सालबादा प्रमाणे ऊन्हाळ्या बरोबर लग्नांचीही जंत्री सुरु झाली आहे.ऊन-पाणी-सुट्ट्या,गर्दी कशालाही भिक न घालता लग्न धुमधडाक्यात होतील.बाजार ओसंडून वाहताहेत.आग्रहाची आमंत्रण जाताहेत.जिथे जायचय तिथलं तापमान,प्रवासाच्या सोयी बघतच नाईलाजाने पाहूण्यांना निर्णय घ्यावा लागत आहे.
आपल्या लहान-थोर गणगोतांना एकगठ्ठा भेटायची उत्सुकता,असोशी तर असतेच,पण हल्ली आहेराचही एक वेगळंच टेंशन असतं.हल्ली घरटी मुलं कमी म्हणून कार्यही कमी,त्यामुळे एकमेकांना भेटणही कमी होतं.पण त्यामुळे होतं काय की कार्य करणारा सगळं बळ आजमावून धुमधडाक्यात कार्यक्रम करतो.आलेल्या पाहूण्यांना दणकेबाज भेटवस्तू देतो.हो!हल्ली हे असले सोहळे शक्तिप्रदर्शनाची मर्मस्थळं झाली आहेत.
आपल्या नातलगांना,मित्रपरिवाराला आपल्या कष्टांना,मेहनतीला आलेल्या यशात,भरभराटीत काही क्षण तरी सामील करावसं वाटणं खूप स्वाभाविक आहे.पण म्हणूनच कष्टाची कमाई अशी अनाठायी खर्च करणं अप्रस्तुतही आहे.आता आपण आहेर घेतला तर त्याला साजेशीच परत फेडही करावी असं आपल्याला मनातनं वाटतं.पण वैयक्तिक आवडी-निवडी बघून कपड्यांचा आहेर जरी केला तरी एकूणच कपडा इतका स्वस्त झाला आहे आणि माणसही खूप चोखंदळ झाली आहेत.त्यामुळे आपण दिलेल्या साड्या,ड्रेसची कापडं वापरली जातीलच याची खात्री नसते.स्वतःवरुन कल्पना करावी.
इथे चादरी,शाली असा चांगला पर्याय असतो पण आता आपल्या वयस्क आत्या,मावश्या,काकवांना किती चादरी वा शाली देणार?
एकतर वयामुळे गरजा फार कमी झालेल्या असतात.आणि त्यांच्याच सत्तरी-पंच्याहत्तरीत इतक्या गोष्टी मिळतात की त्या त्यांच्या उर्वरीत आयुष्याला पुरुन उरतात.आणि गिफ्ट व्हाऊचरची प्रथा अजूनही गावोगावी नाही पण.
अगदी लोकप्रिय प्रथे प्रमाणे पुस्तक जरी द्यायच म्हटलं तरी समोरच्याची आवड माहीत पाहिजे तरच काही अर्थ आहे.
माझ्या मते आहेराची सुरवातच का झाली हे पाहिलं पाहिजे.अत्यंत गरीब,कष्टाळू घरात जेव्हा लग्न होत असे तेव्हा गावाला-पाड्याला बोलावून जेवण-दारु दिली जात असे.And that to,to make the new marital association public.अमक्याच्या पोराने तमक्याच्या मुलीशी लग्न केलं.म्हणजे लग्नासाठी होतकरु उमेदवार म्हणून कोणी त्यांचा विचार करणार नाही.आणि आता एक कुटुंब म्हणून ते उर्वरीत आयुष्य एकत्र काढतील हे समाजाला सांगण्यासाठी.
आणि हे करण्यासाठी हातावर पोट असलेल्या आई-बापाला पैसा लागायचा.म्हणून एक सोशल रिस्पॉन्सीबिलीटी म्हणून प्रत्येक जण आपल्या कुवती नुसार पैशाचा आहेर करत.तर नातलग मात्र संसारी वस्तू देत असत.कारण एका झोपडीत दूसरं नवविवाहित कुटूंब रहाणं अशक्य असे.आणि नव विवाहितांना जबाबदार करण्यासाठी त्यांना वेगळं घर करवून देणं आई-वडीलांना अशक्य असे.फार फार तर एक झोपडी ते देऊ शकत.मग लग्नाच्या दुस-याच दिवसा पासून नवविवाहितांच अडू नये(पैशामुळे,गृहपयोगी वस्तूंमुळे)म्हणून मग जरुरी पुरतं सामान नातलग मिळून देत.भांडी,कुंडी..इत्यादी.
अजूनही अदिवासींच्या लग्नात,नियमानुसार लग्न केलं तर सरकार नव्या जोडीला गृहोपयोगी वस्तु घ्यायला साठ-सत्तर हजारांच आर्थिक सहाय्य करते हे मला हेमलकस्याला माहीत झालं.
