पाऊस गेला पण जातांना दिवसाचं ऊन व पहाटेचा गारवा पदरात टाकून गेला.
डासांच उत्पादन जोरात.चहूबाजूंनी बाग असल्यामुळे दारं-खिडक्या उघड्या टाकायची सोय नाही.पंचमबाबाही हल्ली जरा वरवरंच काम करताहेत.मनाने चांगले आहेत पण जरा चंचल व गप्पीष्ट आहेत. तर आज फिरून आल्यावर त्यांना गाठलंच आणि आज बाग कशी स्वच्छ झाली पाहिजे ते जरा करारीपणानेचं सांगितले.
बरं..बरंं...बरं...करत्यो.
तसं सांगितलेलं काम करतात व्यवस्थित पण मधून मधून सांगावंच लागतं.
इतक्यात त्यांच्या नातीचा रडायचा आवाज...
झाडता झाडताचं जोरात सूनेला...दुर्गे...ए दुर्गे...कामुन रडायली पोरगी ?
आं...कुटं ?
कुटं म्हंजी काय ? मी मागलं झाडायलो तर तिथ पत्तुर आवाज यायलाय पोरीचा अन तुला ऐकू येइना ?
काई नाई मामा...
काई नाई काय ? चिरचिर चिरकायली ती पोर कवाची...टाक त्ये आधी हातातलं काम आन उचील लेकराला...
हा संवाद उच्च स्वरात दोन्ही कडून. बाबा इकडे,सून तिकडे.एकदम मराठवाडी खणखणीत आवाज आहे सगळ्यांचा.अलार्म लावायची गरजंच नाही.सहा वाजल्यापासून सुरु करतात.
काय बाबा आजी नाही का घरी नातीला बघायला ?
आजी का ? हाय नव्ह..पन ती आजीजवळ जातंच न्हाय...आजी म्हटलं की रडती...आजी रागाभरती नां !आरडती...लेकरं घाबरत्येत आरडलं तर...
हं...आजी जरा तिखटंच आहेत तुमच्या...कडक काम आहे...
होनं..होनं..होनं...त्या तशा ताप्पड हाईता म्हनुन तं सारा खेळ हाईना ! न्हाय तर काय बी नव्हतं बगा माझ्याकडं...मोज्जुन चार पत्रं...बाकी काय नव्हतं...सगळी बाईची करामत...भावांना धरून र्हायली...कष्टाला हटली न्हाई...
सगळ्यांच करून धरुन र्हायली..पोरांच शिक्शन,लगिन लगी सगळं धोरणं त्यांचच..म्हनुन तर ह्ये दिवस दिसू र्हायलेतं...
खोटं कशाला बोला ? ज्ये ह्यायते ते हायेचं !
आम्ही दोघंही हसलो.त्यांच्या नितळ उमदेपणाचं कौतुक वाटलं.कीती जणींच्या वाट्याला असे उस्फूर्तपणे कौतुकाची थाप देणारे साथीदार येत असतील ?
त्यांच्या बाईंना एकदा हे वाचून दाखवायला पाहिजे म्हणजे हट्टी कळी जरा तरी खुलेल !

No comments:
Post a Comment