हा ब्लॉग कधीचा लिहून ठेवलेला,पण मागेच पडला.
आमच्या ह्या घराचा परिसर एकदमहिंदू..ब्राह्मणवादी.
आसपासच्या मंदिरात सारखे मंडप टाकून कार्यक्रम सुरू असतात..गल्लीतल्या स्त्रिया पण नित्याच्या व्यवहारात जास्तच धार्मिक वाटतात.त्यात सध्या सणवार घेऊन आलेला श्रावण चांगलाच मुरलाय..भरीसभर आज शुक्रवार..
एक-दोन घरात दणक्यात पुजापाठ चालू आहेत.. घरबसल्या मंत्रपठण ऐकू येतयं. तर म्हटल आज शुक्रवारच्या कथेतल्या व्रतासारखं हे लिखाण पोस्टचं करून टाकावं.जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्तही लिहून ठेवलयं पण म्हटलं कला-बिला नंतर आधी धर्म !
माझी एक मैत्रीण आहे औरंगाबादची..गेल्यावर्षी तिची बदली झाली आहे जालन्याला.रोज जाणं-येणं करण्यापेक्षा तिने तिथे दोन खोल्यांच घरच केलय.विकऐंडला इकडे येते.मुलगा,नवरा औरंगाबादलाच आहेत.तर जुन्या वस्तूंंच्या खरेदीच्या नादाने मी जालन्याला गेले व तिच्याकडे एक दिवस-रात्र राहीले.
जुनं जालना..छोट्या अरुंद गल्या..काही मंदीरं..हिचे घरमालकही दोन पिढ्यापासुन भागवत सांगून उपजिवीका करणारे.कर्मठ मराठवाडी.त्यात घरातला पन्नाशीतला भागवत सांगणारा कर्ता पुरुष अचानक हार्टऐटकने गेलेला.घरात वृद्ध सासू-सासरे,विधवा सून,दोन शिकणारे नातू. अख्ख घर आतून-बाहेरून गुलाबी-केशरी रंगवलेलं..
तुळस,तोरणं,रांगोळ्या...
आजोबा(सासरे)नव्हते.. भागवत सांगायला दुसऱ्या गावी आठवडाभरासाठी गेले होते तरी अख्ख घर त्यांच्या जरबेत होतं.विधवा सून तर अजूनंच बंधनात.उपास-तापास,पोथ्या-पारायणं,पुजा-अर्चा..आधीच सून त्यात आता विधवा त्यामुळे या स्त्रीच्या व्यक्तीमत्व विकासाचे पंख अगदी जेरबंद करून टाकलेले.
कडक शिस्तीतला उसंत नसलेला दिनक्रम.
सोवळ-ओवळं,पुजापाठ,व्रतवैकल्य,घरकाम,स्वैपाक,निवडणं-टिपणं-दळणं...दिवसभर कामांची जंत्रीचं.संपूर्ण घर मात्र मराठवाडी अगत्यशिल.आजींना भेटले..कमरेतुन पार वाकलेल्या..खुटखुटीत..चापून नेसलेलं नऊवार..सतत कार्यरत..तल्लख बुध्दी...सासूपणाची बेरकी नजर सूनेवर कायम.माझ्या नेटक्या,तत्पर चौकश्या..नवरा,मुलं,चांगला धंदा..खुश..विषेशतः पुत्रवती आहे म्हटल्यावर तर माझ्या सौभाग्याची पावती नजरेनीच फाडली.
माझी मैत्रीण पण बरीच धार्मिक. हिंदू-ब्राह्मण महीमा..पुजा-आरत्या-स्तोत्र.. संत..त्यांच्या शिकवण्या..समाध्या..महोत्सव..
एकदम जाज्वल्य.
कैक वर्षांनंतर मी अश्या वातावरणात राहीले. देवापूढे दिवा,लक्ष्मीप्रवेशासाठी दारं सताड उघडी,शुभंकरोती,स्वैपाक करतांना सतत स्तोत्र उच्चारण..नैवेद्य..रात्री परत एखाद्या शास्त्रीबुवांच चरित्र वाचन.(नेमकं ३६५पानांचंच)
गप्पांचे फड आणी ही अशी अव्याहत धार्मिक गंगा.हातात वेळ असुनही काही म्हणता काही लिहू शकले नाही.हा ब्लॉग लिहायला सुध्दा मला माझं निरव शांततेचं घर गाठावं लागलं.
स्त्रियांंना विचार करायला वेळंच मिळू नये म्हणून तर हे धार्मिक स्तोत्रा-मंत्रांच जोखड त्यांच्या गळ्यात अडकवलं नसेल ना ? विषेशतः विधवा स्त्रिया तर मन मारत कायम या धार्मिक कारवायांमधे बुडालेल्या असत.
बहिष्कृत जीवन,अफाट शारीरिक कष्ट..जो काय विरंगुळा असेल तो या धर्मछत्राखालीचं.
सकाळी झटपटचं निघाले..माझाही त्या शिशुपालासारखा धर्म संस्काराचा घडा भरलाच होता. जाता-जाता स्त्रियांंच्या एकूणंच पिळवणूकी विषयी बोलत होतो तर तिला FGM(female genital mutilation)विषयी सांगीतलं.अर्थातच तिला त्याची गंधवार्ताही नव्हती.
मग माझा काही दिवसांपूर्वीच्या नामदेव ढसाळांच्या चित्र कार्यशाळेतला अनुभव सांगीतला तर..हे बघ मेधा..तु मला त्यांच तर काहीचं सांगू नकोस..ते लिहीतात एक..वागतात एक..तुला कल्पना नाही मला नोकरीत काय-काय अनुभव येतात ते !
अगं हो पण...तुला एक सांगते निता.. तु नां कधीही कुठल्याही गोष्टीचा,प्रसंगाचा,व्यक्तीचा आधी फक्त एक माणूस म्हणून विचार कर..आणि नंतर मग वाटलंच तर धर्म..जात..लिंगभेदापर्यंत पोहोंचत जा. बघ गोष्टी कश्या सोप्या होतात ते !

No comments:
Post a Comment