिकाणी परिसरातच जागवले जात आहेत.
येणा-या भक्तांची नाडी ओळखून मंदिराने कात टाकली आहे.
काळाची पावलं जाणली आहेत.टकाटक पावती ऑफिस थाटलं आहे.
दर्शन जितकं अवघड,जिकीरीचं कराल तेवढं स्थान महात्म्य वाढणार !
Simple funda.

No comments:
Post a Comment