हिरण्यला गेल्या १२-१३ वर्षांपासून कमळं (हौदात) आहेत.विविध रंगी कमळं दिवसा-रात्री फुलतात,मिटतात.
पण फार बारकाईने नाही निरीक्षण केलं जात त्यांच फुलणं व मिटणं.
तर आमच्या ह्या घरातही कमळ पॉन्ड आहे.मालकीणबाईंनी उत्साहाने करवून घेतलेला.
उन्हाळा तर तगमगीतंच गेला पण पावसाळा मात्र तब्येतीत आलेला. त्यामुळे खुप कमळ फुलं(वॉटर लिली) एकेक करून सतत फुलत राहिली.भरपुर फोटो काढले.अगदी नादच लागला रोज उठून दार उघडलं की आधी ते लाल-पांढरं टपोरं फुल पहायचा.
पण आता सिझन संपलाय..आणि एकही फुल फुललेलं नाही गेल्या १५ दिवसात.एखादी कळी पण डोकावत नाहीये तरी दार उघडलं की पहिली नजर त्या कमळ पॉन्डकडेच जाते.
फुलांच एक छान असतं पहा. कुणी बघो का न बघो ते आपल्या निसर्गधर्मा प्रमाणे फुलतातंच.तसंच कुणी वाट बघतय म्हणूनही निसर्गाच्या विरुद्ध जात फुलतंच राहतील तर तेहि नाही.अगदी आत्मसात करण्यासारखा गुण.
आपापलं नैसर्गिक भागधेय प्रमाण मानून फुलत रहाणे व निसर्गक्रमानुसार कोमेजुन-मिटून जाणे.
काश ! इंन्सान भी इतनी सहजतासे जी सकता।
विषेशकर औरते ।
आपल्या मानव निर्मित सामाजिक चौकटी,समजूती इतक्या चिरेबंद आहेत ना की माणसांना व विषेशतः स्त्रियांना कायम आपल्या अंगभूत सृजनशिलतेचं बलिदान देवूनच जगावं लागतं.चौकटीत सुध्दा,चौकटी बाहेरसुध्दा !
सुंदर-कुरुप,काळी-गोरी,शिक्षीत-अशिक्षित,
विवाहित-अविवाहित,सधवा-विधवा-घटस्फोटीता,
लेकूरवाळी-बिन लेकुरवाळी,फक्त मुलांचीच-मुलींचीच आई,
पर धर्माची,जातीची इत्यादी अनेक खुळचट समजुतींनी तमाम स्त्रियांच जगणं अक्षरशः जीवघेणं करते ही चौकट.आणि सगळ्यात जास्त भक्कम चौकटी स्त्रियांसाठीच.
पुरुष प्रधान समाजाने ठोकलेल्या.
तर कुठल्याही फुलांसारखंच प्रत्येकाला फक्त आपल्या जन्माशी इमान राखत उमलता,फुलता,महेकता आणि मिटताही आलं पाहिजे नाही ?
That will be a real blissful paradise
on earth !

No comments:
Post a Comment