नविन वर्षाचा जानेवारी उगवायच्या आतच डिसेंबरमधे नव्या कालनिर्णय या कैलेंडरची खरेदी केली जाते.घरासाठी मध्यम आकाराचे व हिरण्यसाठी जंबो आकारातले दोन.हुरडा फेस्टिवल जोरात असतो.दत्त जयंती,मोहरम,संक्रांत असले धार्मिक सण,उपासाचे दिवस नियोजनासाठी फार लक्षात घ्यावे लागतात.
तर नविन कैलेंडर आणल्या आणल्या मागच्या पानांवरच रंजक भविष्य,काही रेसिपीज्,आयुर्वेदीक टिप्स वाचल्या की कैलेंडरची प्राणप्रतिष्ठा करायची,पण ती जुन्याच कैलेंडरवर.काहीही म्हणा मला जूनी कैलेंडर्स फेकवतच नाहीत.एकावर एक तीन-चार वर्षांची थप्पी लटकत जाते.Some how I just hate to part away with my calendars.
ही स्वैपाक घरातली कैलेंडर्स फक्त माझी आणि माझीच असतात.कारण त्या वरच्या नियमीत केलेल्या घराच्या,माझ्या काही नोंदी.
प्रत्येकच गृहिणी या नोंदी करत असेल पण मी जरा जास्त हळवी आहे या नोंदींबाबत.
कामवाल्यांचे नावानीशी ठरलेले पैसे,दिलेले पैसे..एडव्हांसची नोंद,दुधवाल्याचा रोजचा कमी-जास्तीचा रतीब,माझ्या वैयक्तिक ट्रिपच्या नोंदी,मुलं शाळेत होती तेव्हा त्यांच्या परिक्षांचे दिवस,विषय अशा नोंदी...एवढंच काय माझ्या पित्ताच्या ऐटेक्सच्या,पिरियेडसच्या नोंदी..असं बरच काही म्हटलं तर दैनंदिन गोष्टी,म्हटलं तर जिव्हाळ्याच्या,महत्वाच्या गोष्टी.
सगळ्यांचा तारीखवार,हिशेबवार नोंदी.किती तरी काळ टिपला जातो या कैलेंडर्सवर.विस वर्षांपुर्वीचे दुधाचे भाव,किती रतीब घ्यायचो,
कामवाल्यांची नावं-कामं,पैसे...it evokes so many memories of events,persons and other details.
व्यक्तिशः मला तर माझ्या पित्ताच्या,पिरियेडसच्या सांकेतीक नोंदी खूप महत्वाच्या वाटतात.शाळकरी वयापासून मला या पित्ताच्या त्रासाने छळलय.एकच दिवस प्रचंड डोकं दुखणं,आणि आतडी पिळवटून उलट्या होणं.
अक्षरशः तो एक दिवस म्हणजे आणिबाणीच असते.मै और मेरी बिमारी,और कुछ नही सारखं.भरपूर आयुर्वेदीक उपचार घेतलेत.आता बराच त्रास कमी आहे पण तुमच्या नैसर्गिक प्रकृतीला पुर्णतः नाही वेसण घालता येत.आयुर्वेदातल्या वासंतिक वमन क्रियेच्या नोंदी तर निटच ठेवाव्या लागतात.
तसेच ते नियमितच येणारे पिरियेडस.पित्ताचा अभ्यासकरताना या नोंदीचाही फायदा झाला.दिवस गेल्या नंतर थांबलेल्या नोंदी,मग बाळांतपणा नंतरचे पुर्ववत झालेले पिरियेडस् आणि त्याच्या बिनचूक नोंदी.
हे एखाद्या डॉक्टरच्या नजरेने पाहिलं तर it's a very natural biological phenomenon.
But for me it's an absolutely divine and life changing personal phenomenon's notes.
नुसती त्या वर्षीची पानं जरी उलटली तरी अंगावरनं मोरपिस फिरतं.
नुसत्याच छान आठवणी नाही तर काही कठीण दिवसही आठवतात.
आणि हे किती सुरम्यपणे फक्त माझं आणि माझंच आहे या कल्पनेनीच मनाच्या तळी आनंद तरंग उमटत रहातात.
It does have a very deep soulful feminine connection.
No other person can understand it.
तर ही अशी काजळाच्या तिटींसारखी,इतर-बितर नोंदींचा साज ल्यालेली आऊट डेटेड कैलेंडर्स नाही टाकवत.पण कधी तरी समजूतदार अनासक्तीला जोर येतो आणि त्यांचीही रद्दीत रवानगी होते.आज नाही तर उद्या हे अपरिहार्यच आहे.तरी पण पाच-सहा वर्ष निगुतिने सांभाळतेच आणि मग एक दिवस गंगार्पण करायच्या भावनेनीच त्यांंना नजरेआड करते आणि आल्या दिवसाला सामोरं जाते.
No comments:
Post a Comment