फेसबुक, व्होटस् एपवर अक्षरशः धुमाकुळ...
निमित्त येऊ घातलेल्या गणेश उत्सवाचं.
गणेश उत्सवाचं धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्व..
एक से एक गणेश मुर्त्यांचे फोटो..त्यांच्या कथा..मुर्त्या Pop का शाडूच्या हे वाद,मखरं,रोषणाई,मोदकं त्याचे प्रकार...
नुसता ऊत आला आहे अशा पोष्टींना या सोशल मिडीयावर.
पाठूनंच येणार्या त्या गौरी-महालक्ष्म्या..
त्यांच गुणगान,महात्म्य,महत्व,रीती-रिवाज,कुळाचारी स्वैपाक....राम..राम...अगदी नकोसं होईपर्यंत भडीमार या गोष्टींचा. आणि हे सगळं पांडित्य इकडून-तिकडून उचललेलं.गंमत म्हणजे यात अग्रेसर तमाम विवाहित पुरुषच.
तर सभ्य गृहस्थो...
थोडासा विचार कराल का ?
गणपती-गौरीच्या धसक्याने श्रावणातंच हबकलेल्या घरातल्या स्त्रियांंकडे जरा माणूसकीने बघा..
कुणाची पाळी,कुणाचं गरोदरपण,कुणाचं आजारपण,मुलांच्या परिक्षा,नातलगांचा राबता,अविश्रांत एकक कष्ट आणि केलंच पाहिजे अशा व अनेक कारणांनी हा संसारी कुळाचारी सण सकल स्त्रियांंच्या अंगावर काटा आणवतो व अक्षरशः त्यांच कंबरडं मोडवतो.
जरा ते सोशल मिडीयावरनं हिंदु-मराठी सणांना अहमिकेने जागतिक बेगडी महात्म्य मिळवून देण्या पेक्षा स्वतःच्या घरात बघा.निदान हे ५-६ दिवसतरी घरात मदत करा.स्वतःहून काही हवं का विचारा.उभ्या-खड्यांच्या लक्ष्म्या काहीही असू देत घरच्या स्त्रीला प्राधान्याने स्थान द्या. दिव्या खाली अंधार असं नकोच.
स्वतः काही कामं केली की दुसर्यांच्या कष्टांची किंमतही कळते व काही गोष्टीतला फोलपणाही कळतो व कालबाह्य गोष्टी सहजपणे त्याज्य होतात असं मला वाटतं.
So share her work,reduce her stress...
Happily enjoy the festival with family and friends and let her also be the part of happiness.
And yes..please.... dont bombard us with your insistent posts-snaps of the deities and its celebrations.
We are happy for your blessings and happiness.And are capable to get our own blessings also !
अतिरेक करुन आनंदाचही निर्माल्य नका करु.
So got it ?
कळावे लोभ असावा.

No comments:
Post a Comment