तुळशीच लग्न काय लागलं आणि पाचशे,हजारांची खिजगणतीही न ठेवत लग्न कार्यांचा धुमधडाका सुरु. टिळा,साक्षगंध,साखरपुडा,लग्नाची जणू जंत्रीच लागली.छोटे मोठे हॉल,नातलगांची लगबग,नव्यानेच नाते संबध निर्माण झालेल्या नातलगांची ओळख-पाळख,जेवणावळी..
एक ना अनेक कार्यक्रम दोन्ही कडच्या रीतीभाती सांभाळत.आटोपशीर साखरपुड्यात,लग्नात तर वर कुटुंबीयाशिवाय इतर नातलगंच इतका दबदबा दाखवतात ना की बस ! काका,मामा,आतोबा,मावसोबा,काकवा,माम्या,मावश्या,आत्या,दुरचे खट सासरे इतकी हक्काने लुडबुड करतात ना की ज्याचं नाव ते. या लग्नाच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस सुध्दा यांच इतकं प्रेम उफाळून आलेलं नसत कधी.
खरंतर होऊ घातलेल्या वराला किंवा वधुला काही पडलेलं नसत कुणाचेही काका,मावसोबा,आत्या,मावश्या आल्या काय गेल्या काय त्यांच्या लग्नाला.पण हां या मुलांच्या पालकांना नक्कीच तुमचं कौतुक असतं.पण म्हणून त्या प्रेमाचा अवाजवी हक्क नको तिथे गाजवणं योग्यच नाही.सुजाण वधु व तिचे कुटुंबीय न बोलता सगळं टिपत असतात.
आणि मग नंतर संसारात मुरलेली पण तेंव्हा दुखावली गेलेली ही वधु नव-याला वेळोवेळी नेमके टोमणे मारुन अगदी जेरीस आणते.
हं..ते आतोबा गेले का तुमचे ? आपल्या साखरपुड्यात चिडलेले ?
अच्छा..त्या मावशींना हार्ट एटेक आला का ? ज्यांनी लग्नात माझ्या बहीणीचा मान नाही राखला म्हणून थयथयाट केला होता ?
कोण पडलं जिन्यातनं ? ती का लग्नात पैठणीचा हट्ट धरलेली तुमची लाडकी आत्या ?
लग्नात एसी हॉलचाच आग्रह धरणारे पोचले का वृध्दाश्रमात आता ?
तर तमाम सुज्ञ काका, मामा,आत्या,मावश्यांनो...
भाचरांच्या लग्नात जरतारी सिल्कचे कपडे,दागिने घालुन उत्साहाने मिरवतांना,पुतण्याने मारलेल्या परफ्युमने किंवा भाचीने दिलेला गजरा घालून वातावरण सुगंधीत करण्यापेक्षा आब राखून वागा-बोला.नसता तुमची ओळख पुढच्या पिढीत फक्त दुर्गंधी व्यक्ती म्हणूनंच राहील बरे !

No comments:
Post a Comment