Tuesday, 14 February 2017


गेले तीन महिने हुलकावणी देणारी माझ्या टेलर मैत्रीणीची भेट आज घेतलीच.तब्बल दहा ओन्ली टॉप्स शिवायला टाकले.त्याच्या दुप्पट कापडं अजून घरात आहेत आणि त्याच्याही दुप्पट तयार कपडे वापरात आहेत.जायच्या आधी तासभर तर सॉर्टिंग करण्यात गेला.डायरीत नोंदी केल्या.जुने पुराणे उरलेली कापडं,जरीच्या लेसेस..अक्षरशः अवजड झाली होती बैग.तिथे तर दोन -अडीच तास कुठे गेले कळलं नाही.असं-तसं,हा रंग-तो रंग,ही बाही-ती कॉलर..राम..राम..राम...दोघीही कंटाळलो,थकलो.उन्हाळ्याच्या तोंडावर तर नको वाटतात ते पायघोळ-वजनदार-फैशनेबल कपडे.जीवाला जे बरं वाटतं तेच घालावं आता.का आपण धावतो त्या लेटेस्टपणाच्या,क्रिएटिव्हिटीच्या मागे ? शेवटी तर मी तीला म्हटलं I hope this is our last session of this kind.its so tiring and at times meaningless also. घरी येतांना विचारमग्न झाले.खरंच गरज आहे का आपल्याला असं वागण्याची ? का आपण धावतोय असं वेड्यासारखं ? कुठल्यातरी छपाई-विणाईचा छांदिष्टपणा करायचा,भारतीयपणाचा,कलात्मकतेचा अभिमान बाळगायचा आणि हा पसारा जमवायचा.सतत आपलं छान दिसणं,युनिक दिसणं,वेगळं दिसणं ह्या भोवतीच फिरत रहायचं आणि बहुमोल अश्या स्वतःच्या चांगलं वाटण्याला मुकायचं. Days-years are limited now आणि आपण असल्या कामात वेळ,एनर्जी आणि पैसा घालवतोय.Shit..वैताग आहे नुसता.गांधी वाचले,त्यांचा आश्रम पाहिला,बांची कोठी पाहिली,नर्मदा प्रदक्षिणा भुरळ घालतेय..पण आपल्यात काही फरक नाही. कपडा-लत्ता,भांडी-कुंडी,खरे खोटे दाग-दागीने,सजणं-धजणं.. फापट पसारा,धावणं वाढतंच आहे.तृप्ती अशी नाहीच. हे थांबायला हवं कुठे तरी.हो ! यातनही आनंद मिळतोच,मिळतही होता पण आताशा हा आनंद वाळूसारखा सरसर गळून जातोय.मनाला वारंवार प्रश्न पडताहेत.पुन्हा-पुन्हा स्वतःला इव्हैल्युएट करावं लागतय.आणि पदरी निराशा पडतीय. Ought to change drastically ! There is so much in life to see,to enjoy,to do than these mediocre things.कलात्मकतेची कितीही खरी झालर लावली तरी त्याची मुस बाह्यरुपीच आहे. आपलं आयुष्य,आपला निर्णय...अंमलात आणलाच पाहिजे.

No comments:

Post a Comment