Wednesday, 28 September 2016

Adieu...

ज्यांना लिखाण करायला आवडतं त्यांना त्या संबंधसंबंधातील अनेक गोष्टी,अनेक कारणांनी कळत-नकळत आवडायला लागतात.They become very perticular about certain things.
कागद,त्याचा रंग,पोत,पेन,शाईचा रंग इत्यादी अनेक गोष्टी आपल्यात इतक्या भिनत जातात की शेवटी अस्सच पाहिजे.. तस्सच पाहिजे करत ठराविक पेन वा डायरी शिवाय आपलं पान हलेनासं होत.अर्थात व्यक्तीपरत्वे नेमकेपणात कमी-जास्त असतंच.
मला पेन कुठलाही चांगला बेताने चालणारा चालतो पण डायरी मात्र जरा पारखूनंच घेते माझ्या गरजे प्रमाणे.
कव्हर छान पाहिजे हाताळायला,पानं नीट उलटायला बाईंडीग चांगलं हवं,कागद तर झकासंच हवा आणि दोन ओळींमधलं अंतर आपल्या अक्षराला नांदवायला योग्यच पाहिजे. दिवसाला एक पान तेही स्वच्छचं !
मागे-पुढे उपयुक्त माहिती असल्यास फारंच छान.
LIC आणि बैंका म्हणजे राम-राम..अर्धी डायरी ह्यांच्याच आकडेमोडीने भरलेली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायरीचा साईझ आणी वजन.मी स्वतः 24×7 डायरीच्या सहवासात असते. त्यामुळे सतत जास्त वजनाच्या पर्स,बेग मुळे माझा खांदा,हात हल्ली मुंग्या येऊन दुखायला लागला त्यामुळे ठरवून कमी वजनाच्या डायरीज घेते आणि sackचं वापरते.
तर अशी ही बहु दुधी,आखुड शिंगी पारखुन घेतलेली डायरी.
ती जवळ नसली की बैचेनी येते..विसरली कुठे तर ब्रह्मांड आठवतं..उशाशी असलं की शांत झोप लागते.

काय देते ती आपल्याला ?

अगोचरपणे मनी आलेले विचार,घडलेल्या घटना,त्यावरच्या प्रतिक्रिया, चिंतन,मनन सगळं-सगळं ती आपलसं करते. कधी कुरकूर नाही..आठ्या नाही. लिहीत जा..खोडत जा..लिहीत जा...ही आपलं विना तक्रार जे लिहू ते टिपून घेते.
काही हळवे तर काही परखड शब्द..
कधी संतापाचा दाह तर कधी भिजल्या डोळ्यांचा ओलावा..
कधी चिमटे तर कधी कौतुक...
कधी ललित तर कधी कविता...
कधी सुबक तर कधी घिसडघाई...
निळ्या,काळ्या,लाल,हिरव्या शब्दांचा अभिषेक तर रोजचाचं.
पण कधी कुठे स्केच तर कुठे नकाशा...
कधी नेकलेस,ड्रेस,एम्ब्रोयडरीचा पेटर्न...
तर कधी हरवलेला पत्ता आणि विसरलेलं गाणं...
Indeed its very very kaleidoscopic !

तर ही अशी माझी जिवश्च-कंठस्थ डायरी...
सर-सर सहा महिन्यात तुडूंब भरली.
समाधानाने भरून पावली..तिही..मीहि.
And today is the time to say her bye and welcome the new one.
नवी वही..नवंकोरं  पहिलं पान...

जसं आईला सगळी मुलं सारखीचं असतात पण तरीही वेळ आली की प्रत्येकाचे गुण-दोष ती प्रेमाने सांगू शकते.तसंच मला माझ्या डायर्यांबद्दल उत्कटतेने वाटतं.
They all are very dear to me with their individuality.
बस !
तुम ऐसाही साथ देने का वादा करो...
मै युंही मस्त नग्मे लिखती चलू ।

No comments:

Post a Comment