१ जानेवारी २०१४.
एक जानेवारी हा माझा वाढदिवस. पण खरं सांगू हा दिवस मी जरा ओढून-ताणूनंच साजरा करते व मी फार आनंदी असल्याचं भासवते या दिवशी.म्हणजे दुःखी नसते पण काय ते आपलं घिसंपिटं सेलेब्रेशन करत रहायचं वर्षानुवर्षे. एकतर ३१डिसेंबरच्या रात्रीचा ठरलेलाच उन्मादी जल्लोष असतो सगळीकडे आणि परत नवीन वर्षाचं स्वागतही त्याच त्या शिळ्या हेंगओव्हरसह करायचं.
सारी दुनिया सेलेब्रेट करते हा दिवस.मलाही रात्रीपासुनंच वाढदिवसाच्या व नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा मिळतात.
पण रात्रीच्या जल्लोषा नंतर नवीन वर्षाची सुरवात ही अशी
आळसावून आणि परत आपलं तेच ते खाऊन-पिऊन वाढदिवस साजरं करणं फारंच कंटाळवाणं असतं बुवा.
Actually its very..very monotonous.
आणि आम्हाला आमच्या हिरण्यच्या हुरडा महोत्सवामुळे कुठे बाहेरही पडता येत नाही या दिवसात.त्यामुळे नव्या वर्षाची सुरवात नेहमी ही अशी.शुभेच्छांंची देवाण घेवाण..खाओ-पिओ..मजे लुटाओ.
पण माझी एक आंतरीक इच्छा नेहमी असते की आपण काहीतरी वेगळं करावं,जगावं,बघावं..निदान या दिवशी तरी.
मस्त पैकी दुरुन का होत नाही पण मनाली-काश्मीरचा बर्फाळ हिवाळा अनुभवावा..एखाद्या मोनेस्ट्रीत पहाटेच्या प्रार्थनेला हजर रहावं..अगदीच काही नाहीतर जंगलातली मस्त भटकंती तरी करावी.You should always experience and explore the things which you have never done before.पण ते काही जमत नाही..जमलं नाही.
पण या वर्षी मात्र अगदी ठरवलंच निदान अर्धा दिवसतरी कुठेतरी जवळपास निर्हेतुक भटकायचंच.
दोन्ही मुलं घरीचं होती.बोलता-बोलता ठरलं चला नेवास्याला.आम्ही दोघं तर तयारंच असतो,मुलंही न कुरकुरता तयार झाली त्यामुळे खुषीतच निघालो.
काही वर्षांपूर्वी आपेगाव,राक्षसभुवनला (गणपती उत्सवात) असेच फिरत-फिरत गेलो होतो. नेवासाही बालपणापासुन बरेचदा पाहुन झालयं परंतु मुलांबरोबर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणून जास्त आनंद.
नेवास्याचं ज्ञानेश्वर मंदीर खुप शांत,निरव असतं.
प्रवरेच्या किनार्यावर मोठ्ठाल्या चिंचेच्या झाडात लपलेलं..
कुठलाही बाजारू भपका,डामडौल नाही.
हिवाळी सकाळ..परिसर सामसुम..बाहेर दोन-चार दुकानं पुस्तकांची..सगळ्या विक्रेत्या बायकाचं..अशिक्षित.. माळकरी..आसपास हुंदडणारी त्यांची नातवंड...
एकही पुरुष विक्रेता नाही का दर्शनार्थी नाही.
(31stचं इन्फेक्शन इकडेही झालयं की काय ?)
शांतपणे आत गेलो..मंडपात चिमण्यांचा लपंडाव मस्त रंगलेला..पावती काऊंडरही सुस्त..कुणाचीही चाहुल नाही.
मध्यभागी काळा कभिन्न चौकौनातला खांब..निश्चल..निरवतेत ध्यानस्त झाल्या सारखा.
त्यावर उठून दिसणार्या झळझळीत झेंडुच्या ताज्या माळा..एखाद दुसरी उदबत्ती..तथाकथित मंदिर दृश्याशी फटकुन असलेला देखावा..
एकदम निरामय..शांत..अलिप्त..
त्या कोवळ्या ज्ञानेश्वरा सारखांच !
हात जोडले..माथा टेकवला..डोळे भरून आले.
विशीतलं कोवळं पोर..कुठल्या कुठे पोहोंचलेलं.
