Saturday, 22 October 2016

वेठीला धरलेला चंद्र...कोजागिरीचा !

नुकताचं much awaited Ellora-Ajata International Festival संपला आणि व्यक्तीशः सुटलो.
एकतर हा महोत्सव झालाच मुळी चार वर्षांनी.
मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच वर्ष सगळ्याच अर्थाने बरं वाटावं अशी परिस्थिती.
मस्त पाऊस,राजकारण्यांच लक्ष,औद्योगिक भरभराटीची चिन्ह,नागरिकही एकजुटीने जागरूक.
सुत्र हलली व झटपट या महोत्सवाच्या तारखा निघाल्या,
कलावंत ठरले.महिनाभरापासुन शहरात तयारी दिसू लागली.
मग महाराष्ट्रातल्या पर्यटन राजधानीतला आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणजे काय अशी-तशी गोष्ट आहे का राव ?
तेही गाववाल्यांच्या मनात अजुनही जुन्या अनेक महोत्सवाच्या सुरेल ताना, झंकार आणि पदन्यास गुंजत असतांना ?

पहिला दिवस वेरुळच्या कैलास मंदिरासमोर.
मंदिर पाठीशी राहील असं ऐस-पैस उंच स्टेज.
लाईटस्,कैमेरे,म्युजिक सिस्टिम्स व नंतर उतारावरची प्रेक्षकांची आसन व्यवस्था.
मुख्यमंत्री येणार म्हणून मोठ्या संख्येने पोलिस
औरंगाबाद-वेरूळ रस्त्यावर व कार्यक्रम स्थळी.
कमानी,रांगोळ्या,झेंडूची फुलं,रोषणाई..उत्तम स्वागत. वेळापत्रकही अचूक पाळलं गेलं.पार्वती दत्ता,यास्मिन सिंग,ग्रेसी सिंग आणि चमुची नृत्य,सानिया पाटणकरांच गायन व उध्दव आपेगावकर व बर्ट कार्लसन यांची पखावाज/मृदंगम आणि सितारची जुगलबंदी. अशा तब्बल पाच कार्यक्रमांची रेलचेल.त्यातच मधे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचं 'तेजोमय'उदघाटन,भाषणं व चार पुस्तकांच धडाकेबाज प्रकाशन.म्हणजे चार तासात पाच कल्चरल व एक हाय प्रोफाईल उदघाटन सोहळा.
सुरुवात आपल्याच पार्वती दत्ता व त्यांच्या चमुच्या कथ्थकने झाली.नृत्य सादरही झालं त्यांच्या किर्तीला साजेसंच.
पण काय करणार स्टेज उंचावर व प्रेक्षक उलट उतरत्या आसनांवर बसलेले,आणि मधे प्रकाश,संगीत, कैमेरे अश्या सेवांचे अडथळे.पण त्यांचे नृत्य नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण व छानंच झालं.(इथे असावं असही म्हणू शकतो..इतका तो पदन्यासी अविष्कार दुर होता नजरेपासून)
सानिया पाटणकरांच गाणंही यथोचित झालं व रंगलंही छान.
पण नंतरच्या आपल्याच आपेगावकर व त्यांचे सहकारी बर्ट कार्लसन यांच्या पखावाज व सितारीच्या जुगलबंदीला जेमतेम पंधराच मिनिटे का मिळाली वा देण्यात आली त्याच गौडबंगाल काही कळालं नाही.रंगणारी जुगलबंदी अचानकचं संपली.
मुख्यमंत्र्यांच्या व इतर पदाधिकार्यांच्या आगमना नंतर कार्यक्रमात मधेच झटपट उदघाटन सोहळा-स्वागत-सत्कार..
रावळजी व फडणवीस मोजकंच पण महत्वाचं बोलले.
त्यांच्या हस्ते तब्बल चार पुस्तकांचा-मासिकांचा प्रकाशन सोहळा पार पडला.(अजिंठा-वेरूळ-औरंगाबादवरची कोफी टेबल बुक्स आहेत.अजून बघायला मिळाली नाहीत)
यास्मिन सिंग व ग्रेसी सिंग यांची नृत्य म्हणजे it was more of a audio-visual program with some added dance steps.झगझगीत प्रकाश योजना,उच्चस्वरातली रेकोर्डेड गाणी,मंत्र,स्तोत्र..चटपटीत वेषभुषा..all in all पब्लिक खुष असते असल्या सिनेमेटीक इफेक्टवाल्या कार्यक्रमांवर.
जुन्या एलोरा फेस्टीवलमधे कलावंतांचं सादरीकरण होतांना श्रोते मंत्रमुग्ध होत जागीचं खिळून बसायचे.इथे मात्र मंत्रीमहोदय गेले की प्रेक्षकांनीही काढता पाय घेतला.आम्ही पण तेच केलं.एखाद्या बड्या शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमासारखे ते orchestarised नाच (नृत्य नाही)
बघवेनात. विषेशतः कैलाशासमोर म्हणून तर जास्तच खटकलं.
नशीब या ठणठणाटामुळे एखाद-दुसरा मागचा खडक नाही निखळला.

