Wednesday, 21 September 2016

जेष्ठा-कनिष्ठा...

सकाळीच एकीच्या भळभळत्या वेदनेच्या कविता फेसबुकवर वाचून जागीचं खिळले. आजी,आई,आणी लेखिका तिघीही देवसासी परंपरेतल्या..अखंड शोषण स्त्री देहाचं आणि माणूसकीचं..कवितेची प्रत्येक ओळ न ओळ मनावर चरे उमटवणारी..आदरपुर्वक मेसेज पाठवला..फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली.देवदासींच्या अथांग वेदनेच्या त्या कवितांच ओझं घेऊनंच कामाला लागले.

कालपासून आमच्याकडे एक Marta नावाची मेक्सिकन मुलगी रहायला आली आहे.८-१० दिवसांपूर्वी एकदाचं भेटलेली..पोळ्याला..खुप शांत..आपण बरं आपलं काम बरं अशी. तिला घरी आणण्याचं जरा टाळणंच चालू होतं माझं पण चिवट रोटरीवाल्यांनी आळंबळं पाठवलंच.

घरात सकाळची शांतता..बसलो निवांत गप्पा मारत. आधी गुगल मेपवर तिच्या आईचं नोकरीचं गाव,आजी-आजोबांच गाव आणी मग तिचं शिक्षणाचं गाव शोधलं.
Single parent-single child.आई,आईचे आई-वडील व ही..तिघंही तीन ठिकाणी.जमेल तसं मध्यवर्तीच्या आजोबांच्या घरी भेटतात एकमेकांना.आई मेक्सिको सिटीत अमेरिकन कंपनीत चांगल्या पदावर पण प्रचंड महागाई, गुन्हेगारी, प्रदूषण, शहरी ताण त्यामुळे तिथे घर करणं परवडतंच नाही व यांनाही आवडत नाही.

गप्पा रंगल्या...मेक्सिकोला बेसुमार करप्शनचा जबरदस्त विळखा..alcoholism, drugs,human-girls trafficking ने अगदी पोखरलेला देश.
गुन्हेगारी, वाटमार्या,खंडणी,खुन...जनता सतत भीतीच्या छायेत.सहजपणे कुणाशी बोलणं..मैत्री नाहीचं.सतत गार्डेड रहावं लागतं.कारण कुठल्याही गुन्हेगाराशी चुकून केलेली मैत्री तुमच्याही जीवावर बेतू शकते.मैत्री करायच्या आधी त्या व्यक्तीचा भुतकाळ तपासला जातो.
खंडणीसाठी,विक्रीसाठी मुलं-मुली बेमालूम पाळत ठेवून पळवली जातात.पोलिसांचही कर्तृत्व फक्त चौकश्यांच्या षडयंत्रा पर्यंतंच.
कुठल्याही स्तरातल्या तरुण मुलींना तर फार धोका.(माझ्यामते भारतापेक्षाही जास्तच) Marta च्याच तेराव्या वाढदिवसाला खंडणी बहाद्दरांचा निनावी फोन आलेला.पार्टी कुठे,कधी व कशी आहे याचा.आईने घाबरून पार्टीचं केन्सल केलेली.

अठरा वर्षाची मार्ता दुसर्या गावी होस्टेल मधे राहून शिकते.
एकदा अंधार पडल्यावर पाणी आणायला दुकानात गेली तर रस्त्यातच तोंडावर पिशवी घातलेल्या दोघां गुंडांनी तिला कार मधून पळवून न्यायचा प्रयत्न केलेला.वेळीच लोकांनी आरडा-ओरडा केला म्हणून ही वाचली.पोलिसात कंप्लेंट केली.पण पोलिसांच व गुंडांच चांगलंच साटंलोटं त्यामुळे नेहमीच असे नशीबवान रहाल याची खात्री नाही.तिची ही कथा ऐकून हादरलेचं.
सर्वत्र असं धोकादायक वातावरण त्यामुळे समजदार मुली स्वतःला फार सांभाळून रहातात.सहसा 'सातच्या आत' घरात येतात.तारूण्य सुलभ अशी सहज मैत्री कुणाशीही करत नाहीत.रात्रीच्या पार्ट्या,दारु शक्यतो टाळतात. कारण पुढच्या कुठल्याही घडलेल्या गोष्टींं साठी मुलींनाच दोषी ठरवलं जातं...अगदी भारतातल्या सारखंच.दारुच्या अमंलाखालच्या लैंगिक संबधामधे कायम मुलीचीच छी-थू होते आणी मुलांना मात्र मोकळीक मिळते कारण you know men can not leave without sex. पुरुष, पोलिस, राजकारणी सगळेचं असे बेमुर्वत विचारांचे.
Young people go for sex before marriage but it is not allowed and advised also.
कुमारी मातांच खुप प्रमाण आहे.तसंच बेकायदेशीर गर्भपाताचं देखील.
मार्ता सुध्दा खुप सावध जगते.मैत्री अगदी पारखून करते.कुठलीही जोखीम पत्करत नाही.अभ्यास,घर,चर्च. सध्याचा फोकस फक्त शिक्षण.
Yes ! Yes she is a visualizer and graphic designer.तिचं ड्राईंग चांगलं आहे पण म्हणते छान-छान चित्र काढण्या पेक्षा मला अर्थपूर्ण पोस्टर्स काढायला आवडतात.माझी चित्र बघून, विचार करून माणसं बदलली पाहिजेत.मला माझा देश इतका चांगला करायचा आहे की कुणीही माझा देश सोडून जाऊ नये.मी माझा देश सोडणार नाही.इथेच बिझीनेस करणार..तरुणांना नौकर्या देणार.
I want to make Maxico a better place to live.

