Sunday, 13 November 2016

कमळायन...

आम्ही कोटला कॉलनीत रहात होतो(early seventies)तेंव्हा आयुष्यात पहिल्यांदा गडद गुलाबी रंगाचं कमळ(water lily) पाहिल्याच आठवतय.एकजण सायकलवर कमळं विकायला यायचा.एक रुपयाला एक कमळ बहुधा. सगळ्या मुली अगदी हरखुन जायच्या ती गठ्ठ्यानी पाणीदार कमळं बघून. हट्टाने एक-दोन तरी आम्ही विकत घ्यायचो व बाटल्यांमधे पाणी भरून कसंबसं २ दिवस टिकवायचो त्या फुलांना.
आपण आयुष्यात इतकी विविध फुलं पाहतो.काही त्यांच्या रंगाने,रुपाने,गंधाने,नावाने,एखाद्या विशिष्ट प्रसंगाने मनात कायमची दरवळतात तर बाकी फुलं सहजपणे 'आणि इतर' केटेगरीत टाकून आपण बेदखल करतो.
पण सर्व भारतीयांच्या मनात अप्रुप असलेलं एकमेव फुल म्हणजे कमळ.हिंदु संस्कृतीत तर कमळाला अनन्य साधारण महत्व आहे.
लहानपणापासून पहात आलेली कमळावर बसलेली सरस्वती, महापुजांसाठी वाहिलेली कमळं,चित्रकलेच्या संस्कारातील टिपीकल कमळ आणि अल्टिमेट केलेंडरी निसर्ग दृश्यात हमखास दिसणारा कमळांनी भरलेला तलाव.
चित्र,शिल्प,साहित्य सगळीकडे कमळाचे उल्लेखनीय उल्लेख आहेत.
Every Indian has a facination for Lotus.
पण कमळ म्हणून आपण नेहमी जी फुलं वापरतो ती असतात खरंतर वॉटर लिलीज् !

आम्ही हिरण्यला दोन छोटे लोटस पॉन्डस् केले आहेत.गुलाबी व पिवळी मध्यम आकाराची कमळं,दिवसा उगवणारी व दुपार नंतर मिटणारी.तर टपोरं पांढर फुल रात्रीच उमलणारं.
बरेच फोटो त्याही फुलांचे काढलेत पण हिरण्यचा नैसर्गिक पसारा इतका मोठा आहे की फार बारकाईने या फुलांकडे नाही बघीतलं जात.

माझी मुलं बरीच लहान असताना आमच्या घरात छोटासा लोटस पॉन्ड होता.पिवळी छोटी फुलं यायची.पाण्यात छोटे मासे पण होते.आणि मुलांच वय इतकं लहान होतं की we were more interested in fishes than those flowers.

पण मग हिरण्यसाठी बरीच मुशाफिरी करताना एकदा बासरला गेलो होतो तर पार निजामाबाद पर्यंत मजल मारली होती कमळ कांद्यांच्या शोधात.कोकणातही फिरतांना दाभोळ-दापोलीच्या मधे डॉ.कोपरकरांची खुप मोठी नावाजलेली नर्सरी आहे.हौशी,उत्साही,अभ्यासू दांपत्य.खरा व्यवसाय सुपारी-आंब्याच्या रोपाचा पण जाऊ तिथून रोपं,बीया आणून रुजवायचा,त्याचा अभ्यास करायचा त्या दोघांनाही छंदच आहे.त्यामुळे एकावेळस १०-१५ प्रकारचे वॉटर लिलीज् बघायला मिळाले पण विषेश म्हणजे खरं कमळ(ज्यावर आपली सरस्वती बसलेली असते ते.परदेशातून आणलेलं)पहायला मिळालं,पण लहान रुपातलं.
एकलिंगजीला पण भरपुर कमळं आहेत.ख्यातनाम चित्रकार रामचंद्रननी फार सुरेख वापर केलाय कमळांचा त्यांच्या पेंटिग्जमधे.तसेच फ्रेंच चित्रकार क्लॉद मोनेची ओळखंच मुळी वॉटर लिली चित्रकर्ता म्हणून आहे.
तिरुपती पायथ्याशी पदमावती देवीला अशीच गडद गुलाबी कमळ फुलं वाहायची प्रथा आहे.तुडुंब टवटवीत बाजार असतो फुलांचा मंदिरा समोर.पॉन्डेचरीलाही मंदीरांसमोर असाच गुलाबी बाजार भरतो.सुगंध नाही पण मनमोहक रंग व टपोरेपणामुळे हरखुन जायला होतं मात्र.

तर आमच्या या घरात पण छोटा पॉन्ड आहे.गुलाबी व पिवळट पांढरी कमळ फुल येताहेत.पावसाळ्यात आधी गुलाबी फुलली आणि आता पांढरी फुलताहेत..मिटताहेत..उमलताहेत.

रोज सकाळचा निवांत तासभराचा वेळ,कोवळ ऊन,ताजं उमललेलं सुकुमार टपोरं फुल,आसपास सुशेगात तरंगणारी पोपटी-हिरवी गोलाईदार पानं,लपंडाव खेळणारी पिटकुले मासे.
तुडुंब फोटोग्राफी चालू असते माझी सकाळी व इतर प्रहरी पण.
एखाद्याला आईला आपल्या लेकराचा फोटो काढायचा जसा छंद लागतोना तशीच माझी अवस्था झाली आहे.
एक फुल साधारण तीन-चार दिवस उमलतं.त्यामुळे खुप वेळ मिळतो फोटोंसाठी,पण आता कंटाळा आला आहे त्या फोटोंचा.
पण काय करणार मोह आवरतंच नाही ही राजस फुलं पाहिल्यावर.
गैलरी खच्चुन भरली आहे कमळाच्या फोटोंनी.शेवटी ठरवलं लिहाव्यातंच १५-२० ओळी कमळां विषयी आणि सगळा अल्बम अर्पण करावा वाचकांना,आणि करावी एकदाची गैलरी थोडी रिकामी.
या फुलां विषयीची इतरही माहिती लिहावी असं मनात होतं पण anyone can find it out from net.मी काही वेगळं लिहू शकणार नाही.
तर आज अगदी ठर-ठरवून दुरच्या काकडारतीला आंघोळ करुन पहाटेच गेले.परत येऊन चहा घेतांना बघते तर काय कालचं फुल कोणीतरी तोडून नेलेलं.मिटलेली कळी पण जागेवर नाही.अरे चोरा !
असो enjoy the album and writeup !

No comments:

Post a Comment