खान्देशी,बेळगावी मांड्यांसारखीच कथा त्या ऐकीव उबारियूची आहे.
मध्य महाराष्ट्रा सारखाच दक्षिण गुजरातमधे हुरडा खाल्ला जातो.तिथे त्याला पोंक म्हणतात आणि गुज्जू रितीप्रमाणे पोंकबरोबर चटणी,फाफडा,शेव,उकडलेले बटाटे असं खाल्ल जातं.
आमचे एक नातलग वापी-दमण परिसरात रहातात.ते नेहमी बोलवायचे की तुम्ही कधी संक्रांतीच्या आसपास इथे या.इथे एक मातीच्या माठात वाफवलेला हिवाळी भाज्यांचा छान प्रकार मिळतो.पण हिवाळ्यात बाहेर निघणंच कठीण होतं.पण या वर्षी मात्र मनावरच घेतलं आणि व्हायब्रंट गुजरातचा पतंगोत्सव आणि जाता जाता वापी असा कार्यक्रम आखला आणि निघालोच.
निघायला उशीर झाला त्यामुळे वापीत पोहोंचेतो रात्र झाली.दुस-या दिवशी अहमदाबादला पोहोंचण भाग होतं.तरी नातलगांचा आग्रह होताच जरा थांबून जा.दहाच्या पुढे डुंगरी इथला एक नामांकीत उबारियुचा ठेला लागतो.तो खाऊन-बघून जा म्हणून.पण व्हायब्रंट गुजरातचा शेवटचा दिवस होता चुकवून चालणारंच नव्हतं.
वापी सोडलं की सुरत रोडवर साधारण ४०-५० किमि पर्यंत उबारियुचे बरेच ठेले लागले.पण सकाळची वेळ असल्यामुळे ठेले एकदमच गपगार.शेवटी एका ठेल्यावर माठाखाली जाळ दिसला आणि थांबलो.ग्रामीण महिला,भाषेची अडचण तरी पावशेर उबारियु घेतला.
काही ठराविक मसाले लावलेल्या,माठात घालून आहारीवर शिजवलेल्या काही हिवाळी भाज्या आणि कंदमुळं,अगदी तेल विरहीत.झणझणीत चटणी बरोबर खायच्या.
वेळ फारच सकाळची असल्यामुळे फार काही रुचलं नाही आणि भाषेमूळे माहितीही बरोबर मनासारखी मिळाली नाही.
काही अंतरानंतर तर हे ठेले दिसणही बंद झालं.मनात म्हटलं जाऊ द्या काढू येताना माहिती.
परतीचा प्रवास सापुतारा-नाशिक असा करताना हायवेवरनं डावीकडे वळलो आणि सापुता-याकडील घाट सुरु व्हायच्या आधी अचानक परत उबारियुचा ठेला दिसला.हा जरा अदिवासी-ग्रामिण भाग आहे.लगेच थांबलो.
नुकताच उबारियु शिजायला टाकला होता.परत थोडीफार नेमकी माहिती मिळाली.वैशिष्ट्य जाणून घेतलं,कळलं आणि निघालो.
परत हिरण्यला जशी सवड मिळेल तसा हा पदार्थ करुन पाहिला.४-५ वेळा विविध प्रयोग करुन पाहिले.जमलाही चांगला.त्यातली मेख समजली.
आता हिरण्यच्या रेस्टोरंटमधे हेल्दी स्टार्टर्स म्हणून द्यायचा विचार आहे.
व्हेज-नॉनव्हेज दोन्हीही.
अर्थात सर्वच दृष्टीने आटोक्यात आलं तर होळीच्या दिवशी पण बुफेवर ठेवायचा विचार आहे.
बघू मोठ्या प्रमाणात कितपत चांगला जमतोय आणि रिस्पॉन्स पण कसा मिळतोय ते !
P.S.कालच्या जेवणात उबारियु आणि बेळगावी दुध-मांडेही ठेवले होते.मस्त रिस्पॉन्स मिळाला.
उबारियुचा मातीच्या हंडीतलाच डिस्प्ले आणि शिजवायचं वैशिष्ट्य यामुळे खुप उत्सुकता होती लोकांमधे.
चव घेऊन तर फिदाच झाले.एकमेकांना आवर्जून हा पदार्थ खाऊ घातला.
बुफेवर मीच उभी होते त्यामुळे खुप इंटर ऐक्टीव्ह संवाद झाला.दरवेळेस काहीतरी नविन द्यायच्या हिरण्यच्या वैशिष्ट्याच कौतुक झालं.मी स्वतः बुफेवर सर्व्हिस देत होते तर त्याचही कोण अप्रुप,एनर्जीचही कौतुक.
का असं लोकांना वाटत मला कळत नाही ?
I think when you do things with love and passion,this kind of involvement comes automatically.
आपल्या मुलांचा भांग आपण किती वेळा पाडला किंवा ताप आलेला असताना कितीवेळा त्याच्या अंगाला हात लावून पहिला,किती रात्री जागलो हे आपल्याला आठवतं का ?
किंवा असं करा म्हणून कुणी सांगतं का ? किंवा आपण त्याची मोजदाद ठेवतो का ?
आपल्या श्वासा इतकंच ते स्वाभाविक आणि अंतर्यामी आहे.
आणि हिरण्य आमचं तिसरं मुलंच आहे.
No more to explain !
No comments:
Post a Comment