४-५दिवसांपूर्वी जवळच्याच विठ्ठल-रुख्माई-साई मंदिरात काकड आरतीसाठी गेलेले.परिसरातल्या नगरसेवकांकडून जगवलं जाणारं अत्यंत सुमार इमारत असलेलं मंदिर.
विठ्ठल,रुख्माई,साईबाबा,शनि देव,गणपती, महादेव असे पाच देव.कसेही,कुठेही..पूर्व, पश्चिम न बघता..पाय-याची अनाकलनीय चढ-उतर..स्टेज,अडगळ वाटावी असा पसारा सर्वत्र.आवारात पिंपळ,वड,उंबर,आवळीची झाडं,गाई-वासरं,कडबा,शेण,मुत...थोडक्यात कमी जागेत एकदम अजागळ,ओंगळ कारभार.
माझ्यासारखीचं पण मन विटलं.औषधालापण प्रसन्नता नाही.
आजपासून ब-याच दिवसांपासून ब्रेक घेतलेला मॉर्निंग वॉक सुरु.परततांना मंदिर परिसरात गर्दी. ट्रक भरुन भाविक आलेले.बाहेरून आलेला राजेशाही रथ..ठण-ठण भक्ती गीतं सुरु..मंदिरासमोर सडा-रांगोळ्या..मंडपात काल रात्रीची हरी-हराची पुजा मांडलेली.विठ्ठलापुढे स्थानिक बायका भजनं गाताहेत,अर्थात बाहेरच्या लाऊड स्पिकरमुळे त्यांचा आवाज हरवलेला.
मंडपात साईबाबांची चांदीची पालखी,नखशिखान्त शेंदुरलेले पगडी धारक भालदार-चोपदार..किर्तनाचा सरंजाम..शुभ्र किर्तनकार...साईबाबांची पालखी पाथ्रीहून मुक्कामी आलेली..आता प्रस्थान करताहेत.
थोडक्यात दडपशाहीवाल्या परकियांच आक्रमण झाल्यावर स्थानिकांची जी अवस्था होते तीचं अवस्था विठ्ठलाची व त्या बायकांची झाल्यासारखी वाटली.
तर असे असतात एकेकाचे दिवस !

No comments:
Post a Comment