Thursday, 16 March 2017

SACAR...


Shri Aurobindo Center For Advanced Research. साकार या पॉन्डेचेरीतल्या ठिकाणी आम्हा ३०-३५ शिबीरार्थिंची रहायची सोय केली होती.आम्हाला त्या पॉन्डेचरीतल्या गल्ली बोळात शोधत,विचारत पोहोंचेस्तवर रात्र झाली.खुप दमलो होतो.तीन मजली इमारत.लिफ्ट नाही आणि कुणाला कुठली खोलीचा प्राथमिक गोंधळ.आम्हा तिघींना गच्चीतली खोली.सामान चढवता चढवता नाकी नऊ आले.कुणीही मदतनिस नाही.आमची ही अवस्था तर बाकीचे वयस्क तर हबकलेच.त्यात जेवण घर,सभागृह खाली.म्हणजे दिवसातनं निदान तीन-चारदा तरी चढ-उतार होणारच.त्यात तो आपलं सगळं सुरळीत करणारा सक्काळचा बहुगुणी चहा..हव्वाच! कसं होणार ? त्यात आजचं रात्रीचं जेवण बाहेरच घ्यायला सांगितलेलं.आम्ही रहाणार होतो ते ठिकाण म्हणजे एक कोळी पाडा होता.जवळपास जेवायची काही सोय नव्हती.पण पुढच्या आठ-दिवसाचीच इतकी गडद चिंता होती की बहुदा बरोबर आणलेलंच काही तरी खाल्लं आणि सैरभैर होत झोपलो. सकाळ झाली आणि फटफटलेल्या पहाटेत कळलं कि अगदी हाकेच्या अंतरावर समुद्र आहे आणि पुर्वेचा उगवता सुर्य रोज गच्चीवरनंच बघता येणार होता.शिवाय आसपास कोळी वस्ती,किनारा..माझं तर मस्तच जमलं.बाकीचेही कालांतराने झाले एडजस्ट. हरिद्वारचा अरविंदांचा आश्रम फारच up to date आणि सुंदर आहे.सुविधाही मस्तच आहेत तिथे.आणि मागच्या वर्षीच्या तिथल्या अनुभवावरुनंच ब-याच जणांनी आपल्या आई-वडीलांना,वयस्कांना इथे आणलेलं.त्यामुळे आल्या आल्या बरेच जणं जरा नाराज झालेले. श्री अरविंदानी आपले सर्व विचार,लिखाण इंग्रजीत मांडलेले आहेत.त्यांचं लिखाण भगवद् गीता आणि त्याला अनुसरुन आजचे आपले आचार-विचार कसे असावेत अशा स्वरुपाच आहे-असावं.Since he has written n expressed in english majorly,सर्वसामान्य भारतियांपर्यंत त्यांचे विचार आणि काम पोहोंचलेलं नाहीये.पण परदेशी लोकांमधे त्यांच्या विषयी खुप उत्सुकता आहे.उत्तर भारतात रायवाळा,नैनीताल येथे त्यांचे मोठे आश्रम आहेत आणि तिथे जगभरातुन शिष्यांचा राबता असतो.तर आपले काही अरविंदांचे मराठी अभ्यासक अशी काही शिबीरं या ठिकाणी भरवतात,मराठीत त्याच्या विषयी,गीतेवर व्याख्यानं ठेवतात जेणे करुन श्री अरविंदांचे विचार मराठी मनापर्यंत पोहोंचतील. पॉन्डेचरी ही अरविंदाची कर्म भुमी.त्यांनी देहही इथेच ठेवला.त्यांचीच एक पट्ट फ्रेंच शिष्या 'Mother'यांनी अरविंदांच्या पश्चात त्याची फिलॉसॉफी जागतिक पातळीवर नेली आणि एक अनोखी आतंरराष्ट्रीय वसाहत 'ऑरोविले' ही पॉन्डेचरीत स्थापन केली. आज जगभर पॉन्डेचेरीची ओळख श्री अरविंद घोष,मदर आणि ऑरोविलेमुळेच आहे. तर अरविंदाचे अजून एक सुविद्य शिष्य श्री.आनंद रेड्डींच्या पुढाकारातनं साकार ही संस्था उभी राहीली आहे.इथे पण अरविंदांच्या विचारांना अनुसरुनंच कार्यक्रम,व्याख्यानं ठेवली जातात. वीस-पंचवीस खोल्या,ऑफीस,स्वैपाकघर,डायनिंग हॉल,सभागृह इत्यादी.हे सर्व रेड्डी दांपत्य,अजून दोघं-तिघं आणि काही मदतनीस मिळून साकारचा हा सगळा कार्यभाग बघतात. अश्या कामांना नियमीत आर्थिक मदत मिळणं जरा अवघड असत.तर या दांपत्याने विचार केला की आपल्याकडे इतक्या खोल्या आहेत तर का नाही आपण असं शिबीर आपल्या इथे घ्यायच ? ध्येयाचा प्रसारही होईल आणि थोडी फार आर्थिक मदतही होईल म्हणून मग आमचं शिबीर इथे ठेवलं.पण हे काही हॉटेल नव्हतं की सर्वांना एकसारख्याच सुविधा मिळायला. It was their first attempt,if I am not wrong. तरी पण त्यांनी खुप तयारी केली होती.दहा दिवस राऊंड द क्लॉक चहा-नाश्ता-चहा-जेवण-चहा-जेवण देणं तेही चाळीस जणांना सोप नाहीये.तिथल्या असिस्टंट डायरेक्टर महिले सोबत श्रीमती रेड्डी स्वतः भाज्या चिरायच्या,स्वैपाक करायच्या. पण इतक्या सगळ्यांच्या मराठी चवी-ढवीचं खाणं मिळणं अवघडंच होतं.Still they tried their best. दिवसभरात साधारण तीन तासाचं व्याख्यान असायच. मराठीतंच.पुण्यातल्या विदुषी होत्या.अत्यंत मंजुळ आवाज,विस्तृतपणे सांगायची हातोटी..मनाचा ताबा लगेच घ्यायच्या. मला जरा माफकंच गोडी आहे अशा गोष्टींची.त्यात रोज म्हटलं की कंटाळाच यायचा.माझ्या मनातलं सांगते.श्रीकृष्णाने अर्जूनाला कर्मयोग सांगितला..तो आपल्यालाही पटलाय नं ? मग जा साकारच्या स्वैपाकघरात करा त्यांना स्वैपाकात मदत,करुन घ्या तुमच्यासारख्या पोळ्या,करा जेवण वाढायला मदत.विचारातला कर्मयोग आणा नं आचरणात. But please no Kurkur ! व्यक्तिशः माझं टिपण जमलं.हाकेवर समुद्र,किनारा,पाडा,मंदिर, गाव,स्थानिक लोकं.धडपडत सकाळ-संध्याकाळ जमेल तसं खुप एकटी-दुकटी फिरायचे..मस्त फोटो काढले..थोडीफार शेजार-पाजा-यांशी मैत्री केली.जमेल तशी किचनमधे मदत ऑफर केली. Every time I changed my table n group while having food.So had a good interaction with all participants. मधे एक-दोन ट्रिप्स झाल्या.अरविंदांच्या,मदरच्या समाधीस्थानाला भेट दिली.Auro Vileला पण भेट दिली.त्या विषयी पण लिहीनंच सविस्तर. But out of all the three places of Aurobindos Pondicherry SACAR is any time more humanly grounded to get connected.

No comments:

Post a Comment