Tuesday, 29 November 2016

अरे संसार..संसार...

ऐंटिक्स जमा करायला लागल्यापासून तांब्या-पितळीची खुप भांडी बघायला,हाताळायला मिळताहेत.धातुंच महत्त्व पटतयं.त्यामुळे रोजच्या वापरातली २-४ भांडी विकत घेतली जातात.चहा-साखरेचे डबे,पाण्याचे लोटे(सोनगीर व अंबेजोगाईला घेतलेला),पितळेची कढई(साता-याच्या जत्रेत घेतलेली..बाबा बरोबर होते),चहासाठी पितळेचं व तांब्याचं पातेलं(अक्कल गहाण टाकत महागात घेतलेलं) इत्यादी. रोज वापरते त्यामुळे गैसवर ठेवली जाणारी भांडी लवकर कळंकळली.तर ती काल मस्त कल्हई करुन आणली.मीच काय माझ्या कामवाल्यांच्याही नजरेत भरली ती झळाळलेली सुबक भांडी.
पण कल्हई करतांना भांडी बाहेरुन फारंच बेंद्री होऊन जातात.अगदी रया जाते त्यांची.तर मग आधी मावशींनी हात मारला मग मी परत मीठ,लिंबू,पितांबरीने रगडलं तर रुपडं छानस निखारलं.
बायकांच आपल्या भांड्यांवर आपल्या लेकरांसारखंच अविट प्रेम असतं नाही !
प्रत्येक भांड्याच्या खरेदी मागची कथा,प्रसंग,गाव अगदी बेतशीर लक्षात असतं आपल्या.कुणी भांड्यांच कौतुक करायचाच अवकाश की सुरू आपली कथा.कुणाच्याही घरात गेलं की आधी वेगळ्या घाटाची,मटेरीयलची भांडी लक्ष वेधून घेतात तसचं घरी कुणाला जेवायला बोलावलं की खास भांडी आपण वापरायला आवर्जून काढतो.
We do have a very peculiar attachment with our बर्तन्स् !

अगदी घराघरातलं सांगायचं तर(करियरिस्ट)मुलीसूध्दा आईच्या भांड्यांवर बारीक नजर ठेवून असतात.लग्नाआधी व नंतरसुध्दा हक्काने ५-६ भांडी उचलून नेतात.आमच्या एका आईसमान व्यक्तीच्या मृत्युनंतर त्यांची आठवण म्हणून घेण्यासाठी आमच्यासमोर चांदीची भांडी ठेवलेली.आम्ही काही घेतलं नाही. पण तिचं शिकेकाईचं पितळी भांड आपण का नाही मागीतलं याची बोच मला आजही आहे.इतकं ते भांड त्या व्यक्तीशी,काळाशी,सहवासाशी निगडीत होतं.

एवढंच काय आईच्या मृत्यूनंतर,तिची आठवण म्हणून तिच्या घरातनं अशी आयुष्यभराची सोबत केलेली भांडीच मुली आधी उचलतात...जड अंतःकरणाने व भरल्या डोळ्यांनी.
Indeed these pots are more than mere cooking or serving pots.

नामषेश होणारे पुर्वज तर नाही सांभाळू शकत आपण पण वारश्याने आपल्यापर्यंत आलेली ही रांधती,नांदती,बोलकी भांडी जरुर सांभाळावीत.

No comments:

Post a Comment