मला भरतकाम करायची..त्या कलेच्या इतिहासाचा मागोवा घ्यायची..त्या कलेच्या विविध अविष्कारांचा अभ्यास करायची भारी आवड. आणि त्यासाठी तर आपला भारतदेश अक्षरशः खजाना आहे.मी स्वतः माफक प्रमाणात भरतकाम करते. अगदी शाळकरी वयापासूनच आईने ही आवड निर्माण केली होती.शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या की पहिले ७-८ दिवस जुन्या टाकून द्यायच्या युनिफोर्मवर(डार्क ब्यु पिनोफोर-स्कर्ट,पांढरे ब्लाउज) आई फ्री हेन्डने काही फुलं-पानं काढून द्यायची व आम्ही मुली(शेजार-पाजारच्यापण)धागे व रंगांच्या उपलब्धतेप्रमाणे बेताचंच भरतकाम किंवा पेंटिंग शिकत करायचो. तर तेव्हा जी आवड निर्माण झाली ती आजतागायत टिकून आहे.
माझ्या कुडत्यांवर मी माफक भरतकाम तर करतेच पण हल्ली जरा भारतीय ख्यातकीर्त भरतकामी नमुन्याच्या heirloom साड्या करून घ्यायचा विचार आहे.बंगाली कांथा,कर्नाटकी कशिदा,सिंधी टाक्याचं भरतकाम इ. अर्थात अत्युत्तम भरतकामाचं कौशल्य व अख्खी साडी भरावी एवढा आवाका माझ्याकडे खचीतंच नाही पण नजर व चोखंदळपणा नक्कीच आहे.त्यामुळे हल्ली मला हवं तसं चांगलं भरतकाम करून देणार्यांच्या शोधात मी असते.
दोन वर्षांपूर्वी इंद्रायणी(नागपूर) मधून एक छान काठापदराची टसर सिल्क घेतली होती. तशाच प्रकारच्या १-२ साड्या आधीच संग्रही असल्यामुळे या साडीवर मनसूब्याप्रमाणे भरतकाम करून घ्याव असं वाटलं.कशिदा का सिंधीटाका या द्विधानंतर साडीच्या दणकट पोतामूळे सिंधीटाकाच फायनल केला.काही उत्साही मैत्रीणी आधी करून देते म्हणाल्या मग त्यांचं बारगळलं. डिझाईन ट्रेस केलेलं..रेशीम आणलेलं..त्यामुळे कुणाकडून तरी भरतकाम करून घेणं मला भागच होतं.उत्साही पंजाबी मैत्रीणीला पकडून एका सिंधी बाईंना गाठलं..त्याही तयार झाल्या..पण काही दिवसातंच त्यांना स्पोंडेलिसीसचा त्रास सुरू झाला त्यामुळे तेही ठप्प झालं.मग त्यांनीच एका दुसर्या सिंधी महिलेचा पत्ता दिला..घेऊन गेल्या..साठीच्या पुढच्या बाई...सफाईदार काम व भरतकामातील बारकाव्यांची जाणीव...हातात साडी दिली आणि निर्धास्त झाले.
मनासारखं भरतकाम होतंय का नाही,संपलेले धागे द्यायच्या निमित्ताने २-३ वेळेला त्यांच्याकडे जाणं झालं. सिंधी वसाहतीत रहातात.पाकिस्तानातून मायग्रेट झालेलं कुटुंब. दोघी बहिणीच जावा-जावा..बाईंचा नवरा ३५ वर्षांपूर्वी पाकिस्तानातचं एक्सिडेंटमधे गेलेला.दीर-बहिणीच्या मागे या तिन मुलांना घेऊन इथे भारतात,महाराष्ट्रात आलेल्या.मुलांचे कपड्याचे व्यवसाय.. सूनही पाकचीच.घरबसल्या शिवणाचा व्यवसाय करते.ड्राईंगरुममधे टीव्ही कायम चालु..तिथेच सोफ्यावर जेवणं..तिथेचं जमीनीवर हात शिलाई मशीन चालू..
गेलं की छान गप्पा होतात म्हणजे मीच चौकश्या करते.
