Wednesday, 9 November 2016

बाद..बरबाद...ब्राव्हो !

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यवहारातनं ५०० आणि१००० रुपयांच्या नोटा एका झटक्यात बाद केल्या आणि एक मोठं वादळ निर्माण केलं.
तसं पहाता आपल्यासारख्या मध्यम-उच्च,उच्च वर्गीयांना या निर्णयामुळे थेट काही फार पडत नाहीये.
एकतर आपण काळा पैसा बाळगत नाही,जमवत नाही.
व इतरांच्या काळ्या पैश्याचा डायरेक्ट जाच आपल्याला तसा होत नाही,जाणवत नाही.तरीपण निर्ढावलेल्या जाड कातडीच्या सिस्टीमला चांगलाच दणका मिळाला और दिलको तसल्ली मिली.

जाणीवपूर्वक जगतांना एकीकडे गरिबांची पिळवणूक, हतबलता,दारिद्र्य बघून पोटात तुटतं तर दुसरीकडे गैरमार्गाने पैसा खाऊन मस्तवाल झालेल्यांना बघून चीड येते.
मनाला टोचणारी एक साधी गोष्ट.
कुठल्याही अपघातात साधा सायकल बाईकवाला,
बैलगाडीवाला,पादचारी गेला की त्याच्या जीवाची नुकसान भरपाई एखाद्या लाखात आणि तीच विमानप्रवाशांची मात्र अनेक लाखात.हा कुठला न्याय मृत व्यक्तीचे मुल्य अशा पध्दतीने ठरवणारा ?
तसचं त्या नैसर्गिक आपत्तींच पण.भुकंप म्हणा,त्सुनामी म्हणा,ओला-सुका दुष्काळ,पूर,रोगराई कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की कायम दुर्बल व गरीबंच मरतात शेकड्यांनी,हजारोंनी.अपवाद वगळता धनाढ्य कायम सुरक्षित राहतात व सिस्टीमही झुकतं माप देते त्यांना.

भारतीय इकॉनॉमीवर दुरगामी परिणाम करणारा हा निर्णय तळागाळातल्या गरीबांच्या तर अजून गावीही नाही.
मध्यम वर्गीयांना जरा १-२ महिने अडचणीचे वाटतील एवढेचं.
पण खरा फरक पैशाच्या जोरावरच आजवर जगलेल्यांना व त्याच्या ताकदीवर बेमुर्वतपणे काहीही करु शकणार्यांना पडणार आहे.
आणि त्यामुळे खरोखरंच हायस वाटतयं.

या निर्णयामुळे भले गरीबांच्या ताटात लगेच मासा पडणार नाही पण यामुळे हे धनांध शार्क मासे बिनबोभाट जाळ्यात अडकले याचा एक नागरिक म्हणून मनस्वी आनंद होतोय.
आणि पक्ष,राजकारण,वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाऊन देशाच्या भल्याचा विचार करणारा धोरणी नेता म्हणून आपल्या मोदीजींचाही अभिमान वाटतो आहे.

Bravo Modiji...for taking leadership to the new height...giving power a new dimension
and showing to the world that what do you mean by nation first !
United we stand strong !!!

No comments:

Post a Comment