परवा गुरुपौर्णिमेला एका तरुण मैत्रीणीचा फोन आला.विवाहित आहे व एका अडीच-तीन वर्षाच्या छकुलीची आई आहे.तिच्यामते तिला माझ्याशी बोलून छान वाटतं. बहुधा माझा संसारी अनुभव व सल्ले द्यायचा उत्साह कामी येत असावा.अर्थात त्याही पलीकडे जाऊन we do have a mutual respect for each other.माझं इतक्या उशीरा परत कलेच्या शिक्षणात डोकावणं व नव्या उमेदीने पेंटिंग्ज करायचा मनसुबा बाळगणं ह्याच तीला अप्रूप तर इतक्या लहान मुलीला सांभाळत रोज काहीतरी काम(पेंटिंग्ज)चिकाटीने करत रहाणं मला फार कौतुकास्पद वाटतं.गुरुपौर्णिमेच्या एकमेकींना शुभेच्छा देत संभाषण तीच्या मुलीच्या अल्लडपणावर आलं.
हसर्या-नाचर्या मुलीची आईचं ती...भरभरून बोलते मुलीबद्दल.
मेडम..मला नं हल्ली तिच्यासाठी खुप छान-छान फ्रोक्स शिवावेसे वाटतात.बरेच तर्हेतर्हेचे कपडे जमवलेत मी.. शिवायलाही टाकलेत काही..पण हल्ली ना मला स्वतःलाच तिचे कपडे शिवावेसे वाटतात हो...
अगं मग तु शिक ना शिवण...तु इकडे आलीस की तुला काही पुस्तकं देते व बेसीक शिकवते पण...पण तो पर्यंत मशीन चालवायला शिकून घे.आणी वाटतंय इतकं तर शिकचं शिवण कसही करून...enjoy your motherhood and every moment with your daughter...जे वाटतयं ते कर !
...अगं हे फुलपाखरी दिवस फार भर्रकन उडून जातात...मी माझ्या अनुभवातुन सांगते हे...you can always catch up with your colours n canvases...but this precious time will never come.मस्त मजा कर मुलीबरोबर...ती फूलपाखरु तर तु फुलपाखराची आई बन आणी बागडा दोघीजणी...very few get this choice...
बोलता-बोलता मीच सदगदित झाले...
माझी आई फार सुरेख शिवण शिवायची.ती असे पर्यंत तिनेच माझे कपडे शिवले.तिच्या हयातीत तर तिने शेकड्याने बाळंतविडे शिवले असतील.अगदी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी पर्यंत तिने शिवलेले कपडे गेले आणी नावाजले गेले.
अजूनही बरेचजण ४०-४५ वर्षाच्या मुला-मुलींना माझी ओळख अरे तुझ्या बारश्याचे कपडे ह्यांच्या आईने शिवले होते अशी करुन देतात.परंतु दुर्दैवाने तिच्या फक्त एका नातवाचा बाळंतविडा तिला करता आला.काळाची मती आणी गती अगाध आहे.
ती अचानक गेल्यामुळे मी शिवणाकडे वळले...तिने ज्यांना शिवण शिकवले त्या तिच्या मैत्रीणींकडून मी माझ्यापुरतं शिवण शिकले.मशीन चालवण्यात मी सराईत होतेचं.नंतर मात्र मला मुलगी झाल्यावर माझ्या एका व्यावसायिक मैत्रीणीकडे शास्त्रशुध्द गरजेचं शिवण जीवाचं रान करत शिकले आणी एक से एक फ्रोक्स शिवले मुलीसाठी.सुदैवाने काही अजूनही आहेत माझ्याकडे.
Infact मला पहिल्यांदा मुलाच्या वेळेस दिवस गेले तेव्हां पहिली खरेदी आम्ही मशिनचीच केली.
झबली,लंगोट,टोप्या,दुपटी सगळं आधीच घरी शिवून तयार ठेवलं होतं मी.अजूनही माझ्याकडे माझ्या आईचं व माझं शिवणाचं भांडार आहे.लेसेस..बटणं..रिबन्स..रिळं..
पण आता मात्र वाटून टाकते आहे सगळं शिवणप्रेमींना.
एकतर एकहाती मुल सांभाळणं..शिवणाचं प्रेम.. व आपल्या मुलाला आपणचं शिवलेलं,विणलेलं घालण्याचा आनंद व विचारंच इतका रोमांचक होताना की अक्षरशः वर्षभर कन्हायला मी शिवलेल्या १०-१२ कपड्यातंच ठेवलं.म्हणजे तेव्हा माझ्या कधी लक्षातही आलं नाही की आपण काही बाजारातून आणावं आपल्या मुलासाठी. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या बहिणीने खास मुंबईहून रेडीमेड ड्रेस आणला.
कन्हाय लहाणपणी खुप हेल्दी होता व छान दिसायचा.मित्रपरिवार तर खास त्याला बघायला यायचे व डोक्टर्ससूध्दा विचारायचे तुम्ही याला काय देता म्हणून?
पण आमच्या कधी लक्षातंच आलं नाही की मस्त रेडीमेड कपडे आपल्या मुलाला घालावेत व अजून छान त्याला दिसवावं.
कटपीसेस आणून..धुवून.. नरम करुन..कपडे बेतायला शिकून शिवणे..वेळातवेळ काढून स्वेटर्स शिकत विणणे..
indeed it was a very satisfying bliss !
कन्हाय वर्षाचा असेल..सलग २-४ दिवस इतका पाऊस पडला की त्याचे सगळे कपडे ओले करून संपले.मग मी माझे दोन गाऊन फाडून त्याला १०-१२ पायजामे-चड्डया दोन तासात शिवल्या होत्या.
पण हल्ली सर्वचजणं लहान बाळांना पहिल्या दिवसापासून रेडीमेड कपड्यातंच ठेवतात(अर्थात हल्ली बाळांचे कपडे फारंच सुंदर व सोईचे मिळतात) आणी म्हणतात काय गं ते झबली-दुपटी घरी शिवायची आता ? मी तर सगळं रेडीमेडंच आणलं बघ. I miss my heart beat.
आपल्या मुलांसाठी जीव ओतून-काढून मनासारखं काही शिवण्या-विणण्याच्या अविष्काराचं समाधान अपार आहे!

No comments:
Post a Comment