माझ्याकडे झाडू-फरशीचं काम करणारी मीना ऐन दिवाळीत आलीच नाही.मग आल्यावर सांगत होती..
ताई..माझ्या भावाची मेहुणी वारली.विहीरीत जीव दिला.
गरोदर होती.तीन दिवसांनी सापडली.
फुगलेली..खेकड्यांनी कुरतडलेली.सासरहून भांडून आली होती.तिला लग्नच नको होतं.फार लहान वयात आई-बापाने लग्न लावून देलतं.आई-बापान थोडा तरी आपल्या लेकराचा विचार करावा का न्हाई ? स्वतःही गेली आन् दुसर्याच बी तोंड काळं करुन गेली..तिचं ते सडलेलं प्रेत तं डोळ्या पुढून जाईना माझ्या...कसली दिवाळी हो ताई !
दरम्यान औरंगाबादच्या फटाका मार्केटला आग लागून सगळी दुकानं,खुपसार्या बाईक्स्,गाड्या जळून लोकांच खूप नुकसान झालं.आमच्या धोबीणीच्या होतकरु मुलाचही दुकान,गाडी भस्मसात झाली.त्या विषयी जरा घरात चर्चा करत होतो तर नंतर मला,ताई..माझ्याबी भावाचं लई नुकशान झालं वं...
पाच दिवसाची दिवाळी म्हणून झेंडु फुलांचा माल त्यानं भरला होता.पण म्येवणीचं आसं झालं आन् सगळी प्योती तशीच टाकून ग्येला तिकडं.त्यात त्ये स्युसाइड केल्येलं पोरीनं..
पोलीस, सासर,माहेर...लई धांगोडा झाला तीन दिवस.
पोत्यांनी फुलं सुकली,सडली.
फुलांना लई सांबाळावं लागतय ताई..
हवा-पाणी द्यावं लागतं,ऊन-सावली करावं लागतं.
ताई..फार जीव लावावा लागतो फुलांना तवा कुटं चांगली र्हातात फुलं.
फरशी पुसतांना या अशिक्षित बाईंनी जीवनातलं एक तत्वज्ञानंच किती सहज-सोपं करून सांगितलं.आणि जी व्यक्ती फुलांना जीव लावण्या विषयी इतकं आत्मियतेने,ओलाव्याने बोलते तिला साधं माणूस म्हणूनही आदराने वागवलं जात नाही तिच्या घरवाल्याकडून.
कामाच्या पहिल्याच दिवशी नवर्याने दसर्याच्या दिवशी मारलं म्हणून टचकन् डोळ्यात पाणी आलं होतं हिच्या.
तिच ती कथा.फक्त स्वतःच्या पिण्यापुरतं कमावणारे बेजबाबदार,छळवादी नवरे.
पदरी तीन पोरं.वयात आलेली शाळकरी मुलगी गल्लीतलं वातावरण बरं नाहीत म्हणून परगावी दिरांकडे ठेवलेली.
दिवसभर पोटासाठी,कुटुंबासाठी कष्ट तर रात्री नवर्याचे तमाशे.
किती या बायका मन मारुन संसार निभावतात तरी पण चेहर्यावर हसू आणि मनात हा कोमल जिव्हाळा.
खरंच फार कौतुक वाटलं मला तिच्या सरळ-साध्या बोलण्याचं.
आणि पुन्हा एकदा स्त्रीच्या अनेक पदरी पण चिवट शक्ती सामर्थ्यापुढे मनोमन नयमस्तक झाले.

No comments:
Post a Comment