प्रवास म्हणला कि नियोजन,आखणी,शिस्तही आलीच.स्वतःच्याच वाहनाने प्रवास असेल तर वेळ,रिझर्वेशन अशा गोष्टींकडे फार लक्ष द्यावं लागत नाही.पण विमान,रेल्वे,बस म्हटली की त्यांची वेळापत्रकं,सोयी-गैरसोयी सगळं समजूनच प्रवासाचं नियोजन करावं लागतं.आम्हाला जरा आमच्याच गाडीने फिरायची जास्त सवय आहे त्यामूळे पब्लिक ट्रांसपोर्ट म्हटलं की जरा गोंधळच होतो.बस प्रवास नको वाटतो.रेल्वे मात्र सुसह्यच वाटते.पण आरक्षण नसेल तर घोळ वाढतंच जातो.आणि आपल्या पेक्षा ज्यांच्याकडे आपण जातो त्यांना जास्त त्रास होतो.त्यातही ते लोकं जर शिस्तीचे असतील तर विचारायलाच नको. परवाही असच झालं.अगदी काठावरच आरक्षण कन्फर्म झालं नाही तरी पण औरंगाबादला थेटच्या जनशताब्दीने निघालेच.एकटीच होते.बहीणीचं बसने जा म्हणून धोशा होताच,पण रात्रीचा बैठा प्रवास नको म्हणून तशीच भर दुपारी निघाले. टळटळ ऊन..जवळ जरी असलं तरी मुंबईत स्टेशनवर वेळेत पोहोंचणं एक थोर कर्मच आहे. कशी प्रवास करतेस गं तु ? इतकं ऊन,रिझर्वेशन नाही,गाड्यांना ऊन्हाळी गर्दी...कमाल आहे तुझी.जा रात्रीच्या बसने... अगं एक तर गाडी माझ्या गावात जाणारी..बोगीत कुणी ना कूणी ओळखीच भेटतचं.त्यात आम्ही साऊथ सेंट्रलवाले.त्यांच एक रिजनल ऑफिस नांदेडला आहे.रोज अप-डाऊन करणारे रेल्वेचे बहूतांश कर्मचारी हादगाव,मुखेड,धर्माबाद,लोहा या भागातले.आपली नाळ जुळतेच.Dont worry I will manage. असे प्रसंग बरेचदा येतात.एकटीचा प्रवास असेल तर काही वाटत नाही.टीसीला पटवायचं..नाही जमलं तर एसी चेयर कारच्या दारात उभं रहायचं.सततच्या येणा-या-जाणा-यांमुळे आतल्या गार हवेच्या झुळकांचा आनंद घ्यायचा.चहा-कॉफी,पाणी आणी फुटकळ विक्रेत्यांशी गप्पा मारायच्या.त्यांच विक्रीच नियोजन,कमाई,ठोकताळे,बरे-वाईट अनुभव..धडपड-मरमर-कष्ट..आणि सगळ्यात महत्वाचा माणूसकीचा जिव्हाळा.सचमें ठंडक पहूंचती है दिलको. केवढी एकजूट असते या विक्रेत्यांमधे.अपंग,दृष्टीहीन,लहान मुलं-मुली,वयस्क सगळे जण एकमेकांची फार काळजी घेतात या रोजच्या पण नव्या प्रवाशांनी भरलेल्या धावत्या रेल्वेत. कल्याणला चढतात..नासिकला उतरतात..अर्ध्या तासात परत नासिकला चढतात..कल्याणला उतरतात.बहूतेकांच वास्तव्य कल्याण आसपास..पहाटेच निघून माल भरतात आणि शक्य तितक्या जास्त वेळा अप-डाऊन करत माल विकतात.अपंगांना आणि छोट्या मुलींना विषेश दक्षतेने सांभाळून घेतात,भल्या-वाईट प्रसंगांकडे जातीने लक्ष देतात. चहा-कॉफीवाल्यांना फार जेमतेम कमिशन मिळतं..तेही शंभराच्या विक्रीवर.त्यामूळे पैन्ट्रीतून काही तरी नक्की विकत घ्यावं.निदान पैक्ड्य फुड आणि चहा-कॉफी तर घ्यावीच घ्यावी.घरी गेल्यावर आरोग्याचे धडे गिरवावेत. पैन्ट्रीच्या शेजारी एका छोट्या कंपार्टमेंटमधे यांची बसायची सोय असते.एकदा तर मी आरक्षण नसताना समजून-उमजून दोघा-तिघांचा शंभर रुपयांचा बैकलोग भरुन काढत या कंपार्टमेंटमधून प्रवास केला आहे.अर्थात या गमती आपल्या प्रांतातच बिनधोक ठरायची शक्यता जास्त असते हेही खरं. But Yesss...आपणही फार कंफर्ट झोनमधेच राहून जग बघायचा प्रयत्न करतो.मुळात आपण आपल्यालाच सतत बघत असतो,पण दुस-यांच्या नजरेतनं.There is hell lot of interesting life beyond 'OUR' comfort zone.And these experiences not only enriches your life but deepens your faith in goodness of humans. मग त्यासाठी दोन तास दारात ऊभं रहायला लागलं तरी किंवा दाटीवाटीने बसत,भांडत जनरल डब्यातनं यावं लागलं तरी काही फरक पडत नाही. As long as you are physically and mentally fit, go ahead with this kind of 'calculated' adventures. PS~~~इगतपूरीला बसायला जागा मिळाली.सुट्ट्यांचे दिवस..अख्खी बोगी लेकूरवाळी..अक्षरशः बावळं करुन सोडलं त्या दोन डझन पोरांनी.पण विक्रेत्यांची चांदी झाली. बसले.पाय बोलतच होते.दोन तास गरम आह्या झेलल्यावर बोगीतला गारवा अंगी भिनवत निवांत बसले.थोड्या वेळाने भरतकाम करायला जो सुई-दोरा काढला तो दौलताबाद आल्यावरच गुंडाळून ठेवला.
Sunday, 23 April 2017
सारे प्रवासी घडीचे...

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment