Monday, 6 February 2017
वारसा..।।
माझ्या लेटेस्ट प्रोफाईल फोटोंवर एका परिचित काकांची कमेंट...
ही इजिप्शियन मुलगी कोण ?
मी सहसा माझ्या फोटोज,शेयर्स,स्टेटस् वरच्या साध्या (वॉव,सुपर,सुंदर,अमैझिंग इ.)कमेंटस किंवा लाईक्सना रिस्पॉंड करायच्या फंदात पडत नाही.शिष्टपणा नाही पण आपण शेयर केलेल्या प्रत्येकच गोष्टींना मिळणा-या प्रतिसादाची दखल आपण उत्सुकतेने घेतोच घेतो. त्यामुळे परत वेगळ लाईक करायची गरज नसावी असं माझं मत आहे.तरी पण हल्ली मी सोशल मिडीयाचे एटिकेट्स शिकायचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे नेहमी 'likes'ला 'like' जरी नाही केलं तरी निदान 'comments'ला तरी रिस्पॉंड करावं असं ठरवलं आहे.बघू कितपत जमते ते.
तर काकांच्या या कमेंटला मात्र उस्फुर्त प्रतिक्रिया दिल्या गेली माझ्याकडून.
Of course Nefertiti kaka...
आणि मग माझं मलाच आश्चर्य वाटलं !
Actually Queen Nefertitiचा तो जगप्रसिध्द पुतळा आर्ट स्कुलला गेल्यापासून अगदी मनात घर करुन आहे.प्राचीन इजिप्तच्या राणीचा हा जगप्रसिध्द अर्ध पुतळा.पाहताच कोणालाही भुरळ पडावी असा.
उंच नाजूक मान..सुकुमार रेखीव नाक,रंगवलेले ओठ..
ऐटबाज,उच्चभ्रु हेड गियर..आणि मला अतिशय भावलेले तिचे लंबुळके,लयदार व कोरीव डोळे..वरुन-खालून काळभोर आय लायनर लावून अजूनच ठसठशीत,चित्तवेधक केलेले नजरबंद डोळे.
ह्याच वयात मी काजळ,सुरमा,लायनर वापरायला जी सुरवात केली ती आजतागायत आहे.
And believe me,there is not a single day when I have not remembered Nefertiti's eyes while putting on my kajal or liner !
प्रत्येक वेळेस आरश्यात बघतांना...सुशोभन करताना..
पुर्वापारापासून अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरणा-या तमाम पुर्वज वसुंधरेच्या लेकी पाठीशी असल्यासारख्या वाटतात...
एवढच काय ते सोनं,चांदी,दगड,माती,शिंपले,लाकूड,बियांचे दागिने वापरतांना..डोक्यात खरी-खोटी फुलं माळताना..
दुध-साय-हळदीचं उटणं लावतांना..विणकाम-भरतकाम करुन,ते कपडे वापरतांना..रांगोळ्या काढतांना..
स्वैपाक करतांना गाणं गुणगणतांना(चार ओळी सुचतांना देखील)...I represent the absolute feminine perspective of this planet.I feel extremely soulfully connected to all the women from every corner of the earth.
भरपूर काजळ वापरत डोळ्यांना थंडावा देत सुंदर करणारी राणी नेफ्रेतिती असो का गाढविणीच्या दुधाने आंघोळ करणारी क्लियोपात्रा असो...
नजाकतदार मेंदी रेखाटलेली कुणी सर्वसामान्य बुरखाधारी असो..वा शंख-शिंपल्यांचा श्रुंगार करणारी कोणी साता समुद्रापारची सागर कन्या असो..वा अत्यंत कलात्मक कलाकुसर करणारी आपली रांगडी लमाण स्त्री असो...
या सगळ्या पुर्वज स्त्रियांचा श्रुंगाराचा,सुंदर दिसण्याचा,
सृजनतेचा एक अंशीक स्त्रोत माझ्यातही आहे.आणि हा विशाल असा मनोज्ञ वारसा कळत-नकळत माझ्याकडनं जपला जातोय...प्रवाहीत होतोय.
नाही म्हणायला गोंदवण्याची हिरवी मोहर शरिरावर उमटवून घ्यायची राहली आहे अजून.पण मनसुबा तर नक्कीच आहे,नव्हे तो माझा वारसासिध्द हक्कच आहे !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment