नुकताच जागतिक मराठी दिवस उल्हासात पार पडला.
भाषेच्या लहेजा,खुब्यांप्रमाणेच आपल्या वर्तणुकीतनं,विचारातनं,
राहणीमानातनं,खान-पानातनं,नावा-आडनावातनं
आपलं वैशिष्ट्यपूर्ण प्रांतीयपण कळत-नकळत डोकावत असतं.
जसं'नावात काय'असं विचारलं जातं,तसच भारतीय समाज रचनेला उद्देशुन आडनावात काय असं विचारता येऊ शकत.
आडनावांच्या बाबतीत तर मराठी लोकांच्या नखाचीही सर कुणाला येणार नाही इतकी रोचक,रंजक,उदबोधक,विनोदी,हास्यास्पद आडनावांची परंपरा आपल्याकडे आहे.
आमच्या कुटुंबाचा एक तामिळी मित्र आहे.मदुराईचा आहे पण नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात असलेला.आमच्या घराजवळंच रहायचा.आमची मुलंही त्याच्या फार अंगावर होती.
त्याचं नोकरीतलं पहिलं पोस्टिंग पुण्यात आणि दुसरं औरंगाबादला.
तर गप्पांच्या ओघात तो एकदा सांगत होता.नोकरीवर रुजू झाल्यानंतर तो जेव्हा पुण्यातनं पहिल्यांदा गावी गेला तेव्हा सगळ्या भावंडांना मराठी आडनावं आणि त्याचे अर्थ सांगून तासभर हसवलं होतं त्याने.
त्यांना फार गमतीशीर वाटली होती आपली आडनावं ऐकून.
तरी बरं शहाण्यांच्या पुण्यातंच वास्तव्य होतं.
एकबोटे,फाळके,श्रीखंडे,ओक,मराठे,कानडे,नातू,गिते,शेंडे,फडके,
फाटक,गोळे,भोळे,काळे,गोरे,कापसे,दंडे,डोळे,दाते,खरे,खोटे,
हातवळणे,ठोके,पितळे,तांबे,गाजरे,फणसे,मुळे,भोपळे इत्यादी सौम्य व सुलभ आडनावांनीच यांना इतकं हसू आलं तर आमच्या मराठवाडी व वैदर्भिय आडनावांनी आणि त्याच्या अर्थांनी तर हसून-हसून लोटपोट व्हायचीच वेळ येईल यांच्यावर !
त्यांच्यावरच काय मीच कधीची खदखदत आहे हे लिहीतांना.
खरंच काय चित्र-विचित्र आडनावं असतात ना ?
काय कारणांनी ही आडनावं वापरात आली असतील बरं ? संशोधनाचा विषय आहे नाही ?
मराठवाडा तरी बरा वाटेल अशी गमतीशीर आडनावांची रेलचेल विदर्भात आहेत.नुसती आडनावं आठवली तरी खदखदून हसायला आपल्यालाच येतयं,दुस-यांचीतर केवढी करमणूक होत असेल बरं ?
साखरझोपे,मानमोडे,कानकाटे,सुखदुःखे,पोट दुखे,दहीभाते,भाजीभाकरे,चोरमुंगे,जिभकाटे,दुधमांडे,हिंगमिरे,तुपे,जिरे,बोबडे,आंधळे,डुकरे,लंगोटे,म्हैसे,लांडगे,कोल्हे,वाघ,गाढवे,मुंगी,
कुंभार, लोहारे,सुतार,सोनार,तांबट,फुले,घुले,सुळे,माळी,
चोरमारे,माणुसमारे,ढोरमारे,धोत्रे,एरंडे,मुसळे,डोंगरे,शेवाळे,टकले,कडू,पिसाळ,पिसाट,बेंबडे,लिंगाडे,गवळी,गवई,पुजारी,शेंगदाणे,खोबरे,
बत्तासे,साखरे,फुटाणे,गुळे,कुरणे,हरणे,सरणे,चिपाटे,चिकटे,उंदिरमारे,
उकिरडे,उन्हाळे,किर्तने,आगलावे....
हसून-हसून पोट दुखलं तरी ही आपल्या आडनावांची करमणूक एक्सप्रेस थांबेना.
अर्थात तामिळींच्याही लंब्या-चौड्या रामायण-महाभारतकालीन नावांची खिल्ली उडवण्यात आपण अग्रेसरंच असतो.अगदी तो गोवनीज मारिओ मिरांडापण त्यात मागे नव्हता.
तर आपण सुध्दा तो-यात विचारु शकतो 'आडनावात काय' म्हणून
आणि थाटातच सांगू शकतो त्याचा अर्थ.
No comments:
Post a Comment