दुसरा दिवस शहरातल्याच सोनेरी महालात.(युनिव्हर्सिटीचा परिसर)
अजय-अतुल आणि चमुचा(कुणाल गांजावाला,अभिजीत सावंत,ह्रषिकेश रानडे,योगिता गोडबोले,प्रियांका बर्वे,स्वरूप खान,सोनाली कुलकर्णी व मकरंद अनासपुरे) लाईव्ह शो.
कलासागरच्या कृपेने भुतो न् भविष्यती अशी
इतक्या लंब्या-चौड्या गाड्यांनी एकसाथ युनिव्हर्सिटी परिसराची धुळ झाडली.
तुफान गर्दी, तसेच पोलीस पण.
अमाप पण आकर्षक डेकोरेशन.
स्वागताला सिक्युरिटी,भालदार-चोपदार-तुतार्या-नऊवार.
आधुनिक महाराष्ट्र या नऊवारी घोळातनं कधी बाहेर येणार कोण जाणे ?
गर्दीवर अजय-अतुलचं गारुड अगदी जाणवण्या इतपत.
तेही दोघेजण ते जाणूनंच पाठची भिंत दुभंगत नाट्यमयरित्या स्टेजवर अवतीर्ण झाले व नंतर त्यानी एकजात सिने गीतं,नृत्य सादर केली.LED wall,blasters,fire shots,focuses,
कर्ण कर्कश्य म्युजिक अशा जबरदस्त जामनीम्यात हल्लीची लोकप्रिय गाणी आम्हा रांगड्या मराठवाडीयांसमोर सादर केली.
आकाशातून पडणार्या झिरमाळ्या,ठणठण कोरस,वाद्य,
(सिने तारकांचा) झगमगीत नाच..पब्लिक खुष...
पण मधेच power cut ने दगा दिला आणी रेकोर्डेड गाण्यांचे तुकडे ऐकवले जाताहेत हे कळून हसंच झालं.
(कोणाचं ?) पण आपल्याचं मकरंद अनासपुर्यांनी सगळंच हसण्यावारी नेत भरपुर टाळ्या घेतल्या.
With due respect to everyones artistic capacity, it was very well organised orchestra.जे टीव्हीवर बघतो ते प्रत्यक्षात याची देही याची डोळा बघायची संधी आम्हाला मिळाली.आयोजकांचे धन्यवाद.उलट आम्हीचं कार्यक्रमाला power cut चं मराठवाडी गालबोट लावलं त्यामुळे माफी मागतो.
या असल्या नेत्रदिपक-कंठाळी झगझगीत कार्यक्रमांमधे एक बरं असतं, गायकांच बरं-वाईट कसब धकून जातं.
*ऐकीव माहिती नुसार अजय-अतुल आणी चमु(५०+) नेट सव्वा कोटी घेऊन गेले म्हणे.
Was it worth Aurangabadkars ?
या पेक्षा आपापल्या घरी सोफ्यावर लोळत टीव्हीवर यांचा दुसरा कुठलाही कार्यक्रम पाहिलेला परवडला असता.

