औरंगाबादच्या शारदा मंदिर कन्या शाळेत 'मिस शारदा-आकर्षक व्यक्तिमत्व' या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून आमंत्रण.
संस्थेचं शताब्दी वर्ष.शाळेच्या पहिल्या सत्रात स्पर्धा.
सकाळी धावत-पळत पोहोंचले तर अख्खी शाळा नुसती उत्साहाने सळसळत असलेली.गैदरिंग असल्यामुळे आठवी,नववी व दहावीच्या मुली एक से एक तयार होऊन आलेल्या.जणू रंगीत फुलपाखरंच!
शाळाच ती. सगळं वेळापत्रक घड्याळ्याच्या काट्याबरहुकुम.
तीन फे-या.स्वतःची ओळख,कलासादरीकरण व प्रश्नमंजूषा. यातून ज्या तिघी विजेत्या निवडल्या जातील त्यांना परिक्षका कडून एक प्रश्न,ज्याचं उत्तर त्यांनी लिहून द्यायच दोन मिनीटात.
तुडुंब उत्साह..चियर अपच्या टाळ्या,आरोळ्या,दमदार नृत्यांना वन्समोर...
(आमच्या वेळेस(मध्य सत्तरी) आम्ही(म्हणजे मी तरी) खरंच फार बाळबोध व बावळट होतो हे प्रकर्षाने जाणवलं)
चटपटीत टेक्नो सेव्ही मुली,इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा खुप प्रभाव..पण छान सादरीकरण..विषेशतः कला सादरीकरणात अग्रेसर.
तारुण्याच्या उंबरठ्यावरचा खळाळ..जोश..उत्साह..आनंद...
The whole school was only filled with positive energy !
अभ्यासात हुषार असलेल्या,नृत्य,संगीत व वाचनाची आवड असलेल्या..एनसीसी,ज्युदो,कराटे,वक्तृत्वात विषेश प्राविण्य असलेल्या धडपड्या स्पर्धक मुली आणि आपल्या वर्गमैत्रिणीला दिलोजानसे चियरअप करणा-या त्यांच्या चुलबुल मैत्रिणी... शिक्षकवृंदाचं उत्तम नियोजन..मुलींचीही शिस्तीत साथ...वेळ कसा गेला कळलंही नाही.
स्पर्धा संपली.
मुलींची उत्सुकता ताणत अजून एक परिक्षक प्रीती भानुशालींनी विजेती जाहीर केली.विजेतीला मुकुट चढवे पर्यंत प्रेक्षक मुलींनी टणाटण उड्या मारतंच स्टेजचा व विजेत्यांचा ताबा घेतला.
आपल्याच शाळेत आपल्याला सन्मानाने बोलवावं ह्याच कवतिक तर आहेच,पण भल्या पहाटे नव्या पीढीतील शालेय मुलींचा जोश,खळाळ व निःसंकोचीपण बघून रोमांचित झाले.
Yes ! Future belongs to them.
गर्दीतून वाट काढत,सेल्फिजची पखरण करत मुख्याध्यापीकेंच्या खोलीत जाईपर्यंत तमाम चिमण्या सैराट झालेल्या.

No comments:
Post a Comment