कधीचा हा विषय मनात घोळत होता.काही ना काही कारणाने हा ब्लॉग मागे पडत होता.शेवटी आज मातृदिनाचा मुहूर्त गाठलाच आणि आज हे लिखाण करायचच असं ठरवलं.
आज मी माझ्या आईच्या आई विषयी लिहीणार आहे.
कौसल्याबाई रामदासराव कोळनूरकर.माहेरचं नाव हरणाबाई घन.ही माझी आजी माझ्या आजोबांची दुसरी पत्नी.पहिली एका मुलाला जन्म देऊन लगेच वारली.माझे मामा बाळपणी दुस-या दुधआईकडे वाढले.माझे आजोबा फार सुधारक.
विधवांची लग्न लावून देणे.हरिजनांना विहिरी,मंदिरं मोकळी करुन देणे अशी कामे ते हिरिरीने करत.त्यांना त्यांचा दुसरा विवाहही विधवेशीच करायचा होता पण बहूदा घरच्या दबावामुळे त्यांनी माझ्या या कौसल्या आजीशी विवाह केला.
हिने तीन सुस्वरुप मुलींना जन्म दिला.आजोबा फार देखणे होते तिच्यापुढे.आजी स्वभावतःच गरीब.आपण बरं आपलं काम बरं.दोन जावांसह एकत्र कुटूंब.माझे आजोबा कायम नांदेडला बाहेर.समाजकार्य,राजकारण आणि वकिली करत.तर चुलत आजोबा गावी,घरात.त्यात जावेला पुत्रसुख मिळालेलं.हिला नाही.मागे राहणारी ही मागेच राहीली.
साहजिकंच मुलं सुध्दा जो पुढे असतो त्याचचं नावं ओठी घेतात.मग हिचं कर्तृत्व स्वैपाकघरापुरतंच राहीलं.पण मग पुढे शिक्षणासाठी माझी आई व मावश्या नांदेडलाच आल्या.
आजोबा मुलींच्या शिक्षणाबद्दल फार आग्रही होते.पण येनकेन प्रकरणे त्यांनी मुलींची लग्न फार लवकर केली.
आम्ही सत्तरला औरंगाबादला आलो.मी सात-आठ वर्षांची होते.परभणी का हिंगोलीला एका लग्नातला एक प्रसंग मला स्पष्ट आठवतोय.माझी आजी लग्न घरात साडी बदलत आहे.आणि जवळच आई आणि मावशी बोलल्या..हे बघ हल्ली आई कशी लटपटत ऊभी रहाते.हल्ली तिला निट चालता पण येत नाहीये.
मग मधलं काहीच आठवत नाही.जे आठवतं ते म्हणजे तिने कमरेखालून पंगू होणं.आणि उपचारासाठीच्या घाटीतल्या आजोबा-आई-बाबांच्या चकरा.पायच गेल्यामुळे ती कायम बसलेलीच रहायची.संडास-बाथरुमला जायचं असेल तर तिला फरकतंच जावं लागायचं.तेंव्हाचं नांदेड-बीड व मराठवाडा म्हणजे डब्यांचे संडास..दुरचं न्हाणीघर.तिचं अश्या ठिकाणी रहाणं शक्यच नसावं.त्या उलट आमच्या कोटला कॉलनीत घरातच आमने-सामने संडास(फ्लश)-बाथरुम होतं,तेही समतलावर.त्यात पुन्हा घाटीसारखा विख्यात दवाखाना होता उपचारांसाठी.त्यामुळे हे आजी-आजोबा खुप राहिले आमच्याकडे.आईला(आजीला)भेटायला म्हणून मुंबई आणि वसमतच्या(परभणी जिल्हा) मावश्या मुलांसह आमच्याकडेच यायच्या.तीन सरकारी खोल्या,जेमतेम ५०० sq ft.त्यात आम्ही सहा जणं,दोन मावश्या,त्यांची सहा मुलं आणि आजी-आजोबा असे किमान महिनाभर तरी एकत्र रहात असू.त्यात आजी पांगळी.तिचे प्रत्येक विधी म्हणजे एक वेळखाऊ आणिबाणीचं असायची.
सकाळपासून ते रात्रीपर्यंत तिला मदतच करावी लागायची.
तोंड धूणं,संडास-बाथरुमला जाणं,आंघोळ करणं,पातळ नेसणं,वेणी-फणी करणं..आज आठवलं तरी मला आईपेक्षा आजीचीच कमाल जास्त वाटते.
मुळचीच गरीब त्यात या दुखण्याने तर ती फारच शांत-अबोल झाली.आज इतक्या सुवीधा असूनही कुणाच दुखणं काढायच म्हटलं कि जिवावर येतं.तेव्हा कसं केलं असेल या लोकांनी?