अख्खी वसाहत सिंधी व्यापार्यांची.जवळपास प्रत्येक कुटुंबातील आधीच्या पिढीतील अर्धेअधीक कुटुंबीय (काका, आत्या,मामा,मावश्या)अजूनही पाकिस्तानातंच आहेत. काही तरुण मंडळी अजून येताहेत. इधर का खुलापन अच्छा लगता है..घुटन नही लगती असं सगळ्यांच मत.जसं पाकिस्तान सोडलं तसे फार कमी लोक परत गेले.अगदी नातलगांना भेटायला जाणार्यांची संख्याही फार कमी.या बाईंना सुध्दा येऊन ३० वर्ष झालेली.परत म्हणून गेल्या नाहीत.
भाचे-पुतण्यांना इथल्या मोकळ्या वातावरणात बोलावतात..तेही २-४ महिने राहून बघतात पण सहसा परततात.
जो परिवार..परिसर..शेजार-पाजार..जन्मगाव सुटलं ते तुटलंचं. पाकिस्तानी खेड्यात खेती-बाडी सोडून कायमचे आलेले...काका,मामा,मावश्या अख्खं आजोळ नजरेआड झालेलं.नव्या जगाला आपलं मानत परत उमेदीने रुजणं.
कीती परीक्षा घेणारं आहे हे !
बरं परिस्थितीही अशी नाही की फार सहजपणे अधूनमधून तिथे जाता येईल.व्हिसाच्या वेळ,पैसाखाऊ कटकटी..ट्रांझिटमधे सामानाची खुन्नसी उचक-पाचक..शंभर चौकश्या..त्यामुळे सर्वसामान्य जायचं टाळून आठवणींवरचं जगतात..ज्या देशात,गावात आपली मुलं-बाळं,ज्या प्रांतात आपली रोजी-रोटी ते गाव..तो देश आता आपलाच मानलेला. यांच्या जिद्दीपूढे व दुर्दम्य चिकाटीपूढे थक्क झाले.कुठे हे लोकं आणि कुठे आपले मावळे ?
गावातल्या गावात नको असलेल्या शाखेतली बदली रद्द करून घ्यायला महिन्यांची रजा काढून घरी बसणारे आपले कर्तबगार वीर !
ह्यांचे कुणी गुरू आहेत म्हणे. ते आपले गठ्ठा शे दोनशे लोकांना एखाद्या धर्मयात्रेसारखं पाकी मुल्कमधे नेऊन आणतात. सहसा जेष्ठच जातात..जन्मभुमीला-मातृभूमीला माथा टेकवतात(शेवटचा)...गणगोतांना उराउरी भेटतात..आपल्या प्रांतातल्या काही जिव्हाळ्याच्या वस्तू-जिनसा आठवणीने आणतात..इकडे घरगुती प्रदर्शन भरवून बांधवांना विकतात. पुरुष व्यवसायामूळे गाव पटकन आपलसं करतात.
स्त्रिया मात्र जरा उपर्याच रहातात असं वाटतं.
दिवसभर घर..घरकाम..शिवण..भरतकाम..विणकाम..
संध्याकाळी सत्संग,धार्मिक कार्यक्रम.. आपल्याच समाजात रमणं..भाषाही यांची थोडी वेगळीच वाटते.त्यामुळे उगाचच परदेशी माणसाला भेटल्यासारखं वाटतं.
चंद्राबाईंनी भरतकाम तर सुरेखंच केलं पण भिड न बाळगता दामही व्यावसायिकतेला जागत व्यवस्थित घेतला.
सिंधीवृत्ती सारखाचं सिंधी टाका. सुलट बाजूने अगदी भरगच्च दिसतो.वरच्यावर सरसर धागे फिरवत जाळीदार..भक्कम..आकर्षक भरतकाम !
उलट बाजूने फार कमी ठीकाणी ठिपक्यांसारखा धागा दिसतो
गाठी तर फार कमी.
जवळ-जवळ भरलेल्या सिंधीटाक्यातील चौकोनांमधला कपडा तर शेवटी फुलांसारखा सुरेख दिसतो.
खरंतर सिंधी समाजाची मुळं पाकिस्तानात पण आज अख्ख्या भारतात हा समाज समरस होऊन आनंदाने रहात आहे!
न कुरकुरता...
भारतात कुठेही जा त्या सरसर भरणार्या भक्कम सिंधीटाक्यासारखे हे सिंधी बांधव कापड व्यवसायात जम बसवून जिथे आहेत तिथे मस्त रमलेले दिसतील.

No comments:
Post a Comment