एवढचं काय शहरी-निम शहरी लग्नातलं रुखवत सुध्दा गरजेपोटीच निर्माण झालं आहे.परतणा-या पाहुण्यांना चिवडा-लाडू,येसर-मेतकूट प्रवासात,घरी पोहोंचल्या पोहोंचल्या खाण्याची अडचण होऊ नये म्हणून द्यायची पध्दत आहे.पण आज हे सगळं संयुक्तिक आहे का हे तपासायला पाहिजे.
अजूनही टिचभर खेडे गावात कुणाही जातिबांधवाकडे लग्न असलं की त्या समाजात घरात चुल पेटत नाही.आपापलं ताट-वाटी-तांब्या घेऊन यायचं आणि पंगतीत बसायचं.आणि जेवण काय तर मसाले भात,खारी बुंदी,गोडी बुंदी.पोळी-भाजी म्हणजे श्रीमंती थाट.
नाही म्हणायला माईक वरन सिनेगितं नाही पण अमक्याने पाच रु.तमक्याने अकरा रुपये दिले असा मनोरंजनपर कार्यक्रम चालू असतो.
पैशाकडेच पैसा जातो या न्यायाने हल्ली भरमसाठ आहेर दिले-घेतले जातात.
मग ती आहेर फिरवायची कला आत्मसात करावीच लागते.त्या पेक्षा मुळात सुस्थितीतील घरांनी आहेर मुळी देऊ-घेऊ नयेतचं.
पण जर यजमानांनी कार्याची आठवण म्हणून,प्रेमापोटी काही दिलं तर त्याची परत फेड करण्यासाठी म्हणून पाहूण्यांसाठी एक चैरिटी बॉक्स ठेवावा.आपल्याला योग्य वाटेल तेवढे पैसे त्यात टाकावेत.
अजून सुजाणपणा असेल तर यजमानांनीही सरसकट सगळ्यांना काही देऊ नये.
पाहूण्यांकडून जितके पैसे चैरिटी बॉक्समधे जमतील तेवढेच पैसे स्वतःही त्यात घालून कुठल्याही होतकरु समाजसेवी संस्थांना द्यावे.This is the best way of doing things and serving society.दहा-विस हजारांचा हुंडा आणि एक-दोन तोळे सोनं अशा जमवा-जमवी पायी कित्येक लग्नाळू मुली लग्नावाचून अडलेल्या मी पाहिलेल्या आहेत.त्यामुळे कुणालाही रीत म्हणून आहेर करताना मला फार जिवावर येतं.
त्या whatsapp सारखाच धसका मी या निमंत्रणांचा घेतलाय.
आली पत्रीका कि डोकं काम करेनास होतं.
एक हाथ से दे दो,दुसरे से ले लो.
आवडो न आवडो,गरज असो ना असो.बस्स रितीच्या चक्कीत गव्हावर गहू टाकत जायचे.कपाटं उपसायची आणि सुयोग्य पध्दतीने आहेर फिरवत रहायचे.
तसंच ते स्वतःकडच्या कार्यात स्वतःसाठी कपडे घेणं.बापरे!एक वेळ भारतात तिर्थयात्रा करणारे हल्ली कमी सापडतील पण ते लग्नाचे कपडे खरेदी करणारे यात्रेकरु जिथे-तिथे सापडतील.पुर्वेच्या लोकांनी पश्चिमेला जायचं,उत्तरेच्या लोकांनी दक्षिणेला जायचं..मराठवाडींनी पुण्यात जायचं,पुणेकरांनी बेंगरुलू गाठायचं,कानड्यांनी तामिळनाडू गाठायचं...काही विचारु नका.खरेदीयात्रा एक्सप्रेसेस दौडताहेत. कळलं ना विमान कंपन्यांची भरभराट कशी होत आहे ते ?
चोखंदळपणे आडवाटेला जाऊन एखादी गोष्ट खरेदी करणं समजू शकते पण लग्नाचं मुख्य मोटिव्ह बाजूला ठेवून नको त्या गोष्टीच चौरंगावर बसवल्या जातात.
जो कष्टकरी अपू-या कपड्यांनीच रोज शेतात राबतो,ढोरं कापतो किंवा मिठाया बनवतो त्याला आपल्या मुलाच्या लग्नात नविन साजेसे कपडे घ्यावेसे वाटणं खूप खरं आहे.पण कपाटं ओसंडून वहातांना देखील घरचं कार्य म्हणून आटा पीटा करुन नव नविन कपडे घेणं जरा नाहीच पटत.बरं स्वतःच्या मुलांच्या लग्नाविषयी सुध्दा समजू शकत,पण जरा दुरस्थाच्या कार्यातही हजारोंची खरेदी म्हणजे अंधा युग आल्यासारखं वाटतं बुवा.
असो.वाचक म्हणतील या बाई उठसुठ काय फाटे फोड सांगतात.
माझी मुलं अजून लग्नाची नाहीत.माझी मतं काहीही असली तरी त्यांचा व जोडीदार कुटूंबाचा विचार घेऊनच गोष्टी ठरवाव्या लागतील.
सांगण आपल्या हातात आहे आणि जबाबदारी पण आहे.
No comments:
Post a Comment