पाऊस चांगलाच लागलाय..हवाही दमट झाली आहे...तसा उशीरंच झालाय. माझं कपड्यांच कपाट आवरायला काढलं आहे.उन्हाळ्यात पिवळसर पडलेल्या तब्बल दोन डझन सलवारींना नीळ घालून पांढरं करणे व तमाम खादी-कोटनच्या कपड्यांना एकजीनसी धुवुन कडकडीत स्टार्च करून ठेवणे ही खरी दोन कामं. त्या निमित्ताने कपाट उपसलं आणी कपाळाला हात लावून बसले.
किती कपडे जमवतो आपण ? अक्षरशः वेड्यासारखे.
आठवणीत सुध्दा नसलेले कपडे बाहेर आले आणी चकीत झाले.मी बरीच बेताने कपडे खरेदी करते हे माझं माझ्याबद्दलचं मत आहे/होतं.
माझी ९०% खरेदी हेन्डलुम-खादी प्रदर्शनातून होते.
आता स्वखुषीने व्रतंच घेतलय तर खादी भांडार मधे सेल लागला की नियमित खरेदी होते. इथली सूती-रेशमी कापडं मला फार आवडतात. उत्तम कापड..वजनाला हलके..माफक भरतकामाला सुरेख वाव..स्टार्च केले की भन्नाट दिसतात.
खादी भांडारच्या वास्तुशी...तिथे मिळणार्या वस्तुंशी..तिथल्या माणसांशी व खादीच्या वैचारिक बैठकीशी असलेलं माझं नातं वादातीत ! Absolutely no compromise !
तशीच ती प्रासंगिक प्रदर्शनं लागली की भारतातील विविध प्रांतातली हातमागावरची तर्हेतर्हेची कापडं..वैशिष्ट्यपुर्ण विणींचे,प्रिंटसचे कापडं..ओढण्या..साड्या व इतर प्रकार आवडून..कौतुक वाटुन..out of respect विकत घेतली जातात. कुठे बाहेर गावी गेलं की तिथेही काहीतरी स्थानिक आवडूनंच जातं.
नकळत कपाटं भरली जातात.
साधारणपणे माझे कुडते मीच डिझाईन करून शिवून घेते व निदान १० पैकी ७ कुडत्यांवर थोडंफार तरी भरतकाम करतेचं करते ! आवडीचं कापड..सवडीने शिवलेलं..भरतकामाची मेहनत..साहजिकच जीव गुंतलेला असतो. आणी भरपूर कपडे असले की कपडेही खुप दिवस टीकतात.माझ्याकडे तर १२-१५ वर्षांपुर्वीचे कुडते अजूनही आहेत. मी ते अजून वापरते.थोडे out of fashion वाटतात पण एकूणंच भावनिक गुंतवणूक असल्यामुळे चलता है.
रोजचे घरातले कपडे..कामासाठी बाहेर जातांनाचे कपडे..सोशल कार्यक्रमांचे वेगळे..लग्न-समारंभाचे
कपडे-साड्या वेगळ्या..सिझन प्रमाणे वेगळा स्टोक...राम..राम...राम....किती व्याप,पसारा आणी त्रास वाढवून ठेवतो आपण ? बरं ह्या जुन्या सुती-खादी कपड्यांना कुणीही वाली नसतो.एकूणंच कपडा इतका स्वस्त झाला आहे नां की जुनेरी दुसर्या कुणी वापरायच्या गोष्टी शहरात तरी इतिहास जमा झाल्या आहेत. व आपल्या/माझ्या फेशनचे-मापाचे कपडे वापरणार कोण ? अक्षरशः गाड्या पुसायच्या कामाचे !
तरीपण भरतकाम केलेले तुकडे मी कापून ठेवते व असे अनेक तुकडे जोडून गोधड्या बनवते-बनवून घेते.गोधडीची माझी वैयक्तिक हौसही फिटते व मन लावून केलेल्या भरतकामाचे नमुनेही माझ्या संग्रही रहातात.कमरेच्या खालचा..मागचा व पुढचा चौकोनी भाग कापून.. जोडून त्याच्याही साध्या गोधड्या बनवते.उरलेल्या चिंध्या हिरण्यला पाठवून देते.
शिवायला टाकायच्या कपड्यांचाही गठ्ठा कायम तयार असतो.साड्यांचही तसंच. कलात्मक नजर असली की वेगवेगळ्या पोताच्या,विणीच्या,छपाईच्या साड्या विणकर-रंगार्यांना कौतुकानी दाद देत आवडीने घेतल्या जातात.पण कळत नकळत परिस्थिती हाता बाहेर जाते. हे असं कधी कपाट उपसलं की लक्षात येतं अरे जसं थेंबे..थेंबे तळे साचे तसंच हळूहळू we are just going out of control! कुणीतरी.. काहीतरी रेटतयं..प्रलोभनं दाखवतयं आणी आपण वहात जातोय.
आता तर त्या व्यापार्यांनी जाती-धर्माचे बुरुज त्यांच्या पुरते जमीनदोस्त करुन एक नवाचं प्रवाह सुरू केला आहे.
सतत कुठला न् कुठला सेल-प्रदर्शन सुरू असतं. झाडून सगळे सिझन्स..राष्ट्रीय सण..हिंदू-मुस्लिम धार्मिक सण..नेत्यांच्या जयंत्या..परत ते फेडिस्ट international women's, mothers,fathers,children's day...friendship-valentines day...oh ! you just name it and one or the other sale is round the corner throughout the year ! त्याही वरताण म्हणजे हल्ली सर्वांच्या मानगुटीवर बसलेला तो onlineचा भस्मासूर !
बा..बा..बा..३६५ दिवस २४×७ जळी..स्थळी..काष्ठी..प्रलोभनांचे गळ टाकलेले..आपण कीतीही निर्धारस्वामी असलो तरी कधीतरी आपलीही शिकार होतेचं. Many a times its really difficult to have self control.मनोनिग्रहाचा अगदी कस लागतो.
सूक्ष्मपणे विचार केला तर सतत एक अंतर्गत लढाईचं आपण लढत असतो. म्हणजे ज्या मनात खरंतर काहीतरी सकारात्मक रुजलं पाहिजे त्या मनाचं आपण अक्षरशः रणांगण करून टाकतो.
बघायला गेलं तर कीती शुल्लक कारण!
आवडलेली वस्तू पैसे देऊन स्वतःच्या मालकीची करणं.
आपल्या विचारांच्या कक्षेतल्या दुनियेच्या नजरेतली 'IN' वस्तू माझ्या मालकीची आहे हा बेगडी सुखाचा विचारच मुळी अफूच्या गोळी सारखा आहे. एकदा का या भंपक..बाजारू नशेची सवय झाली ना की कीतीही संपन्नता..भरभराट..होऊ द्या, मानसिकरित्या आपण कायम आधाशी भिकारीचं राहतो व मनशांतीची फाटकी झोळी घेऊन सतत धावत राहतो.
ऊर फुटेस्तवर !

No comments:
Post a Comment