अगदी ऐन दिवाळीची सकाळ...
माझा एकटीचा पहिला चहा व्हरांड्यात..
पंचमबाबा झाडायला आलेले..दारातल्या काळ्या ग्रेनाईटच्या फरशीवर तांदुळ भिजवून, पेस्ट करून,त्या पेस्टने मी काढलेली रांगोळी.झाडतांना रांगोळी मिटण्याची चिंता नाही.बाबांनी अशी रांगोळी पहिल्यांदाच पाहिलेली बहुधा.
कोण कौतुक वाटलं त्यांना.
बाई..मपल्या पोरानं बी काल बिल्डिंगामदी लय मोठी रांगोळी काढलीया. सगळे लगी थांबू,थांबू बघायलेत.त्यो लहानपनापास्नचं लई नाद्दर रांगोळ्या काढतुया..शाळत बी त्याचंच काम व्होत रांगोळ्या काढायचं..रांगोळ्या,अवषधीच्या बारकुल्या बाटल्यांची झुंबरं..मास्तरांना बी लई कवतीक त्याचं..बीडच्या यका डॉक्टरनं तर ह्ये मोठ्ठ झुंबर घ्येतलं ना करवून त्याकडून.
अरे वा ! हरहुन्नरी दिसतोय..रांगोळ्या म्हणजे मस्तचं...
हाव बरं..काल तं दीपवाळीची यकदम खासंच काढलीया..यानं बगायला...
हो..हो..येते हं.
झाडून झालं...चला न वं..रांगोळी बगायला..
अहो इतक्या सकाळी ? रात्रीच्या कपड्यात..गेसवर तुप ठेवलय कढवायला..येते मी..जाता-येता डोकावते..नक्की.
चला की वो..उगं दुरुन बगायचं..समोरच तं हाय..चला..चला...
नाईलाजाने आहे त्या अवतारात गेले..जिन्याच्या तोंडाशीच भली मोठी गोल,ठसठशीत रांगोळी सफाईदारपणे काढलेली..रंग भरलेले.जवळच त्यांच्या म्हणायला दोन खोल्या.एक दाराची,एक बिन दाराची.
या..या..खुर्चि आणत..बसा..बसा..च्या घ्या दिपवाळीचा..
घरापाशी गेले तर स्कोडा कंपनीत परमनंट असलेला,उद्या जर्मनीला चाललेला बांबाचा मुलगा दिवाळीच्या भल्या सकाळी मशिनवर शिवण शिवत बसलेला...
अरे तुला शिवण येतं ?
हो ताई मला शिवण येतं नां.आईच्या नव्या साडीचा ब्लाऊजपिस फाडला नां मग त्या पदराच्या झिरमाळ्या ब-या नाही दिसत,म्हणून पदराला वळवून शिवत होतो.
या ना..बसा...चहा...
अरे नको..थांबत नाही..गेसवर तुप ठेवलत कढवायला...
झाली का तयारी निघायची ?
हो...झाली तयारी सगळी..उद्या निघणार.
तो पर्यंत पुत्र कौतुकाने भारावलेल्या बापाने भली मोठी नवीकोरी,गच्च भरलेली सुटकेस दाखवली..आईने प्रेमभरल्या काळजीने करुन दिलेल्या चटण्यांची पाकिटं दाखवली...
अख्या कुटुंबाचा,घराण्याचा,गावाचा,पंचक्रोशीचा कौतुकाचा प्रसंग.आडबाजूच्या मराठवाडी खेड्यातला,कष्टकरी वर्गातला एक मुलगा स्वतःच्या मेहनतीच्या,कष्टाच्या बळावर जर्मनीला चाललाय.
त्याची बायको,मुलगी परगावी माहेरी.आई-वडील कौतुक भरल्या चिंतेत,पोराचं तिकडे कसं होणार म्हणून. आणि पोरगा आईची दिवाळीची नवी साडी शिवतोय मशीनवर !
भलेपणाचं रक्त धमन्यातनं वहाणारी सदगुणी माणसं कुठेही निपजतात नाही !
रंग,धर्म,जात,लिंग,समाज रचना,आर्थिक स्तर,शिक्षण...
अगदी कश्यालाही न जुमानता.
P.S.त्यांचे सोसायटीवाले तो(सोमनाथ) जर्मनीतून परतल्यावर त्याचा सत्कार करणार आहेत.बाबा कौतुकाने सांगताहेत.

No comments:
Post a Comment