Saturday, 12 November 2016

मिरचीचं लोणचं...

ताज्या हिरव्या लोणच्याच्या मिरच्या अर्धा किलो..
चिरुन व नंतर मिक्सरमधे अधड-बदड व्हिप करुन घेणे.
लांबसर किसलेलं आलं अगदी बेताने..
पाव किलो लिंबांचा रस..अंदाजे मीठ व रेडिमेड केप्रचा मिरची लोणचं मसाला.(१००gm)
व्हीप केलेल्या मिरच्यात आलं,मीठ,मसाला, लिंबू रस मिक्स करुन बरणीत भरुन ठेवणे.रोज जरासं ढवळणे व वाटल्यास मीठ,लिंबू रस वाढवणे.५-६ दिवसातंच मुरते.
व्हीप केल्यामुळे कुणी मिरच्या पानात टाकायचा प्रश्न येत नाही.तसेच लोणचं जूनं झाल्यावर थालीपीठ,धपाटे,
पु-या,वरणात सहजपणे वापरुन संपवता येते.
पध्दत अजिबात वेगळी नाही पण व्हीप केल्यामुळे झटपट मुरते,वाढायलाही सोपे जाते व दिसतेही ठेच्या सारखे छान.
टेबलावर घेतांना बाऊलमधे थोडं लोणचं काढून भरपूर तेल,मोहरी,हिंगाची फोडणी दिली तर अजून खमंग लागते.

P.S. रस पिळून उरलेले लिंबाचे काप बिया काढून कात्रीने बारिक कापावेत व नंतर त्यात हिंग,मीठ,व परत काही ३-४ लिंबांचा रस पिळावा.मुरल्यावर छान लागते.लोणचं म्हणून नाही पण तोंडाला चव येते.येता-जाता खायला मस्तच.

No comments:

Post a Comment