पुस्तकां विषयी लिहायचं म्हटलं तर किमान एक पुस्तक तयार होईल.त्यामुळे काही जुन्या आठवणी लिहीते. माझ्या आईचे वडील वकील,स्वातंत्र्य सैनिक,समाज सुधारक असे होते.त्यांची कर्मभुमी कंधार आणि नांदेड. तर तेव्हाच्या(पारतंत्र्य,ब्रिटिश,निझामी) कंधार सारख्या छोट्या पण ऐतिहासिक गावात पहिलं पुस्तक ग्रंथालय सुरु केलं ते माझ्या या आजोबांनी.आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे,व्याख्यानमालांमुळे ते ग्रंथालय नावारुपालाही आलं.मी लहानपणी तिथे गेलेली आठवतं मला. पण आश्चर्य म्हणजे १९९०च्या आसपास मला माझ्या नव-याच्या ऑफिसमधे एक जूनाट पुस्तक टेबलावर सापडलं.पाहिलं तर ते कंधारच्या ग्रंथालयाच होतं.कुणी तरी विसरलं जरी असलं तरी योगा योगाची गंमत वाटली. हेच दादा आजोबा मी दहावीत असतांना उन्हाळ्यात आमच्याकडे आले होते..खिरीचं जेवण जेवले आणि भर दुपारी सर्वांदेखत बघता बघता मेसिव्ह हार्ट ऐटेकने गेले.दोन दिवसांनी कळलं त्याच दिवशी ते सकाळी एसबीच्या कुठल्या तरी विभागाच्या ग्रंथालयाच उदघाटन करुन आले होते ते. नांदेडहून औरंगाबादला रहायला आल्यानंतर आमच्या एका आते-चुलत इंजिनियर भावाने फार कौतुकाने आम्हाला चार आणे-आठ आण्याची रशियन पुस्तकं भेट दिली होती.एकेका पानावर दोन-चारच ओळी असायच्या पण पानभर एकसे एक चित्र असायची.मग बाबाही आम्हाला इंजिनियरींग कॉलेजमधल्या त्या प्रदर्शनाला घेऊन गेले.परत रुपया-दोन रुपयांची पुस्तकं चित्र बघून खरीदलेली आठवतात. ईवान नावाच्या लहान मुलाची आणि त्यांच्या चार बदमाश मोठ्या भावांची कथा पुसट आठवते.एका पुस्तकात एक उंदरीण का खारुताई आपल्या लहान मुलांचे गोंडस कपडे दोरीवर वाळत घालत आहे असं दृश्य होतं.झाडं-पानं-फुलपाखरं..दो-या-बकेट-पिना आणि ऐप्रन घातलेली ऐटबाज आई खारुटली...माझ्या आईने तिने शिवलेल्या अनेक बाळांतविड्यातल्या प्रत्येक लॉन्ड्री बैगवर हे दृश्य-चित्र भरतकाम करुन अक्षरशः अजरामर करुन ठेवलयं. एकदा कॉलेजवयीन आम्ही दोघी बहिणी बाजारात जात होतो.रस्त्यातच सोवियत पुस्तकांच दुकान होतं...डोकावलो..रशियन लेखकांविषयी काही माहित नव्हतं,पण हार्डबैकची पुस्तकं अत्यंत कमी किमतीत पाहून दोन घेतली.त्यातलं एक मैक्झिक गॉर्कीच 'मदर'हे आहे. घरी आल्यावर आई-बाबांना कौतुक कम धास्तीही वाटली की मुलींना पंख फुटायला लागलेत म्हणून.माझे वडील वाचनप्रिय होते पण म्हणून त्यांनी आमच्यावर फार सहेतुक वाचन संस्कार केले असं नाही.त्यांना बघूनच आम्ही घडलो.पण शहरातली आटोक्यातली सगळी ग्रंथालय पायतळी आलेली होती ती त्यांच्याचमुळे. मी पुण्यात असतांना फार काटकसरीत रहायचे तरी पण दर रविवारी डेक्कनच्या इंटरनैशनलच्या पाय-यांवरन कोणतं तरी जूनं पुस्तक घ्यायचेच विकत.एकदा औरंगाबादच्या जोशी ब्रदर्सच्या चौकातल्या पथारीवरनं एक पुस्तक ऐकीव ज्ञानावर उचललं.ते होतं विल्यम गोल्डींगच लॉर्ड ऑफ द फ्लाईज हे.आणि त्याच दिवशी त्या लेखकाला नोबेल पुरस्कार मिळाला. मी माझ्या वडीलांच्या घरी एक छोटी लायब्ररी चालवायचाही खटाटोप करुन पाहिला आहे.वडीलांच्या मुळ गावी एक गावायोग्यतेची लायब्ररी काढायचा मानस फार दिवसांपासून आहे तसचं दौलताबाद परिसरातही काही करावं असही वाटत रहातं अधून-मधून.घरचीही कपाट ओसंडताहेत.लायब्ररीजही चालू आहेत.पण मग त्यामानाने सध्या वाचन मात्र फार कमी आहे. तरी पण एक नियम पाळतेच पाळते.पुस्तक प्रदर्शनात गेलं की रिकाम्या हाताने परतायच नाही.भले ही विस रुपयांच रांगोळीच पुस्तक घ्या.पण प्रसाद घेऊनच परतायच. घरातल्या सगळ्या पुस्तकांकडे म्हातारपणची बेगमी म्हणून जरा दुर्लक्षच होत आहे. सध्याचा माणसं वाचायचाच झपाटा आहे तर तेच समरसून करु असं ठरवलयं.देखते है आगे होता है क्या ? पण एक मात्र नक्की खरं. जसं निसर्गात फिरताना झाडा-पाना-फुलांची नावं,वैशिष्ट्ये नाही कळली तरी एकुणच हिरवाईने चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते,तसचं पुस्तकं पानो पानी नाही समजली तरी त्यांच्या लागट सहवासात फार श्रांत वाटतं.
Monday, 24 April 2017
पुस्तकं...

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment