Wednesday, 13 July 2016

गुंफण...

थोडं उघडलं आणी काल लगेच गावात पटवार्याकडे..
ईद मुबारक भैया..
मुबारक..मुबारक..
एक-दो काम है भैया..दिदी आप सुबह क्यूं नही आते..आपका काम शांतीसे करना पडता..ये देखो कितने खडे है...
अरे..सुबह आना नही होता...एक-दोघी उभ्याच होत्या..वेळ लागणार असं दिसतंच होतं तरी ठिय्या देऊन बसलेचं..एक बाई ६-७ मंगळसूत्र गाठवून घेत होती..दोन भाऊ सरसर काम करत होते पण वेळ लागणारंच होता. परदेसी जातीच्या बाई..इतकी घाऊक मंगळसूत्र कशासाठी करून घेताहेत म्हणून विचारलं तर म्हणाल्या...हमारा रिवाज है..घर में कोई गुजर गया तो घरके औरता अपने मंगलसुत्र के धागे और काले मनी बदल देते है...वो सुतक का रहता है नं !
तो हर बार कोई गया की ऐसाचं करना पडता क्या?
हां..हर बार...आदमी-औरत कोई भी गुजरे मंगलसुत्र गठाकेचं लेना पडता..तेरवी होने के बाद..हमारे सास गुजर गये है तो पुरे घरवालोंका बनवा रहे है..२-३ जावा,३-४ सूना...अर्ध्या डझनाचं काम पटवार्याला बसल्या ठिकाणी. आणी सुतकातलं असल्यामुळे फक्त दोरा,मणीचं बदलायचे होते तरी तरुण मुलींची हरामणी..लालमणी अशी चोखंदळ चर्चा चालूचं होती. बायकाचं त्या !
दरम्यान काही हिंदु-मुस्लीम स्त्रिया नंबर लावत थांबल्या. परदेशीबाईंच काम संपवून माझा नेकलेस पटवायला घेतला म्हणजे घ्यायलाचं लावला. नेहमीचा पटवारी..चांगली समज आहे व कामही चांगल करतो. थोडं सोनं व बर्या प्रतीचे रुबीज..भैया ये अच्छा दिखेगा नं ? नही तो ये असली-नकली दिखाई देगा...
अरे नही दिदी..बहुत ही बढिया दिखेगा..फिक्र मत करो..ये बाजूवाले औरता भी पुछ रहे है की कितना सुंदर है..बोल रहे पुछो उनको कहां से लिया है ?
कुछ भी ! भैया आपके पास हिंदु-मुस्लीम..गरीब-रईस सब औरते आती तो आपको बराबर समझता है औरतोंकी कैसी तारीफ करनी चाहीये. बराबर नां ? ताई-माई..दिदी-मौसी कुछ भी बोलो..बस..सबको बोलना बहोत अच्छा दिख रहा है । बुरखे,साड्या,दोघं भाऊ सगळ्यांनी हास्याचे टप्पोरे मणी सांडले.
अरे दिदी..मै कायकू झूट बोलू ? पुछो इनको..आपका ध्यान नही था..आप फोटू निकाल रही थे...ये लो.. पहन के देखलो..देखो क्या सही दिख रहा है..नही दस लोगोंने पूछा नां तो मेरा नाम मत लेना. हजर स्त्रीवर्गानेही नजरेनीचं पसंतीची दाद दिली. नेकलेस मनासारखाचं झाला. खुषीत निघाले...
चार पावलांवरच एक ओळखीची भेटली..तिथेचं वर रहाते..अगदी गळ घालून चहाला नेलंच घरी..पहिल्यांदाच गेले..दोन बहिणी,आई रहातात..जुनी भांडी,दागिने.. विणकाम-भरतकाम..मस्तचं मैफील जमली..८० च्या पुढच्या मावशीही खुप रसिक..बोलक्या..माझा नेकलेस दाखवला..परदेसी समाजाचा रिवाज सांगितला..तर त्या म्हणाल्या आमच्यातही(कासार) अशीच प्रथा आहे.आम्हीतर कोणी गेलं की हातातल्या बांगड्याही फोडून टाकतो व सुतका नंतर नवीन बांगड्या भरतो. मंगळसूत्राचही तसंच.दोरा,काळे मणी बदलायचे.आत्ता एवढ्यातंच माझा पुतण्या गेला तर मी जुन्या फोडून ह्या नवीन बांगड्या भरल्या आहेत.

विचारात पडले.कीती एकमेकांवर अवलंबून रचना आहे.
त्या पटवार्याला एकदम ६-७ मंगळसूत्र गाठवून घेणारी २-३ जरी सुतकी घरं मिळाली तरी त्याचा त्या दिवशीचा तरी पोटापाण्याचा प्रश्न सुटला तसंच त्या कासाराचं पण..एका घरातल्या ५-६ जणींनी जरी अशा निमित्ताने बांगड्या भरून घेतल्या तरी त्याचीही माफक सोय झालीचं नां !
देखण्या नेकलेसची खुषी..आवडीचे ताणे-बाणे घट्ट करणारी एका छान कुटुंबाशी मैत्री व भारतीय रीती..रिवाज..प्रथांची पाळंमुळ..व्यक्तीच्या हस्त कौशल्यावर..कार्य कुशलतेवर आधारित भारतीय जाती निहाय समाज रचनेचा, गुंफणेचा अभ्यास हा नवीन विषय डोक्यात घेऊन घरी परतले.

No comments:

Post a Comment