अभिजात महाराष्ट्रचा पहिला कार्यक्रम यशस्वी झाला.जाणकारांच्या मते इतक्या दूरच्या पहिल्याच कार्यक्रमाला इतके लाकं उत्साहाने आले हेच खुप आहे.त्यामुळे माफक गर्दी हा दिलासा होता.पण तारीफ जरी खूप झाली तरी आर्थिक आणि नियोजनाची सगळी मेहनत आम्हालाच करावी लागली.No doubt..the idea was ours.But we wanted all organizations and institutions should come forward and celebrate unitedly.पण तसं काही झालं नाही.दुस-यांवर सर्वच बाबतीत अवलंबून रहाणं आम्हाला पटेना.मग ठरवलंच आपला कार्यक्रम आपणचं सगळं माहित करुन निर्णय घ्यायचा.
पहिला निश्चय म्हणजे येत्या वर्षातले सगळे सांगितीक कार्यक्रम अटेंड करणे.त्या विश्वात डोकावून सगळ्यांच्या ओळखी करुन घेणे.आपली कल्पना त्यांना सांगणे.गान क्षेत्रात काम करणा-यांनी खूप उत्साहाने दाद दिली.दुस-या वर्षीच्या कलावंत निवडीत भरपूर योगदान दिलं.मानधनाच्या वेळेस अशा संपर्काची मदतच होते.आधी मी या कलावंतांशी बोलायच म्हटलं कि बिचकायची.ती माझी भिड या सहका-यांमूळे ब-याच प्रमाणात कमी झाली. मीही नेटवरनं बरीच माहिती जमा केली.वर्षभरातली संगीत क्षेत्रातली उठबस बरच काही शिकवून गेली.स्वबळावर कलावंत ठरवले.मानधन ठरवलं.
मग परत आपलं ये रे माझ्या मागल्या.स्पॉन्सरर्स शोधायला लागलो.लोकांना वाटायचं तुमचा प्रोग्राम तुम्ही करा.
No one could buy the idea of having a city-state festival togetherly.
असो.पहिल्या वर्षीच्या चुका टाळल्या.नियोजन जास्त आखीव केलं.मोबाईल,whatsappचा भरपूर वापर करुन लोकांपर्यंत पोहोंचलो.औरस-चौरस छळवादी उन्हाळ्यात हिरण्यच्या नैसर्गिक गारव्यात..जांभुळलेल्या सांजेत..वा-याच्या मंद झुळकांबरोबर सुर-तालांचा आनंद घ्यायला लोकं आनंदाने आले.
औरंगाबादचीच उदयोन्मुख मेहनती कलावंत सावनी गोगटेचं तयारीचं गायन,त्यानंतर तरुण-उमदा कलाकार शाकीर खान यांच दमदार सितार वादन आणी त्यानंतर मुळचे औरंगाबादचेच पण आता गोव्यात असलेले शशांक मक्तेदारांच सुश्राव्य गायन...मैफिल उत्तरोत्तर रंगतच गेली.पंडीत सुरेश तळवलकरांची उपस्थिती आणि कौतुकाची थाप विशेष उमेद वाढवणारी ठरली.
जे पाहिजे असतं ते मिळालं जरी नाही तरी दुस-याच बहुमोल चिजा अनुभवाच्या पोतडीत पडतात हे मात्र खरं.
दुस-या दिवशी कार्यक्रमा विषयी फेसबूकवर काही पोस्ट करायला लॉग इन केलं तर साताठ कलावंतांच्या कुठून-कुठून फ्रेंड रिक्वेस्ट्स आलेल्या.हे ही कार्यक्रमाचं निखळ यशंच आहे!
नाही का ?

No comments:
Post a Comment