आई-वडिलांच्या वर्तनाची शिक्षा म्हणून काय काय भोगलं या भावंडांनी.पण त्या जिवघेण्या बहिष्कारातुनही या चारही ज्योति तळपूनंच निघाल्या. आणि सर्वांचा मार्गशीर्ष असलेला हा ज्ञानु...केवढा संयत आणि ज्ञानी.अख्या महाराष्ट्रावर सुर्यासारखं गारुड करणारा..मना-मनातला अंधकार दूर करणारा युग प्रवर्तक ज्ञानेश्वर महाराज.
वारकरी संप्रदायाला चालना देऊन, जातीभेद विसरायला लावून समस्त समाजाला भक्तिच्या एकसंध छत्राखाली आणणारा...
जो जे वांछिल तो ते लाहो..प्राणीजात । असं सर्व कल्याणी मागणं परमेश्वराला मागणारा..पण समाजाने बहिष्कृत केलेला तरुण !
(नाहीतर आपण ? पन्नाशी पार केली तरी मी,माझं,तुझं..संताप,मत्सर..हेवे-दावे,लोभ..काही म्हणता काही सुटत नाही.)
दर्शन घेणं,फुलं वहाणं,प्रसाद वाटणं,प्रदक्षिणा मारणं हे सगळं इथे अनुचित वाटलं मला तरी.
यावसं वाटलं... आलो....भरून पावलो.....
परिसरात फिरलो.साधं,स्वच्छ प्रांगण..तिथल्याच निवासी शाळेतली २-४ मुलं बागडताहेत..पिंपळावर कावळे..
एक-दोन गाड्या आलेल्या..दर्शनासाठी.
पुस्तकं-ग्रंथ चाळले..काही पुस्तकं आहेत का म्हणून विचारलं तर तमाम महिला अशिक्षित.. मिसरीचे काळे-पांढरे दात दाखवत,हसत..ताई तुमीचं शोधावं...त्या तिकडं तुकाराम हाय..त्याच्या बाजूलाच रामदास हायं..किमती बी हैत त्यावर..न्हायतर थांबा..माजी सून यैल बगा आता जेवन घ्येऊन..ती द्येल तुमाला हवं ते पुस्त्यक..
वेळ काढत पुस्तकं चाळत बसलो.
रामायण,अमृतानुभव,ज्ञानेश्वरी,एकनाथी भागवत,सार्थ श्री तुकाराम,गुरुचरित्र,हनुमान चालीसा इत्यादी तसेच आरत्या,पाळणे,स्तोत्र,अभंग...ध्येयाकडे वाटचाल,नेपोलियन प्रश्नावली,मोहिनीविद्या,कालसर्प योगाचा भुलभुलैया,हितोपदेश,कबीर,अकबर-बिरबल,सिंदबाद,
सुविचार,राशीचक्र,रांगोळ्या,मेंदी,आचार-चटनी-मुरब्बे,
हसु नका जोरात, डिक्शनरी,भारत सरकार के नये कानुन...हुश्य !
आता फक्त संभोग से संन्यास तक पाहिजे बरका इथे अशी आंबट खट प्रतिक्रिया देत गप्पा मारत बसलो..फोटो काढले.
काय हे ? चुटपुटलो..पैसेच्या अंगणात ही गावजत्रा ? खट्टूचं झाले.
ताई तुमी कधी र्हायला या इथं..लई प्रसन्न वाटतया इथं आमाला तं लगी घरी बसुचं वाटत न्हाय बगा..दिवस उघडला की इकडंच येत्योत आमी...
तेवढ्यात एक चाळीशीची बाई आणी १७-१८वर्षाचा तरुण मंदिराकडे निघाले. बाईंच्या हातात तबक,त्यावर लाल जरतारी कापड..आता प्रसाद पण का ?
न राहवुन विचारलं हे काय आणलं तुम्ही ? तर त्या म्हणाल्या अहो..ही ज्ञानेश्वरी आहे..आत्ताच घेतली..माऊलींच्या चरणी ठेवायला आणली आहे.त्यांचा आशिर्वाद घेतला की घरी जाऊन वाचायला सुरवात करणार !
थक्क झाले..कौतुक वाटलं.
मघाशीचं मळभ कुठल्या कुठे पळालं..स्वच्छ प्रकाश पडला.
प्रसन्न वाटलं..मना-मनात ज्ञानदीप असा उजळतोय ते बघून.
घरा-घरात ज्ञानेश्वरी भक्तीभावाने वाचली जातेयं...
दारोदारी मोगरा फुलतोयं !

No comments:
Post a Comment