परवानगी घेऊन तिच्या कुटुंबा विषयी विचारलं तर तिच्या आईला ही तेवीसाव्या वर्षी झाली.लग्नाआधीचं.मुलाने जबाबदारी झटकली.आई घरी आली.बराच कलह,उहापोह झाला.गर्भपात आईच्या जीवावर बेतणारा होता.त्यामुळे आजोंबानी निर्णय घेतला मुल होऊ द्यायचा.आई-मुलीत अबोला झाला.मार्ताही सातव्या महीन्यात जन्मली..आई जिन्यात पडल्यामुळे.कसंबसं वाचवलं. शेवटी कागदोपत्री आजीने नातीला आपली मुलगी म्हणून दाखवलं..अर्थात नंतर आईने पण स्वतःची मुलगी म्हणून कागदपत्र करवून घेतली.आई खुप आधी पासूनच नोकरी करत होती त्यामुळे बढती छान मिळत गेली पण मुलगी मात्र आजी-आजोबांकडेच वाढली.त्यांच मुख्य घर तेच आहे.आई अजूनही अविवाहीत आहे.
सिंगल पेरेंट असल्यामुळे हिला लहानपणी खुप त्रास झाला.सगळे चिडवायचे,नावं ठेवायचे. त्यामुळे ही सतत घरातंच रहायची.बालपणीच्या मैत्रीणी नाहीचं.
वडिलांनी हिला एकदाचं पाहिलेलं. She has only 'the photograph' of that moment.
जशी-जशी मोठी होत गेली तशी तटस्थ समजुतदार झाली.तिचे वडील अजूनही अविवाहीत आहेत आणी लग्नाशिवायंच तब्बल अकरा मुलांचे पिता आहेत.त्यातल्या दोन लहान मुलींची आई काही वर्षांपूर्वी निवर्तली तर आजी-आजोबांनी त्या शाळकरी मुलींना स्वतःच्या बंगल्याच्या आऊट हाऊस मधे थारा दिलेला.स्वतः बंगल्यात. हिला त्या मुलींची खुप काळजी वाटते.स्वतःच्या पायावर उभी राह्यली की या बहिणींना सांभाळायची तिची इच्छा आहे.
इतक्या वर्षात वडिलांनी एकदाचं संपर्क केला. मार्ताच्या पंधराव्या वाढदिवसाच्या सेलेब्रेशनसाठी काही आर्थिक मदत हवी का हे विचारण्यासाठी.आईने मुलीला विचारलं..हिने नको म्हणून सांगितलं.खुप समंजस आहे.उच्च शिक्षण घेऊन चांगलं स्थिरावायचं आहे. कुटुंबाला सांभाळायचं आहे.
मेक्सिकन तरुणांच्या विचारसरणीत बदल घडवायचा आहे.

तिच्या मते मुलींनाही नाजूक नारंच रहायला..मिरवायला आवडतं.आधी मुलांकडून स्त्री म्हणून फायदे मिळवायचे मग नंतर त्यांच्या पुरुषी वर्चस्वाचं बळी व्हायचं. तिला हे पटत नाही त्यामुळे जराशी एकलकोंडीच व अबोल आहे.
तिला बोलकं केल्यामुळे बर्याच विषयांवर आमचा संवाद झाला. आमचं चांगलं जमलं.
First impression चे गोडवे कितीही गायले तरी त्यालाही काही अपवाद असतातंच.
भरपूर गप्पा मारल्या. भारतीय संस्कृती,विचार,खानपानात आणि मेक्सिकन संस्कृतीत बरच साम्य आहे.
पण एक प्रगतीशील देश म्हणून आपण खुपच आघाडीवर आहोत.
माझ्या मते आपण फार वरवरचं जग पाहतो नेहमी.
अवाढव्य शहरं,टोलेजंग इमारती,झगमगाट,सार्वजनिक सुविधा अशा अनेक दिखाव्याने इंप्रेस होतो आपण.
पण ही अशी घराघरातली धग कळत नाही आपल्याला संवाद साधल्या शिवाय.
मेक्सिको भले ही भौगोलिक दृष्ट्या अमेरिकेला जवळ असेल but it has its own dire survival problems.अमेरिकाही अगदी झटकूनंच असते या देशापासून.
भारतापासून इतका दूर आहे हा देश तरीही त्यांच्या व आपल्या आचार-विचार-विहारात खुप साम्य आहे. तिच्या सातच्या आत घरात या वाक्याने तर आम्ही एका नाळेनेचं जोडल्या गेलो.

No comments:

Post a Comment