आजोबा काय,माझी आई काय,वडील काय ?
या लोकांच्या सोशिक ऊर्जेची कमाल वाटते.
घाटी,एक्सरे,डॉ.मारवा,नर्सेस,ऑपरेशन,रिक्षाने जाणे-येणे,खाणं-पिणं..आठवलं तरी अंगावर काटा येतो.
त्यात माझ्या आईचं चौथं बाळांतपण झालेलं.मुलगा झाला.कोप-यावरच्या मारुतीला आजीने गुळ-फुटाणे कबूल केलेले.माझा चुलतभाऊ आणि अजून कुणीतरी तिला बगलेतनं उचलवून तसच खुरडत,खुरडत मंदिरात नेऊन आणलेलं संध्याकाळी.
I still see that picture vividly.
आजोबा नांदेडला जाऊन-येऊन असायचे.बहूदा मधे एखादं ऑपरेशन पण झालं तिचं.मुंबईतही बॉम्बे हॉस्पिटलमधे दाखवलं पण सगळं व्यर्थ ठरलं. तिचं पांगळेपण काही निट झालंच नाही.घाटीत फिजीयोथेरपी करवून घ्यायचे.पण रोज जाता-येता तिला रिक्षात चढवणं-उतरवणं फार कठीण होतं.थकलेले आजोबा एका जोशात तिला उचलायचे.कधी आई-बाबा-शेजार-पाजारी-रिक्षावाले कुणीही मदत करायचे.
फार कानकोंडं व्हायचं आजीला पण इलाज नव्हता.माझे आजोबा निसर्गोपचार,आयुर्वेदवाले.घरच्या घरी तेही प्रयोग करायचे.कुणीतरी सांगितलं पारव्याचं रक्त लावा पायांना,फरक पडेल.पटो न पटो तेही केलं.भंग्यांनी आम्हाला पारव्याचं रक्त आणून दिलं.ते लावलं.
आम्ही छोटे.कॉलनीही कच्च्या बच्च्यांची च्याव-च्याव करणारी.
चार इमारतींच्या चौकात अगदी चर्चा असायची पाध्येबाईंची आई आणि त्यांच दुखणं,दवाखाने,उपचार,वाजत-गाजत रिक्षाने घाटीत जाणं-येणं.आई फार समर्थपणे हे सगळं सांभाळायची.(हे आत्ता जाणवतय)
आजीचं तिला फार निस्तरावं लागायचं.फरकत-फरकत जाईपर्यंत तिला कधी शु होऊन जायची.मग पातळ(अश्या अवस्थेतही ती नऊवार नेसायची)भरायचं..फरकतांना त्याची ओल पसरायची.घरात जावाई..नको इतके चौकस आम्ही..आजीला अगदी मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं.पण आई सगळं बिनबोभाट निस्तरायची. सकाळी लवकर उठून तिची भरलेली पातळं स्वतःच धुवायची,दुसर्या मजल्यावरच्या गच्चीत ऊन्हाला टाकायची.न्हाऊ घालायची.याबाबतीतली तिची किंवा बाबांचीही कटकट मी कधीही ऐकली नाही.आसपास आईच्या या कष्टाळूपणाचं कौतुक व्हायचं.
उलट वाढत्या वयात मलाच लाज वाटायची या सगळ्या भानगडींची.कधीतरी मैत्रीणी आल्या कि म्हणायच्या कसला वास येतो गं या खोलीत.काय सांगणार ? मी त्यांना घरी बोलावणंच बंद केलं.
या माझ्या आजीने मला बसल्या-बसल्या स्टोव्हवर संक्रांतीचा तिळाचा,मुरमु-यांचा हलवा करायला शिकवलं होतं.आईलाही ती नेहमी म्हणायची दे गं शालू स्टोव्ह मला,मी बसल्या-बसल्या पोळ्यातरी टाकते. किती तुझी तडतड होते. पण छोट्या,किलबिलत्या घरात ते शक्य व्हायचं नाही. तिला सगळं जागेवर द्यावं लागायचं.आम्ही जाता-येता दिसलो कि ती ओट्यावरंच माठातलं गार पाणी मागायची.खेळात लक्ष असल्यामुळे मी नेहमीच तिला घाईत अर्धा पेला पाणी देत असे.तिची तहान भागायची नाही.आणि अवखळ नातीला परत-परत पाणी मागायला तिला संकोच वाटत असे.तरी एकदा तिने आईला हे सांगितले असावं.मग आईने मला समज दिली.
मला वाटतं पाच-सहा वर्ष तिने अशीच काढली.आईची फार तगमग व्हायची आपली आई इतकी परावलंबी झाली म्हणून.
