तिरुपती अगदी पहाटेच सोडलं.डोंगर उतरताना परिसरात शांतता,पहाटेचा गारवा,आम्हीही प्रसन्नचित्त.स्थानाचं देवपण विसरुन सुंदर निसर्ग टिपत निघालो.
वेल्लोर सध्या तिथल्या क्रिस्टियन मेडिकल कॉलेजमूळे जगभर प्रसिध्द आहे तसाच तिथला किल्ला आणि त्यातलं मंदिरही फार नावाजलेलं आहे.आमच्या प्लैनमधे याचा समावेश नव्हता पण तिरुपती इथल्या टूर-टैक्सी ओपरेटरनी आग्रहच केला आणि वेळेत बसत असल्यामूळे आम्ही तो लगेच मान्य केला.
पॉंडेचरीच्या शिबीराला तीस-पस्तीस जण असणार होते.पण आम्ही ओळखीचे,जवळचे सात जणं होतो.आम्ही तिघी आणि एकाच कुटुंबातले नवरा-बायको-मेहूणी आणि सासूबाई.सगळे खुप धार्मिक.सासूबाई थकलेल्या काठी घेऊन चालणार्या,मेहूणीला प्रवास लागायचा.
खरंतर एक इनोव्हा करुन सात जणांनी एकत्रच फिरायच ठरलं होतं.पण इनोव्हातली सततच्या चढ-उतारीचे कष्ट,उलट्या बघता दोन गाड्यांमधनं फिरायचं ठरलं.एक त्यांची एक आमची.संपर्कात राहूनंच एकाच रस्त्याने फिरायच ठरलं.
And that suited everyone.
दोन तासात वेल्लोर.आधी किल्ल्यात गेलो.स्वागतालाच जाळीबंद गांधीजी शिल्परुपात भेटले.ऐस-पैस भक्कम किल्ला..मराठ्यांशी जोडला गेलेला..बाजूनी खोल खंदक..पाण्याने,शेवाळ्याने भरलेला.किल्ल्याच्या आत सुस्तावलेली सरकारी ऑफिसेस.उजव्या हाताला मोठ मंदिर.काल त्या पुणेरी मराठी बाईंनी आवर्जून बघायला सांगितलेलं हेच ते मंदिर.
बाहेर तसा शुकशुकाटंच.एक माणूस काकडी-कैरी विकतोय.एकमेकीत मराठी आणि त्याच्याशी सवयीने हिंदीतून बोललो..भाव विचारला तर गडी एकदमच उसळला.आणि हातवारे करत जा-जा..मला नाही तुम्हाला काही विकायचय अशा अविर्भावात.आम्हाला कळेचना आमचं काय चुकलं ते.त्याचा उलगडा मंदिरात झाला.
जलकान्तेश्वर या मंदिराच गोपूर भव्य आहे..मुख्य मंदिराला अजून एक गोपूरी प्रवेशद्वार.मंदिराच्या चहू बाजूंनी मोठा मोकळा परिसर.डाव्या हाताला कल्याण-सुंदर मंडप(लग्न मंडप)पाय-या चढून आत गेलो.खूप कोरीवकाम केलेले सुरेख दगडी खांब.भारतीय पुराणातल्या बहुतेक कथा आणि देव-देवतांचे विविध अवतारातले शिल्प कोरलेले.एक से एक जाळ्या अप्रतिम कोरलेल्या.बाहेरच्या प्रकाशामूळे अजूनच उठून येणा-या.सभामंडपाच्या मध्यभागी उंचावलेला,कोरीव असा अजून एक उंचवटा,ओटा..सुंदर कोरलेला..कुठलाही कोना,कोपरा न कोरता न ठेवलेला.या वेदीवर विवाह लागत असत.नजर खिळवून ठेवणारी वास्तू.खरंच इथे लग्न लागण्यासारख भाग्य नाही.आजपर्यंत इतका सुरेख लग्न मंडप पाहिला नव्हता.इथे येण्याच सार्थक झालं.
परत दुस-या गोपूरातून प्रवेश करत मुख्य मंदिराकडे वळलो.मंदिराच्या चहूबाजूंनी कमानदार ओवरी.दोन-तीन ओवर्यात मंदिराच कार्यालय होतं बाकी ठिकाणी पिंडी.काही वस्त्र नेसवलेल्या.काही दुय्यम मंदिरं.मागे छोट्या दिव्यांची विक्री.इथे देवाला दिवा-ज्योत-तेज अर्पण करायची छान पध्दतच आहे वाटत.विषेश म्हणजे त-हेत-हेचे पितळी दिवे-समया इथे खूप आहेत.बहूदा दान केलेले असावेत.पण प्रत्येकाचा घाट आणि आकारमान दिपवणारं.मंदिरात स्थानिकांची शांत हालचाल.गंभीर वातावरण.मंदिराच्या कार्यालयात दोघ-तिघं बसलेले.पितळी समयांनी माझं चित्त हरण केलेलं.या ट्रिपमधे एक छान मोठी समयी हिरण्यसाठी न्यायचीच आहे.१ मेच्या कार्यक्रमासाठी.हिंदीत चौकशी केली की अशा सुंदर समया कुठे मिळतील तर पुजा-याला हिंदी येत नसावं पण एक शिकलेला प्रौढ माणूस तिथे होता.तो करडेपणाने मला उद्देशून म्हणाला..
I don't understand the language in which you are speaking.You talk in our language..
You don't understand Hindi ?
I don't know any such language..
either talk Tamil or English.I don't know where you have come from and what is your language.Now tell me what you want ?
हिंदीभाषा द्वेषा विषयी ऐकून होतो आज अनुभव घेतला.हिंदी हा शब्दसुध्दा उच्चारायच सुध्दा त्या गृहस्थांनी टाळलं.शेवटी त्या पूजा-याने डायरीतला कुंभकोणमचा पत्ता दिला.आमचही ठरलंच होतं कुंभकोणमला जायच.पण या हिंदीमूळे संवाद थांबला.त्या सायकलवाल्याच्या वर्तनाचाही अर्थ लागला.बाहेर पडलो.वेल्लोरलाच एक एवढ्यात नावारुपाला आलेलं गोल्डन टेंपल आहे म्हणे.तिकडे निघालो.
मोठं मैदान कोप-यात मंदिर असाव दिसलं नाही.
बसेस भरभरुन बायकांच्या सहली आलेल्या.खुप मोठी चक्राकार जाळीबंद रांग.५००/-,१०००/-,२०००/-रुपयांच्या दर्शनाच्या रांगा.फुकटातलं दर्शन कधी होईल याची ग्यारंटी नाही.
इतका रुबाब तर तिरुपतीलाही नव्हता.
आडमूठं चौकशीचं टेबल.भक्तांना कचाट्यात पकडून जास्त पैशाच तिकीट फाडण्यावर जोर.Absolutely non-cooperative.
त्यात आमचं मराठी-हिंदी.आमची खिल्ली उडवण्यावर भर.
आम्ही तिघीही तशाच बसून राहिलो.त्या दोघींनी कदाचीत तिकीट घेतलही असत पण यांचा बाजारु आणि वैरी रुप बघून त्याही नाराज झाल्या.नशीब वॉशरुमला तरी जाऊ दिलं.
पुढची सगळी ठिकाणं अशीच आततायी असतील तर कठीण आहे असं कुजबूजत कांचीपूरमकडे निघालो.
No comments:
Post a Comment