तिसर्या दिवशी कनिका कपूर हिचे व अदनान सामींचे गायन.
कनिकाचे गायन म्हणजे काही तिची व बाकीची तद्दन फिल्मी रिमीक्सच्या गाण्यांचे मुखडे.
लता,आशा,गीता सगळ्याच गायल्या हिच्या गळ्यातनं.
जोरदार वाद्यवृंद,नेत्रदिपक प्रकाश योजना,चटपटीत गायिका व तरुणांना आवडणारी,ताल धरायला लावणारी लेटेस्ट सिने गीतं...तरुणांना सामावून घेत गायीकेची live videos, selfiesची पखरण..काही गाण्यांवर तर प्रेक्षक नाचलेही.
होळीचीच आठवण झाली.
अदनान सामी सूफी गाणार असा समज होता पण त्यानेही शम्मी कपूर स्टाईल एंट्री घेतली आणी पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज आला.
अवतीर्ण झाल्या-झाल्या त्याच्या Love you Aurangabadच्या घोषात आणी flying kisses च्या बरसातीत तरुणाई चिंब झाली.पण सगळ्यांचेच अंदाज चुकवत त्याने गाता-गाता जे काही विदुषकी चाळे केले त्याला तोड नाही. थयथयाटी वाद्य, प्रकाश योजना आणि हे नाटकी चाळे या पुढे अदनाननेच वाजवलेल्या पियानोचे
अत्यंत तरल सुर आणि अदनानचाच मखमली आवाज पार हरवून गेला.पण तरुणांनी ताल धरला.भले नंतर खाजगीत असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात का? म्हणून नावंही ठेवली हेही तितकंच खरं.
शेवटी गर्दीचा धसका घेत अर्ध्यातनं परतावं असा सुज्ञ विचार करत परतलो.
कौतुक करायचं तर नम्रता स्विटसने हे दोन्ही दिवस जातीने प्रत्येकाला रिफ्रेशमेंटचा (डबा पाण्यासह)व्यवस्थित दिली.
पण ह्या कलावंतांच्या ठणठणाटामुळे अर्ध्यातनंच घरी जाऊन त्याचा आस्वाद घ्यावा लागला.

सर्वांनी इतकं जातीने लक्ष घातलं तरी हा इंटरनेशनल फेस्टिवल का अपेक्षित उंची गाठू शकला नाही ?
का फक्त काही जणांनाच वाटतय असं ?
जुन्या अशाच महोत्सवाबद्दल बोलायचं तर फक्त श्रोतेच नाही तर येथे कला सादर करून गेलेला प्रत्येक जगप्रसिध्द कलावंत देखील एका अविस्मरणीय मैफिलीची आठवण बरोबर घेऊन गेलेला आहे. प्रेक्षकही अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन परतत.
कुठल्याही अंगाने हे या वर्षीचे अधिकतम कार्यक्रम अभिजाततेच्या जवळ जाणारे नव्हते ना लोकांच्या मनात घर करणारे होते.
एकदाचा महोत्सव संपला आणि सुस्कारा सोडला.

तसचं ते कलाग्रामच्या बाबतीतही झालं.ह्याच महोत्सवाचं glamour इतकं होतं की तिकडे कोणी फारसं फिरकलंही नाही.हेच कलाग्राम(stalls) सोनेरीमहाल परिसरात असतं तर निदान foot fall तरी वाढला असता व कलावंत-कारागिरांना उमेद मिळाली असती.
पण या हस्तकारागिरांच्या कलात्मक बोटी कुठल्या लाटेने दुसर्या किनार्याला फेकल्या गेल्या बरं ?

मला वाटतं या पुढे एवढ्या नियोजनात,पैशात दोन फेस्टिवल करावेत.
एक फक्त तरुणांसाठी(सिने,टीव्ही कलाकारांना,नृत्यांगनांना बोलावून)
व दुसरा मात्र शतशः अभिजात गायन,वादन,नृत्याला वाहिलेला,
जुन्या महोत्सवाच्या वारश्याला जागणारा.
होना उगाचंच कुणावरही अन्याय नको.
याच वर्षी त्या कोजागिरीच्या चंद्राला वेठीला पकडून अन्याय केलाय तेवढा बास !
No ! Not again !

No comments:

Post a Comment