Sunday, 11 December 2016

अ...अननसाचा...

थंडीचा डेरा पडलाय...
कोप-या-कोप-यावर भाजी-फळबाजार नुस्ता ओसंडलाय...
रसरशीत,रंगबिरंगी,ताजी,रसाळ,मगजदार,आंबट,गोड
फळचं फळ...
मराठवाडी जनतेला अप्रुप(पुर्वी) असलेल्या अनोख्या अननसाच्याही राशी आहेत गाड्यांवर.

तर काल अननस जैम करायचा म्हणून मोठा अननस निटसंपणे छाटून आणला.
अननस गोलाईत आडवा कापून मध्यम किसणीवर किसून घेतला(छाटून आणल्या नंतर सुध्दा त्याचे बरेच तपकिरी डोळे रहातातंच.किसतांनाही ते किसणी वरंच रहातात.ते मात्र काळजी पुर्वक काढून टाकावेत.एकसंध दळदार जैम होण्यासाठी.नंतर हा किस कुकरमधे पाणी न घालता तिन शिट्ट्या देत वाफवून घेतला.चार मोठ्या लिंबांचा रस त्या वाफवलेल्या पण कोमट मगजामधे मिळवून,मगज कढईत गैसवर शिजायला ठेवला.जेवढा मगज तेवढीच साखर पण टाकली.अननस फार आंबट नसते पण लिंबामुळे जेवढ्यास तेवढी साखर लागतेच.मिश्रणातील साखर पुर्ण विरघळे पर्यंत गैस मंद ठेवावा पण मिश्रण सारखे हलवावे.साखर विरघळली की सतत लक्ष देत रट-रट शिजवावे.चमचा वाढी,दळदार,पाकयुक्त मिश्रण शिजले की गैस बंद करावा. साधारण १०-१५ मिनीटांनी जैम थोडा आळला  की बरणीत भरुन ठेवावा.
हा जैम सुंदर होतो,स्वादिष्ट लागतो व मोहक मधी रंगाचा दिसतो.वरुन कुठलाही रंग,केशर वा वेलदोडा घालू नये.
It gets its own unique flavour and beautiful colour.

No comments:

Post a Comment