नविन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा !
Dear all...
माझ्या फेसबुकवरच्या जवळ-दुरच्या मित्र मैत्रिणींनो,आज जरा स्पष्टच लिहू का ?
नविन वर्षाच्या स्वागताला सगळं जग उत्सुक आहे.खुले आम एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोषात गत वर्षाचा निरोप घेतला जातोय.सोशल मिडियावर तर आता पाऊस पडेल शुभेच्छांचा. मला सांगा तुमच्या (विषेशतः)वाढदिवसाला,एनिव्हर्सरीला या फेसबुकवर मिळणा-या गठ्ठा शुभेच्छा खरंच नितळ आनंद देतात काहो तुम्हाला ?😮
म्हणजे असा प्रश्न पडतो का कधी तुम्हाला की जर सकाळी FBवर नोटिफिकेशन आलं नसत तर या व्यक्तीने आपल्याला शुभेच्छा पाठवल्या असत्या का ? त्या एका व्यक्तिच्या किंवा फेसबुकवरच्या अनेक व्यक्तींंच्या लक्षात राहिला असता का आपला वाढदिवस ? मला हा प्रश्न नेहमी पडतो.😟
आलं नोटिफिकेशन की दे शुभेच्छा हा धडाका बराचसा देखल्या देवा दंडवता सारखा वाटत नाही का ?
और ये ढेर सारी कहां कहां से आती हुवी जनमदिन की शुभकामनायें सच में क्या मायने रखती है आपके निजी जिंदगी में ?
माझ्या आयुष्यातल्या मोजक्या १०-१२ जणांचे सोडले तर कुणाचेही वाढदिवस माझ्या लक्षात नसतात पण तिच मी सकाळच्या पहिल्या चहाच्या घोटाबरोबर रोज किमान २-३ शुभेच्छा तरी पाठवते FBवरनं.
आता मलाच या शुभेच्छांचा राबता पाठवतांना काम उरकल्यासारखं वाटत असेल तर शुभेच्छा घेणा-यालाही त्यातलं पोकळपण जाणवत असणारंच ना ?😰
No..no...Its not that I dont care for others feelings,पण ज्यांची फक्त FBवर फक्त काही कारणांनी,समान आवडींनी virtual मैत्री असेल तर(म्हणजे व्यक्तीगत ओळख व तेवढी घनीष्टतता नसेल तर )असे सटासट पाठवलेले शुभेच्छांंचे ताटवे म्हणजे जरा रंग ले आयेंगे,रुप ले आयेंगे,खुशबू कहां से लायेंगे सारखंच ना ?
एका प्राथमिक पातळीवर प्रत्येकाविषयी मनात सदिच्छा असणं योग्यच आहे.आणि माझ्याही तशाच भावना आहेत. पण तरी मला वाटतं आपण दुस-यांनी केलेल्या कामाचं,विचारांच, कर्तृत्वाचं आवर्जून कौतुक करावं,शुभेच्छा द्याव्यात.पण वाढदिवसात काय कर्तृत्व असतं हो ? 😱
खरं सांगू वाढदिवसांची गंमत फक्त बालपणी किंवा म्हातारपणीचं जास्त असते हं.एक मस्त धम्माल विरंगुळाच असतो तो.पण या मधल्या वयात काय गंमत ? आणि तीही अशा मिडियावर.(इथे उगाचचं काडीने औषध लावणे ही म्हण आठवत आहे) तसेच ते लग्नाचे वाढदिवस सुध्दा ! पण हां लग्नाच्या वाढदिवसात तरी जरा inputs असतात म्हणा. 😏 पण त्याच्याही celebrationचे ते देमार गठ्ठा फोटो आणि तदनंतरच्या शुभेच्छांचा पूर बघून नूसता उबग येतो आणि असे फोटो टाकणा-या व्यक्तिंविषयी विरस होतो.निदान माझा तरी.
अर्थात अगदीच कधीतरी तोही टाईमपास बरा असतो म्हणा. आपल्या अपरोक्ष जग सगळ्यायाच बाबतीत कुणीकडे चाललयं ते तरी कळतं.😀
So dear all,
Wish you the very best in life. Be happy n healthy...enjoy life. 🌻🌼💮🌹🌷
तुमच्यावर लोभ होताच..आहेच...आणि राहीलही...
फक्त ह्या पुढे या भिंतीवर शुभेच्छांचे सरसकट कुचकामी चूके न ठोकता !
कळावे लोभ असावा.💐
P.S.हे लिखाण कधीचं लिहून ठेवलं होतं,पण रोज कुणाचे न कुणाचे जवळच्यांचे वाढदिवस. असला आहेर कसा देणार ? शेवटी ठरवलं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट टाकावी.उगाच कटूता नको.😃 चुक भुल लेना-देना. दिल्या-घेतल्या शुभेच्छांबद्दल आनंदंच.

No comments:
Post a Comment