सकाळीच PMO मधून एक मेल.Encourage citizens to avoid petrol/diesel for a day.
चहा घेताना विचारात पडले,खरंच प्रत्येक कुटुंबाने महिन्यातला एक दिवस डिझेल-पेट्रोल न वापरता घालवला तर काय होईल.थेंबे-थेंबे तळे साचे या न्यायाने पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची बचत तर होईलंच पण एक चार-पाचजणांच कुटुंब एका आदर्शवादाने बांधलं जाईल.एका चांगल्या हेतुने एकत्र येईल.जमल्यास वेळ एकत्र घालवतील,वैचारिक देवाण-घेवाण करतील,हलक्या-फुलक्या मनोरंजनात रमतील.याचे फायदे वैयक्तिक स्तरावर खुप होतील.कल्पनेनीच फार सुखावून गेले.
नाही तरी कुठल्याही प्रकारच्या बचतीवरुन घराघरात तु-मी होतंच असते.त्यात सध्या ऊन्हाळा.आपलीच मुलं वैताग आणताहेत.
पाण्याचा अपव्यय,सतत पंखे,एसी,लाईटस् चालू.कायम आपणच लक्ष ठेवायचं आणि कधी तरी बोललं की झकपक ठरलेलीच.आपलं शिक्षण,मुलांचा घेतलेला आभ्यास,सामाजिक जागरुकता..नाही म्हटलं तरी आपल्या जाणिवा प्रखर झालेल्या असतात.त्यात हे एनर्जी कन्झर्वेशन,नैचरल रिसोर्सेस,रिसायकलिंग इत्यादी पोपटपंची इंग्रजी शाळेत शिकलेल्या,प्रोजेक्ट्स केलेल्या तरुणांच असं कशाचही देणं-घेणं नसल्यासारखं वागणं फार तापदायक होतं.
शिक्षण फार आत झिरपत नाही हेच खरं.
फक्त आपल्या घरापूरता,मुलांपूरता विचार केला तरी मन उद्विग्न होतं.
का नाही ही मुलं डोळसपणे जगू शकत? का अशी बेदरकार असतात.अगदी छोट्या-छोट्या गोष्टी असतात.डोक्याने ठरवलं आणि हातात बसलं तर कुठलीही गोष्ट-काम कटकट वाटत नाही.
कष्टकरी वर्ग हजार-पाचशेसाठी महिनाभर वाट्टेल तसा राबतोय आणि महिन्याचं लाईट बिल हजार-दोन हजारांनी वाढलं तरी आपल्याला काही वाटत नाही ?
शहरकुसा बाहेरच्या गावांना बारा-बारा तासांच्या लोड शेडिंगमधे जगावं लागणं,शहरवासियांना महिन्यातनं दोन-तीन हजारांच पाणी विकत घ्यावं लागणं is a challenge to our consciousness and education system.
थोडीशी जागरुकता आपलेच चार पैसे आणि या वसुंधरेचाही मुठभर जीव वाचवतील नाही का ?
No comments:
Post a Comment