Thursday, 23 February 2017

ओम् नमः शिवाय्...


ही पोस्ट मागच्या वर्षीची आहे पण उद्या महा शिवरात्र आहे म्हणून मागेच लिहून ठेवलेलं,पण पोस्ट करायचं राहिलेलं पोस्ट करत आहे. ७ मार्च २०१६ मागच्या वर्षी मी,माझ्या काही मैत्रीणी पॉंडेचरीतल्या 'साकार'या संस्थेत श्री अरविंद घोषांच्या शिबीरासाठी गेलो होतो. शिबीरा शिवाय इतरत्रही भटकणं हा माझा मुख्य उद्देश होता त्यामुळे शिबीराचे आठ दिवस आणि अधिकचे आठ दिवस असा प्रोग्राम मीच प्लैन केला होता.तिरुपती-कांचीपुरम्-महाबलीपूरम-पॉंडेचरी-चिदंबरम्-कुंभकोणम व शेवटी तंजावर असं ठरवून सुध्दा शेवटी तंजावर जमलंच नाही पण सर्वमतानी नजीकच्या अरुणाचलम्-तिरुवन्नमलाईला एका दिवसात जाऊन यायची टूम निघाली आणि सगळेच शिबीरार्थी तयार झाले यायला. काल प्रवचनात कर्मयोगावर भर होता म्हणून की काय सगळेच एकमताने झटपट तयार झाले आणि सकाळीच निघालो.बसमधेच मी रमणा महर्षि,त्यांचा आश्रम,अरुणाचलम् या पहाडा विषयी माहिती लोन्ली प्लेनेट मधून मिळवली कारण माझी पाटी अगदी कोरी होती. गुलबट खडकाळ प्रांत,उन्हाचा ताप(दुपारच्या प्रवचनातून सुटका हा मात्र गारवा). रस्त्यातच वैशीष्ट्यपूर्ण खडक रचना असलेला आपला जिंजीचा किल्ला...बेवारस असल्यासारखा विपन्नावस्थेत उभा.गाडीतूनंच फोटो काढत पाहिला आणि अरुणाचलमच्या पुढ्यातंच असलेल्या रमणा महर्षिंच्या आश्रमात पोहोंचलो.झाडीत लपलेला टुमदार मोठा आश्रम. महर्षिंच समाधी स्थान म्हणजे आधूनिक पण शांत मंदिरंच. भाविकांच पठण चालू. बाजूलाच शिवमंदिर..मोठा सभा मंडप..भाविकांचा अखंड राबता..तामिळी,इतर भारतिय व बरेच परदेशी..समाधी दर्शन-शिव मंदिराला प्रदक्षिणा घालून जशी जागा मिळेल तशी भिंतीला टेकून जो तो ५-१० मिनीटांसाठी ध्यानस्त,आत्ममग्न होताहेत.सगळीकडे निरामय शांतता,स्वच्छता.उगाचच आवडला विचार-व्यक्ति की जीव तोडून हल्लाबोल नाही. समंजस भक्त परिवार. पण बाजूलाच हल्लीच्या जगरहाटी प्रमाणे रमणांच्या नावाची,विचारांची पुस्तकं,सिडीज्-पोस्टर्स-फोटोज-कि चैनस्-पिशव्या-पेन्स् इत्यादी विक्रीला. तिथेच मराठी बोलणा-या पुणेरी पण गुजराती बाई भेटल्या.रमणांच्या फिलॉसॉफीविषयी,आश्रमाविषयी,स्थान महात्म्याविषयी भरभरुन बोलल्या. दिवसाचं गणित जमवत भराभर अरुणेश्वर मंदिराकडे निघालो. Aruneshwar is one of the oldest and mammoth temple of south India. महर्षि रमणांना याच भुमीत कायमचं रहाण्यास प्रवृत्त करणारे पुरातन शिव मंदिर. शिव इथे अग्नी तत्वात आहे म्हणे.आज नेमकी शिवरात्र. आता योगायोगामुळे खुष व्हावे की संभाव्य गर्दीच्या धसक्याने नाराज व्हावं ? पण शिबीरार्थी खुष..माना वर करत,विस्ममयाने भव्य गोपूरं बघत मंदिरात प्रवेश..प्रशस्त मोठ्ठ प्रांगण.आवाक्याच्या मानाने आपल्या कडच्या मंदिरांपेक्षा गर्दी कमीच.एका बाजूला किर्तन चालू आहे.भाविक प्रवासी सामानासह तिथेच पहूडलेत.रांग आहे लांबच लांब.भाषेची अडचण तरीपण जास्त पैसे भरुन झटपट दर्शनाची सोय शोधली पण ती नेमकी शिवरात्रीमुळे मोडीत काढलेली.रांगेत उभं राहून वेळेत आश्रमात पोहोंचण शक्यच नव्हत.एकटी असते तर आटा-पीटा करुन दर्शन घेतलंच असतं.असो. शिवलिंगाच दुरुनंच 'दर्शन'घेतलं,मंदिराची भव्यता टिपत प्रदक्षिणा मारली तर डाव्या बाजूला बायकांची ही रंगबिरंगी झुंबड. भव्य,अंधारं,तेलकट मंदिर.असंख्य दिव्यांच्या तेजाने उजळलेलं पार्वतीचं मंदिर.निश्चय करत मुसंडी मारलीच..१०-१५ मिनीटांच्या तुंबळ रेटारेटी नंतर,घामाचा अभिषेक करत पार्वती अम्माचं दर्शन घेतलंच. भाविकते पेक्षा उत्सुकताच जास्त. ग्रुपमधल्या तमाम स्त्रिया खुषच.पार्वतीच्या दर्शनाने,कुंकवाच्या प्रसादाने सुखावल्या.तेजाचा दिवा तिथे अर्पण करुन कृतकृत्य झाल्या.तरीपण शिवाचं दर्शन हुकलं म्हणून नाराजही झाल्या.म्हटलं नका वाईट वाटून घेऊ..International women's dayच्या पुर्वसंध्येला आपल्याला शिवाच सोडून पार्वतीचं दर्शन घडलं. Its very appropriate !Isn't it ? जय भोलेनाथ !!

No comments:

Post a Comment