Tuesday, 29 November 2016

Toast to कुरकूर...

हवेत मस्त गारवा...
भल्या सकाळचा वाफाळता दुसरा चहा...जोडीदाराबरोबर.😊
इकडून विचारणं झालं..टोस्ट हवाय का ?
नको...(मला सकाळच्या १-२ चहा बरोबर काहीही खायला आवडत नाही)
अद्रकवाली चायके गरमागरम २-४ घोट घेतले आणि गुमानं उठून टोस्ट घेऊन नजाकतीने चहात बुडवून त्याचा आस्वाद घेऊ लागले अगदी तल्लीनपणे.
हो..टोस्ट,खारी,बिस्किटं,ब्रेड,लंबे-खारे शंकरपाळे इ.चहात बुडवून खायचे पदार्थ त्या-त्या पदार्थाच्या गुणधर्माला,चहाच्या गरमपणाला जोखूनंच चहात बुडवावी लागतात नाही तर फजिती ग्यारेंटेड.
Its an art by itself !😇
...तर माझ्या अशा एकाग्रपणे टोस्ट खाण्याला दोन डोळे चष्म्यातून मला घुरताहेत हे लक्षात आलं...😵
काय बघतोस रे माझ्याकडे टक लावून ? कालही सिताफळं खातांना असंच बघत होतास...
मघाशी टोस्ट हवे का असं विचारलं तर नको म्हणालीस ना ?
हो...पण आता गेलाय ना चार घोट चहा पोटात,मला आवडतो तसा..म्हणून आता खातेय टोस्ट...😑
आणि हल्ली मी काहीही गोड खाल्लं की तुझी नजरंच असते त्यावर.भगवान की कृपासे न हमको कोई शुगर या बीपी की बिमारी नही है तुम्हारे जैसी..और हाजम भी हो रहा है सब खाया हुवा.
So let me eat peacefully....😒
कुर्रम..कुर्रम...कुर्र...कुर्र...कुर....कुर.....

हं..आणि हे पण आता एफबीवर टाकणार आहे बरंका...
नाहीतर परत म्हणशी....😁
टाका..टाका...नाहीतरी लोकांना आवडतंच दुसर्यांच्या घरात काय चाललय ते जाणून घ्यायला.😉
अरे..तसं नाही...घरोघर मातीच्याच चुली.
In fact people feel..Oh ! They are also so much like us..even fights are same ! 😀

Pass me on some more toasts...एकदम कुरकुरीत आहेत नाही! मस्त...कुर्रम..कुर्रम...कुर..कुर....😆

No comments:

Post a Comment