Saturday, 18 March 2017

सनातन प्रभात...


ऊन्हाळा तब्येतीत सुरु झालाय.भाजीबाजार जरी अजून टवटवीत असला तरी भाज्या महागल्या आहेत.आणलेल्या भाज्या फ्रिजमधे सुस्थितीत टिकवणं हे आता भाजी खरेदी नंतरच महत्वाच काम झालय. पावसाळ्यात डब्यांमधे न्युजपेपर टाकला की काम भागतं,हिवाळ्यात तर प्रश्नच नसतो.ऊन्हाळ्यात मात्र भाज्या ओलसर,तजेलदार ठेवणं ही एक डोके दुखीच असते.विषेशतः सतत रोज लागणा-या कोथिंबीर,पुदीना, कढीपत्ता व इतर पालेभाज्या. तर आज सकाळीच भाजीपाला आणला कोथिंबीर,कढीपत्त्यासह. ताजी कोथिंबीर,सुवासिक तजेलदार कढीपत्ता असला की स्वैपाकात बारा हत्तींच नाही पण दंडातल्या बेंडकोळी इतकं बळ मला तरी नक्कीच चढतं. नुकताच एक जुना कॉटनचा टिक-टिक-टिकलेला ड्रेस हेतु पुरस्सर धुवून ठेवला होता.तो हाताशीच होता.लगोलग तो बरोबर शिवणीतून कापला.सलवारची कापडं पुसापुशीला ठेवली पण कुडत्याच्या खालचा,मागचे-पुढचे चौकोनी भाग स्वैपाकघरात काही वाळत घालायला,कडधान्य मोडांसाठी बांधून ठेवायला म्हणून बाजूला ठेवले.बाकी वरच्या भागाचे तुकडे भाज्यांच्या डब्यात ओले करुन ठेवणार किंवा ओल्या कापडाने गुंडाळून भाज्या ठेवणार.बघू जिवलग कढीपत्ता,कोथिंबीर,पुदीना किती तग धरतात ते ? कॉटनचे कपडे काही झालं तरी खरंच फेकवत नाहीत.भले त्या चिरगुटी काटकसरीची कितीही खिल्ली उडवली जाऊ देत.उपयुक्तते प्रमाणे कापलेले सर्व तुकडे ठेवून घेतले तरी उरलेल्या चिंध्या मी स्वतःसाठी ठेवून घेते किंवा कार्यरत कलावंत मित्रांना रंग पुसायला,ब्रश पुसायला देते. हे सर्व लिहायच कारण म्हणजे नुकतीच होळी झाली आहे.रंग खेळलेल्या जुन्या कपड्यांचा ढीग साचला आहे.तसच नेहमी पण मनात येणारा हा एक विचार आहे. हल्ली शहरातील घरटी एक तरी मुल परदेशी असतच.आधी शिकायला मग नौकरीला म्हणून.मग जेव्हा मिडल क्लास टू अपर क्लास असे प्रमोट झालेले त्यांचे पालक आपल्या मुलाकडे एक वारी करुन येतात तेव्हा ते इतके बदलतात ना कि बास !(वरवरचेच आणि दैनंदिन व्यवहारा पुरतेच) उदा.ओटा पुसायची,डायनिंग टेबल पुसायची,फर्निचर पुसायची किंवा मेकअप,काजळ,लिपस्टिक पुसायची जी जुनी कापडं किंवा नविनच सुती वाईप्स असतात त्याला एकदम काडीमोड देऊन ते अमेरिकन स्टाईल पेपर रोल वापरायला धडाक्यात सुरवात करतात.आणि ते किती सुखाचं आणि सोईच आहे हे आपल्याला पटवून सांगतात. भारतात प्रचंड प्रमाणात कापूस होतो.आणि उष्ण हवामानामुळे ९०% भारतीय सुतीच कपडे वापरतात.विविध रंगी,विणाईचे सुती कपडे हे जे भारताच वैशिष्ट्यच आहे ते त्यामुळेच. सुताची मुबलकता,हवामानामुळे गरज,लोकसंख्या आणि दारिद्र्य यामुळे श्रीमंतांचे काही कपडे गरिबांनी वापरणं तसेच प्रत्येक घराने,घरातलीच जुनी-पुराणी कापडं,त्यांच्या उपयुक्तते प्रमाणे पुन्हा-पुन्हा धुवून वापरणं..till it's capacity. I think it's very much in tune with our climate and living way. हं..प्रवासात,दवाखान्यात पेपर-टिश्यु वापरणं खुप सोईच होतं पण घरामधल्या सफाईला रोज पेपर-टिश्यु वापरणं नाही पटत बुवा. कालच माझ्या मुलाच्या पावलाचं डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग केलं.४-५ दिवसांपुर्वी गोव्यात त्याच्या गाडीने एकाला ठोकलं.फार नाही लागलं पण तातडीने तिथे केलेलं प्लेस्टर,ते इथे काढून परत दुसरं प्लेस्टर घातलं.Everthing disposable.पंधरा मिनीटात एक डस्टबीन गच्च भरलं.Any kind of waste management is a grave problem. पण आपल्यासाठी अमेरिका म्हणेल ती,करेल ती पुर्व दिशा. इकडे पेपरलेस एडमिनिस्ट्रेशन,गव्हर्नंसच्या गप्पा मारायच्या,मुलांना इको प्रोजेक्टस मधे मदत करायची,वेस्ट मैनेजमेंटवर भाषणं ठोकायची आणि स्वतःच्या घरात हे असं आंधळ,गैरवाजवी अनुकरण. बघा पटतयं का ?

No comments:

Post a Comment