आज जागतिक फोटोग्राफी दिवस.
मी आर्ट स्कुलची विद्यार्थीनी.पण फोटोग्राफी या विषयाने मला कधीच भुरळ घातली नाही.त्यामुळे आर्ट स्कुलच्या मुलांना साधारणपणे बर्यापैकी गती फोटोग्राफीत असते किंवा असायला पाहिजे ते माझ्या बाबतीत खोटं आहे. पण निर्मिकाला(माझी मुलगी) जेव्हा शाळकरी वयात फोटोग्राफीची गोडी लागली त्यामुळे जरासा चांगला प्रोफेशनल केमेरा,लेन्सेस विकत घेतले.पण तरीही मी त्या प्रांतात लक्ष घातले नाही.पण ही मोबाईल क्रांती झाल्यापासून केमेरेवाले मोबाईल्स सहज हातात आले आणि मला फोटोग्राफीचा छंद लागला...नजर तयार होऊ लागली.मग उत्तम केमेरा असलेला मोबाईल आत्मसात केला आणि आता हातात सतत केमेरा व डोळ्यात शोधक नजर घेऊनंच मी फिरत असते.
माझ्या मनातल्या कलात्मक expressionसाठी माझ्या मनात एक द्वंद अखंड सुरु असतं.चित्र का शब्द ?कसे मांडू माझे विचार ? शब्दातून का चित्रातून ?
जाऊ तिथे मला काहीतरी अर्थबोधी वाटणार्या प्रतिमा दिसत असतात मग आता त्या चित्रात का शब्दात पकडायच्या ?
दिसेल ते,भावेल ते चित्रातून दाखवण्याचं सराईत कौशल्य सध्यातरी नसल्यामुळे शब्दांचीच सरशी होत आली आहे आजपर्यंत !
पण ह्या हेन्डी मोबाईल केमेर्यामुळे visual frames compose करण्याची आवड मला निर्माण झाली आणि अगदी झपाटुन मी ती जोपासते.म्हणजे मला जे चित्रांमधून सांगावसं वाटायचं त्याची कसर काही प्रमाणात ह्या मोबाईल फोटोग्राफीने भरून काढली असं म्हटलं तरी चालेल.
एकतर चोवीस तास मोबाईल जवळ..उलट-पालट भटकंतीचा सोस..आणि भिरभिरती चौकस नजर...I am just enjoying my mobile photography. तरी हल्ली मोबाईल केमेर्याच्या मर्यादा बरेचदा जाणवतात.खुपदा ठरवते की आता आपण SLR घेऊनंच फिरायला पाहिजे. पण ते ओझं सांभाळणं,वेळप्रसंग बघत लेन्सेस बदलणं कंटाळवाणं वाटतं. तसंच ते एक्स्पोजर,एपेरचर इ. क्लिष्टचं आहे जरा.
And I feel you loose the spontaneity somewhere.
Excellent photo पेक्षा फोटोतून सहज दिल्या जाणारा आंतरीक मेसेज मला फार भावतो व त्याच दृष्टीने अर्थपूर्ण फोटोग्राफी करण्याचा मी प्रयत्न करते.मोठा केमेरा घेऊन फोटोग्राफी ह्या एकाच उद्देशाने सतत वावरायला पाहिजे असं मला वाटतं.आणि माझी तर समोर दिसणारे प्रसंग,दृश्य,व्यक्ती टिपत,संवाद साधत शब्दात पकडायची खुप सहज प्रवृत्ती त्यामुळे दोन्ही डगरींवर हात ठेवणं अवघड वाटतं. त्यामुळे सध्यातरी मी आणि माझा मोबाईल केमेरा..we are happy together.
तरीसुद्धा कीती तरी चकीत करणार्या spontaneous प्रतीमा निसटतात हातातनं.फार हुरहूर लागते अश्यावेळी.
तसंच काढलेला फोटो मनासारखा एडीट करुन पोस्ट करायच्या आधी त्या प्रतीमेला साजेस चपखल caption देण्यासाठी बरेच विचार,शब्द,गाणी,म्हणी,वाक् प्रचार डोक्यात घमासान फिरत रहातात.मराठी शब्दांसाठी सहसा अडल्या जात नाही पण इंग्रजी/उर्दू असेल तर मात्र मोबाईल dictionary, thesaurus चाळणे,जवळपासच्या अर्थाचे शब्द,quotes शोधणे,स्पेलिंग्ज् तपासणे,वेळ पडल्यास मुलीचीही SOS मदत घेणे,मगच फेसबुकवर पोस्ट करणे. Its a lot of process for me but believe me it has enriched me greatly.जेव्हा योग्य प्रतीमा आणि चपखल शब्द सहजपणे हातात हात घेऊन सामोरे येतात तेव्हांचा आनंद फार समृद्ध असतो.
आता तर Instagramने झपाटलंय. Hash tag,key words,searches... just learning and exploring !
या फेसबुकने मला खरंच खुप उभारी दिली. मी लिहीलेल्या शब्दांच,काढलेल्या फोटोंच,मांडलेल्या विचारांच जाहीर कौतुक झालं. माझाही उत्साह वाढला,सूर सापडतोय असं वाटतंय.
तरी पण लिहीलेलं,टिपलेलं,मांडलेलं सगळंच आपल्याला अगदी मनापासून १००% आवडलेलं असतंच असं नाही.आणि आवडण्याच्याही पलीकडे काही गोष्टी अनेक कारणांनी मनाच्या जास्त निकट असतात.तर असे काही निवडक फोटो या भिंतीवर परत एकदा..माझ्या मनाला रुप-शब्दांनी भावलेले.
आजच्या आंतरराष्ट्रीय फोटो दिनाला पुरक अशी प्रथितयश फोटोग्राफर मी नक्कीच नाही पण या फोटोग्राफीच्या छंदापायी माझ्यातली कलात्मक जाणीव समृद्ध झाली आहे हे मात्र खरंच !

No comments:
Post a Comment