त्याकाळी सिनेमात एक चमत्कार दाखवत.काहीतरी सनसनाटी ऐकलं,बघीतलं,अनुभवलं कि तक्षणी एखादी अपंग व्यक्ति ठणठणीत होत असे.लंगडा माणूस चालू लागत असे.डोक्याला मार बसला कि गेलेली स्मृती,नजर,वाचा परत येते असे.आईला नेहमी असं वाटायचं कि काहीतरी असंच सनसनाटी घडावं आणि हिने तडक उभं राहून चालू लागावं.आजोबांनीही सगळ्या पध्दतींचे उपचार केले.दोन-चार महिने नगरच्या जवळपास सोनईच्या महाराजांकडेही आजीला ठेवलं होतं.मग आईचं तिला भेटायला जाणं.थोडी बस,थोडी शेयर टेंम्पो..कसरत करत,धडपडत जायची,भेटायची आणि परतायची.
शेवटी सगळ्यांनी हार मानली तिच्या पंगूपणापुढे.मग आजोबांना तर वेगळीच चिंता लागली.हिच्या आधी मी गेलो तर हिचं कसं होईल?मुली करतील पण त्यांनाही त्यांचे ऐस-पैस संसार होतेच नां. ते नेहमी आईला म्हणायचे माझ्या आधी ही जावी,म्हणजे मी निश्चिंतपणे मरायला मोकळा.आणि झालंही तसचं.
सतत बसून-बसून तिचं शरीर अवजड झालं.हालचाल तर नव्हतीचं.बेडसोयर्स झाले.परत दवाखाना-घर-दवाखाना वा-या सुरु झाल्या.कितीही स्वच्छता पाळली तरी आजार आटोक्यात येईना.घरभर वास भरुन असायचा.करणा-यांनाही मर्यादा होत्या.घरी ठेवलं तर वेगळी अडचण,दवाखान्यात ठेवलं तर तेही त्रासाचचं.पण मग डॉक्टर्सनेही सांगितलं घरी नका ठेवू म्हणून.पण मग दवाखानाही पथ्यावर पडला नाही.तिलाही तिचा शेवट कळला.जावयांकडे मरायचं नाही या तिच्या स्त्रीसुलभ हट्टापाई तिला बीडला मामाकडे हलवले.इतका आजारी पेशंट नेणार कसा ? आजोबांचे दैनिक मरावाड्याशी आत्मीय संबंध होते.त्याकाळी रोजचे पेपर्स टैक्सीजने आसपासच्या गावात पोहोंचवले जात.मराठवाड्याचे अंक घेऊन पहाटे चारला ती डब्बा टैक्सी बीडसाठी निघत असे.
आदल्या दिवशी आजीला घरी आणलं.आधीच अबोल आणि सोशिक आता तर अजूनच आत्ममग्न,निस्तेज झालेली.
पहाटेच्या अंधारात तिला टैक्सीत झोपवून नेलं.मामाच्या घरी चार-आठ दिवस राहीली.परत तिथलाच दवाखाना गाठला.मृत्युवेळ जवळ आलेली.आई-मावश्या जमल्या.त्यांच्या देखत तिने प्राण सोडला.मला पुढचं काही आठवत नाहीये.बहूदा परिक्षांचे दिवस असावेत.म्हणून आम्ही कुणीच मुलं तिकडे गेलो नाहीत.
पुढे कितीतरी दिवस आई-मावश्या मऊसूत गरमभात खातांना आजीच्या आठवणीने खूप रडायच्या.आजीला मऊ गरमभात फार खावासा वाटायचा म्हणे.जो ती नेहमी स्वैपाकघरात असूनही खटल्याच्या घरात कधी मिळायचा नाही.
हे लिखाण करायचं होतं म्हणून ती नेमकी कधी गेली हे कंफर्म करायला पाच-सहा जवळच्या नातलगांना फोन केले.एकालाही आठवेना.आठवून,विचारुन सांगतो म्हणार्यांचा परत फोनही नाही.माझा आक्षेप नाहीये.मलाही आठवत नाहीच ना.पण तरी मन खट्टू झालं. एखादं अबोल,सोशिक व्यक्तिमत्व कसं सगळ्यांकडूनच झाकोळलं जातं हे बघून वाईट वाटलं.माझंही मैत्रीणींपुढे तिच्यामुळे लाजीरवाणं होणं आठवून गदगदून आलं.
आजोबांची अथक धडपड,आईने घेतलेले अपार कष्ट,बाबांचं सोशिक सहकार्य हे सगळं जमेचं असलं तरी माझ्या त्या अनेक अर्धा ग्लास पाण्याच्या धांदरटपणाला माफी नाही.
आजचं हे लिखाण म्हटलं तर माझ्या आजीचं आहे म्हटलं तर माझ्या आईचही आहे.पण खरं सांगायचं तर ते आईपणाच्या वृत्तीचचं जास्त आहे.

No comments:
Post a Comment