जमला...एकदाचा साखरभात केला..जमला...छानंच झाला.अर्थात स्वैपाकवाल्या सारिकाच्या मदतीनेच.
माझी मुलं फार लहान असतांना मला माझ्या आजे सासुबाईंनी(सासूबाईंच्या आई)शिकवला होता.त्यांचा साखरभातावर फार हातखंडा व नावलौकीक पण होता.पण त्यांनी शिकवला तेंव्हा माझे काका दवाखान्यात सिरियस होते व माझी मुलंही लहान होती त्यामुळे तुपावर लवंगा परतणे या पलीकडे काही आठवत नव्हते.तर सारीकालाही तिच्या चुलत सासूबाईंनीच साखरभात शिकवला होता म्हणे.तर सासवांची प्रचलीत प्रतिमा काहीही असो निदान आजतरी साखरभाताचं आणी सासवांच गोडंच साटंलोटं जाणवतयं.
माझ्या या आजे सासूबाई खुपच लोभसं होत्या.बोलणं गोड..हसणं लोभसं..वागणं समजूतदार.त्यामुळे मुलगा नसूनही तीन जावाई, चार-पाच नात जावाई खुप आनंदाने देखभाल करायचे.लहान-थोर सगळ्यात लोकप्रिय.शेवटची दोन वर्ष पलंगावरंच होत्या तरी कधीही वैताग नाही, नैराश्य नाही. गोड बोलून..लोभसं हसून आपली पुणेरी वेळापत्रकं इतरांकडून व्यवस्थित करवून घेत.फुलांवर,सुगंधांवर,चवींवर विषेश प्रेम. हसत-खेळत,टापटीप..आनंदात गेल्या.अगदी घेण्यासारखा गुण!
खरंतर त्यांचा माझा फार सहवास नाही तरी पण मी भेटले की म्हणायच्या तू बांगड्या घालत जा गं..भुंड्रे हात बरे नाही दिसत.
माझ्या नवर्याने त्यांची माझी ओळख करून दिली तेंव्हा त्यांनी घाबरून हळूच त्याला विचारलं होतं..यांना मराठी येतं ना ?
खुप गप्पिष्ट. गप्पांच्या नादात न चुकता दोन-तिनदा तरी आमचं बुवा असं आहे असं म्हणत त्यांच्या घरातलं पुणेरी वळण सांगत.खाण्याचं वळण काय तर सकाळी एक पोळी,चार घास भात..दुपारी दोन बिस्किटं..तिसऱ्याने पोट फुटणार !त्यामुळे दोन्ही लहान मुलं घेऊन त्यांना भेटायला जातांना आम्ही ब्रेड,बटर,मेगी,सोस घेऊनंच त्यांच्याकडे जात असू तर म्हणायच्या अरे बापरे..हे कशाला आणलं ? आम्हाला नको बुवा असलं काही.मग आम्ही हसून म्हणायचो अहो हे आमच्याचसाठी आहे.हा तर आमच्या मुलांचा दोन तासांचा खुराक आहे. द्या आता कपभर चहा आणी दोन-दोन बिस्किटं.
कुटुंबातील कोणीही दहावी पास झालं की शंभरची नोट बक्षीस म्हणून ठरलेली.तसंच स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी जंगी पार्टी. झाडून सगळ्या लेकी,जावाई,नातू,नाती,नातसूना,नातजावाई,पतवंड थाळी रेस्टोरंटमधे नेमाने जेवायला.
अगदी तिशीतलं वैधव्य..चार मुली..आर्थिक अडचण पण या बाईंनी आयुष्यभर आपल्या लोभसं वर्तणुकीची साखर पेरणी करत कायम आनंदचं वाटला.

No comments:
Post a Comment