Monday, 10 October 2016

सावन के झुले...

सध्या नाक टोचून घ्यायच्या विचाराने उचल खाल्ली आहे. साउथ इंडिया ट्रिपचा परिणाम बहुधा. तर नेट वरून का,कश्यासाठी,डावी-उजवी बाजू, त्याची कारणं, भारतीय आणि पाश्चात्य विचार,त्याचे ठोकताळे अशी माहिती मिळवलेली पण आता जाऊ तिथे,दिसेल त्या महिलेच नजरेनीचं स्कैनिंग सुरू आहे.
तमाम मराठी-महाराष्ट्रीयन(बघा..मोर्चे बांधणीमुळे विचारात कीती क्लेरीटी येत चालली आहे.म्हणजे सगळंच काही निरुपयोगी नसतं हो !)डाव्या बाजुचंच नाक टोचतात.आयुर्वेदाच्या मते त्यामुळे महिलांना बाळांतपणात त्रास कमी होतो. त्यामुळे लहानपणी जर नाक टोचलेलं नसेल तर निदान लग्नाच्या आधी तरी आवर्जून टोचतातंच.
दक्षिणेतील स्त्रिया दोन्ही बाजूंना टोचतात व मोठी नथ घालायची वेळ आल्यास डाव्या बाजूला नथ घालतात(मोरणी काढून)पण उजवी मोरणी तशीच ठेवतात.
माझी स्वतःची मानसिकता-आवड-जिव्हाळा दक्षिणेकडे झुकणारा आहे.महाराष्ट्रही दक्षिणेकडचाच मानला जातो.
So my choice is settling for right side.
मैत्रीणींमधे चर्चा करुन नवरात्रात नाक टोचून घ्यायचं मी ठरवलय पण करे पर्यंत करु का नकोचे हिंदोळे आहेतंच सतत मनात.

तर मधल्या काळात मुंबई प्रवासात शेजारी सत्तरी जवळची मुस्लिम महिला.वय व स्त्री सुलभपणाने गप्पांचा उत्साह.
मकबुलबी नाव.मराठवाड्यातली पण लग्ना नंतर मुंबईकर झालेली.बेतासबात परिस्थिती, शिक्षण नाही.कुराणही वाचता येत नाही पण सवयीमुळे नमाजच्या वेळचे आयते पाठ आहेत.आत्ता ही बसल्या बसल्या बोटांची पेरं मोजत नामस्मरण चालूच आहे.तिचंही नाक डाव्या बाजूला टोचलेलं.कारण विचारलं तर सांगता नाही आलं.पण म्हणाली कान-नाक लहानपणीचं टोचलेली आहेत व तेंव्हापासुनंच कानातले व मोरणी घालूनंच आहे.
भारतात निम शहरी भागात कान सुध्दा २-३ ठिकाणी टोचलेले असतात. सहसा कानाच्या काठावरच्या गोलाईतंच पण गालाजवळचा कानाचा जो त्रिकोणी जाडसर कार्टिलेजचा भाग असतो तोही टोचलेला असतो व त्यात जो कायम कान दागिना असतो त्याला खुडकं म्हणतात. त्यात डिझाईनची काही व्हरायटी असलेली मी तरी पाहिलेली नाही.
It has a absolute village touch.

तर मकबुलबी सांगत होत्या मेरा इधरबी (खुडकं) टुचा हुवा था लेकीन मैने वो गहना अब्बी निकाल दिया..वो क्या हैना..हमारे मे मौता हुई की वो बोडी को नहलाते फिर सब गहना उतारके दफनाते.
तो वो इधर का कान का निकालने को भौत तकलिफ होती.
मयता को भी और निकालनेवालों को भी..अच्छा नही लगता वो...तो मैने खुदीच वो इधरका कानका निकाल दिया है अब...
बाद मे तकलिफिच नक्को...मरे को भी जिते को भी...
है ना सही ?
समजून-उमजून बाईंची आवरा-आवरी सुरु झालेली.नजर पैलतीरी लागली की रीत-रिवाज कसे अलगद गळून पडतात नाही !

परतल्या नंतर morning walk सुरु.
नमस्ते मैडम...अधून-मधून दिसणारी वयस्क,थकलेली मुस्लिम महिला..वस्तीतली..उजव्या नाकात मोरणी..
थांबून चौकशी केली तर दोन्ही बाजूला नाक टोचलेलं.. बचपनमेहीचं टुचाया जी..खेडे में वो आते ना औरता...
सुया..पोती लेके उन्हीसे टुचवाया था..
कानही २-४ ठिकाणी टोचलेले...
हां..हां..टुचाके लेना..भौत अच्छा रैता..
मरने के बाद सब गैह्नै उतारना और सुराग खुल्ले छोडना..
तो वो सुरागोंसे हवा जाती..फिर अल्लाताला बोलता
मेरी औलाद जैसी भेजी थी वैसीच वापीस मेरे पास आयी है..
फिर जन्नत मिलती आपुन को...
जन्नत मालूम है ना आपकू ?
वो नै क्या उधर झरने रैते..नदिया..झाडी..झुले रैते...
झुले पे बैठके मस्त झुलना..सब मस्त रैता है उधर...
फिक्कन् हसुचं आलं...सुतावरुन स्वर्ग गाठणं माहित होतं पण हा असला आरपार नाकातून स्वर्ग प्राप्तीचा रस्ता नव्यानेच माहित झाला.
अच्छा,अच्छा करत हसत नर्काची..Sorry ! घराची वाट धरली.

P.S.ठरवल्या प्रमाणे नवरात्रातल्या पहिल्या माळेला नाक टोचणं झालंच नाही.पाऊस,पित्त,परगावी जाणं..लांबतचं गेलं..शेवटी अष्टमीचा मुहूर्त गाठला व मनसुब्याप्रमाणे पुन्हा एकदा दक्षिणेशी ऋणानुबंध पक्का केला.

No comments:

Post a Comment